प्रति नागरी सरकार आणि राखीनमध्ये स्थित एक जातीय मिलिशिया अरकान आर्मी – जे प्रदेशाच्या स्वायत्ततेसाठी लढत आहे – त्यांनीही या हल्ल्यात डझनभर लोक मारले गेल्याची माहिती दिली.
राष्ट्रीय एकता सरकार आणि शुक्रवारी उशिरा जारी करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या निवेदनानुसार, जुंटाने बुधवारी दुपारी यान्बी टाउनशिपच्या क्युक नी माव गावावर हल्ला करत, सुमारे 500 घरे उद्ध्वस्त केली. यात 40 हून अधिक लोक ठार झाले.
‘दहशतवाद्यांशी लढा’
रॉयटर्सला या बातम्यांचा खरेपणा लगेच तपासून बघता आलेला नाही. लष्कराच्या प्रवक्त्यानेही या घटनेवर प्रतिक्रिया मागणाऱ्या दूरध्वनीला उत्तर दिले नाही. आम्ही ‘दहशतवाद्यांशी’ लढा देत असल्याचे सांगत, नागरिकांवर अत्याचार केल्याचा आरोप जुंटा नाकारतो.
अराकन सैन्याने राखीन राज्यात म्यानमारमधील जुंटाच्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या 26 आणि 12 जखमी झालेल्या मुस्लिम गावकऱ्यांची नावे जाहीर केली आहेत.
2021 मध्ये लष्कराने नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान स्यू की यांचे निवडून आलेले सरकार उलथून टाकल्यापासून म्यानमारमध्ये अशांतता पसरली आहे, ज्यामुळे अनेक आघाड्यांवर मोठ्या प्रमाणात सशस्त्र बंडखोरी झालेली आहे.
यूएनच्या निवेदनात सर्व पक्षांना आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांतर्गत त्यांच्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
द ब्लड मनी कॅम्पेन ही म्यानमारच्या कार्यकर्त्यांची युती, जुंटाला पुरवला जाणारा पैसा कमी करण्यासाठी काम करत असून, आंतरराष्ट्रीय सरकारांना विमान इंधनाचा पुरवठा करणाऱ्या संस्थांवर त्वरित निर्बंध घालण्याचे आवाहन केलेले आहे.
“जेव्हा हा पाठिंबा थांबेल तेव्हाच हवाई हल्ले खऱ्या अर्थाने संपुष्टात येतील,” असे ब्लड मनी कॅम्पेनचे प्रवक्ते मुलान म्हणाले.
जुंताची हार निश्चित
फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या संघर्षपूर्ण सत्तापालटानंतर म्यानमारची लष्करी सत्ता प्रतिकार शक्तींपुढे अधिकाधिक हरत चालली आहे.
सुरुवातीला, जुंटाने वेगाने सत्ता काबीज केल्याने त्याचे नियंत्रण मजबूत झाल्याचे दिसून आले, परंतु गेल्या काही महिन्यांत त्याला विविध सशस्त्र गट, राजकीय संघटना आणि नागरी समाजाच्या चळवळींच्या वाढत्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले आहे.
नॅशनल युनिटी गव्हर्नमेंट (NUG), निवडून आलेले नेते आणि वांशिक अल्पसंख्याक गटांनी बनवलेले प्रति सरकार, सैन्याच्या राजवटीच्या विरोधात एकत्रितपणे प्रतिकार करण्याला आता वेग आला आहे.
सर्वात लक्षणीय घडामोडींपैकी एक म्हणजे पीपल्स डिफेन्स फोर्सेसचा (पीडीएफ) उदय. हे एक गनिमी-शैलीतील प्रतिकार दल असून यामध्ये नागरिक आणि पक्षांतर केलेल्या माजी लष्करी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लष्कराचा पुरवठा मार्ग विस्कळीत करणे, ताफ्यावर हल्ला करणे आणि मोक्याच्या चौक्या ताब्यात घेणे यासाठी हे सैन्य अधिक प्रभावी झाले आहे. पीडीएफला एनयूजीचा पाठिंबा आहे, ज्याने जुंटाविरूद्धच्या आपल्या लढ्याला बळकटी देण्यासाठी आंतरराष्ट्रीय मान्यता आणि पाठिंबा मागितला आहे.
या सशस्त्र प्रतिकार गटांव्यतिरिक्त, निदर्शने आणि सविनय कायदेभंग मोहिमाही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)