आगामी ट्रम्प प्रशासनाशी संवाद साधून अमेरिकेबरोबरचे आपले आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी भारत उत्सुक आहे, असे भारताचे व्यापारमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितले.
“आम्ही अमेरिकेच्या नवीन प्रशासनासोबत अतिशय सखोल आणि ठोस सहभागासाठी उत्सुक आहोत,” असे व्यापारमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन प्रशासनासोबतचे आपले द्विपक्षीय संबंध मजबूत केले आहेत.”
अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्वैपाक्षिक व्यापार 2023-24 मध्ये 118 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाला असून भारताकडून 32 अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त व्यापार झाल्याचे सांगितले जाते.
मजबूत आर्थिक सहकार्य
उद्योग क्षेत्राच्या अंदाजानुसार, दोन ते तीन वर्षांत व्यापारात अतिरिक्त 50 अब्ज डॉलर्सची वाढ होऊ शकते, ज्यामुळे मजबूत आर्थिक सहकार्याची महत्त्वपूर्ण क्षमता अधोरेखित होईल.
राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी धोरणात्मक लवचिकता कायम ठेवत भारतीय उत्पादकांना जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये एकात्मिक होण्यास मदत करण्यासाठी सरकार आणि उद्योग गट अमेरिकेबरोबर व्यापक व्यापार तसेच गुंतवणूक करार करण्यासाठी उत्सुक आहेत.
मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात भारताचा वस्तू आणि सेवा व्यापार 800 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाईल असा अंदाज असल्याचे गोयल म्हणाले.
ट्रम्प यांचा दरवाढीचा इशारा
अमेरिकेच्या निर्यातीवरील संभाव्य शुल्क वाढीपासून आपल्या उत्पादकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने, भारत वॉशिंग्टनशी संबंध मजबूत करण्याचे मार्ग शोधत आहे, कारण ट्रम्प यांनी 60 टक्के शुल्क आणि चीनमधून होणाऱ्या आयातीवर इतर निर्बंध घालण्याची धमकी दिली आहे.
ट्रम्प यांनी भारताला परस्पर शुल्क आकारण्याची धमकी दिली होती. जर त्यांनी आमच्यावर कर लावला तर आम्ही त्यांच्यावर तितकाच कर लावतो. जवळजवळ सर्व वस्तूंवर ते आमच्यावर कर आकारत आहेत आणि आम्ही मात्र त्यांच्यावर कर आकारत नाही.
ट्रम्प यांनी यापूर्वीही भारताला लक्ष्य केले आहे. हार्ले-डेव्हिडसन मोटरसायकलवरील उच्च आयात शुल्काचा हवाला देत त्यांनी भारत हा “शुल्क वसुलीचा राजा” असल्याचे म्हटले आहे.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)