पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रेबेलो डी सौसा, यांनी सोमवारी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत केले आणि “भारत बहुपक्षीय आणि खुल्या विचारांचे जग उभारण्यात कायम भागीदार राहील,” असे मत व्यक्त केले.
“पोर्तुगालमधील भारतीय समुदाय मजबूत आणि शक्तिशाली आहे; 50,000 लोक, तरुण विद्यार्थी भारतातून पोर्तुगालमध्ये येतात आणि येथे शिक्षण घेतात. उच्च तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, संस्कृती आणि संरक्षण क्षेत्रात आमचे सहकार्य कायम आहे. आंतरराष्ट्रीय कायदा किंवा संयुक्त राष्ट्रांच्या सनदांचे उल्लंघन न करता, मुक्त व्यापारासह बहुपक्षीय, खुल्या विचारांचे जग आम्ही निर्माण करु इच्छितो,” असे त्यांनी त्यांच्या संयुक्त भाषणात म्हटल्याचे, ANI ने सांगितले.
“भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आणि एक शक्तिशाली अर्थव्यवस्था आहे. तसेच तो समान मूल्यं आणि तत्व सामायिक करतो. म्हणूनच पोर्तुगालच्या माझ्या प्रिय मैत्रिणींनो, महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आपल्या देशात स्वागत करणे आणि दीर्घकालीन भगीदारीची नीव रचणे ही आपले सौभाग्य आहे. दोन्ही देशांमध्ये गेल्या 50 वर्षांहून अधिक काळचे राजनैतिक संबंध आहेत, जे पुढेही कायम राहतील,” असे मत सौसा यांनी व्यक्त केले.
राष्ट्रपती मुर्मू लिस्बनमध्ये दाखल
भारताच्या राष्ट्रपती, पोर्तुगाल आणि स्लोव्हाक प्रजासत्ताकच्या त्यांच्या राजकीय भेटीच्या पहिल्या टप्प्यात लिस्बन येथे पोहचल्या.
भारतीय राष्ट्रपतींचा गेल्या 27 वर्षांमधील पोर्तुगालचा हा पहिलाच दौरा आहे.
लिस्बनमधील ऐतिहासिक ‘प्राका डो इम्पेरियो’ येथे, मार्सेलो रेबेलो डी सौसा यांनी मुर्मू यांचे ‘गार्ड ऑफ ऑनरसह’ औपचारिक स्वागत केले.
भेटीदरम्यान, मुर्मू यांनी सांता मारियाच्या चर्चला भेट दिली आणि पोर्तुगालचे राष्ट्रीय कवी लुईस वाझ डी कॅमोस यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण केला.
भारत-पोर्तुगाल संबंध
त्यानंतर मुर्मू यांनी, पोर्तुगालचे राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सोसा, यांच्याशी वन टू वन बैठक केली आणि शिष्टमंडळस्तरीय चर्चांमध्ये द्विपक्षीय संबंधांचे विविध पैलू तसेच सामायिक स्वारस्य असलेल्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली.
मुर्मू यांनी म्हटले की, “भारत-पोर्तुगाल संबंध ऐतिहासिक आहेत आणि हे संबंध अधिक मजबूत होत आहेत आणि गेल्या काही काळात एका आधुनिक, बहुपक्षीय आणि गतिमान भागीदारीमध्ये विकसित झाले आहेत.”
व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञान, नूतनीकरण ऊर्जा, कनेक्टिव्हिटी आणि गतिशीलता यासारख्या क्षेत्रांमध्ये, दीर्घकालीन द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याची आवश्यकता देखील मुर्मू यांनी यावेळी अधोरेखित केली.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)