चीनच्या गुंतवणुकीवरील निर्बंध भारताकडून कायम – अर्थमंत्री

0
भारताकडून
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूलमध्ये संवाद साधला

वादग्रस्त हिमालयीन सीमेवर गस्त घालण्यासाठी भारताने चीनसोबत करार केल्यानंतर काही दिवसांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारताची सीमा ज्या देशासोबत सामायिक आहे (चीन) त्या देशाच्या गुंतवणुकीवरील निर्बंध यापुढेही कायम राहणार आहे.
कराराचे महत्त्व
या करारामुळे चार वर्षांचा लष्करी स्टॅण्ड ऑफ संपुष्टात आणण्याचा आणि 2020 मध्ये झालेल्या हिंसक सीमा संघर्षामुळे भांडवल, तंत्रज्ञान आणि प्रतिभेची देवाणघेवाण मंदावली होती. उभय देशांमधील संबंधही तणावपूर्ण झाले होते. मात्र आता या करारामुळे आशियाई दिग्गजांमधील राजकीय आणि व्यावसायिक संबंध सुधारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अमेरिकन श्रोत्यांना सीतारामन यांनी संबोधले
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूलमध्ये एका मेळाव्याला संबोधित करताना सांगितले की, “मला थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आंधळेपणाने स्वीकारता येत नाही कारण मला गुंतवणुकीसाठी पैसा हवा असला तरी , तो कुठून येत आहे हे विसरून किंवा दुर्लक्ष करून चालत नाही.”
प्राध्यापक जगमोहन राजू आणि प्राध्यापक जोआओ गोम्स यांनी फायरसाइड चॅटचे सूत्रसंचालन केले.
तणावाचा परिणाम
या तणावामुळे इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अशा सहकार्याची संधी देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांमधील मागणीत वाढ होत असताना जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमधील संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली होती.
गुंतवणुकीबाबतच्या तपासणीला भारताकडून मिळाला वेग
2020 मध्ये, भारताने शेजारील देशांमधील कंपन्यांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीच्या छाननीमधील तपासणी आणि सुरक्षा मंजुरी वाढवली, परंतु कोणत्याही देशाचा विशेष उल्लेख केला नाही.
चिनी कंपन्यांकडून केले जाणारे अधिग्रहण आणि गुंतवणूक रोखण्याच्या उद्देशाने व्यापकपणे उचलले गेलेले हे पाऊल बीवायडी आणि ग्रेट वॉल मोटरसारख्या कार उत्पादकांकडून कोट्यवधी डॉलर्समुळे प्रभावीपणे मागे हटवले, तर लाल फितीने भारतीय कंपन्यांना चिनी भागधारकांच्या जाळ्यात अडकवले.
भारतीय वस्तूंच्या चीनमधून होणाऱ्या आयातीत 56 टक्के वाढ.
2020 च्या सीमा संघर्षानंतर चीनमधून होणाऱ्या, भारतीय वस्तूंच्या आयातीत 56 टक्के वाढ झाली आहे, ज्यामुळे नवी दिल्लीची बीजिंगबरोबरची व्यापार तूट जवळजवळ दुप्पट होऊन ती 85 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. चीन हा भारताचा वस्तूंचा पुरवठा करणारा सर्वात मोठा स्रोत आहे आणि गेल्या वर्षी तो त्याचा औद्योगिक उत्पादनांचा सर्वात मोठा पुरवठादार होता.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleGermany Turns To India To Reduce Leaning On China
Next articleTaiwan: Real Blockade By Chinese Would Be Act Of War

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here