ईस्ट टेक 2024: भविष्यातील संरक्षण उपाययोजनांची एक झलक

0
ईस्ट
ईस्ट टेक 2024

भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने कोलकाता येथे 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी ईस्ट टेक 2024 या संरक्षण प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रगत तंत्रज्ञान तसेच भारतीय लष्कर आणि भारताचे संरक्षण उत्पादन क्षेत्र यांच्यातील वाढता समन्वय यावेळी प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजकांच्या म्हणण्यानुसार, आत्मनिर्भर भारत हे राष्ट्रीय ध्येय साध्य करणे आणि पूर्व कमांडला भेडसावणाऱ्या परिचालनविषयक आव्हानांचा सामना करणे असे दुहेरी उद्दिष्ट ईस्ट टेक 2024 चे होते.
आधुनिक काळातील ड्रोन युद्धाच्या परिवर्तनात्मक परिणामांवर प्रकाश टाकताना, पूर्व लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल आर. सी. तिवारी यांनी भारतीय लष्करात अत्याधुनिक ड्रोनच्या सहभागासह आपले युनिट आणि संरचना यात वाढ करण्यावर भर असावा असे प्रतिपादन केले. भारतीय सैनिक ज्या उंच आणि आव्हानात्मक प्रदेशात काम करण्यासाठी तैनात आहेत त्या ठिकाणांसाठी सक्षम ड्रोन उपलब्ध करून देण्याचे आवाहन त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात संरक्षण उद्योगाला केले. “आम्ही सामर्थ्यशील, अत्याधुनिक ड्रोनसह आमची पथके आणि संरचना वाढवण्याचा विचार करत आहोत,” असे ते म्हणाले.
या प्रदर्शनामुळे भारतीय उत्पादक आणि नवउद्योजकांना संरक्षण तंत्रज्ञानातील नवीन प्रगती दाखविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. याचा उद्देश भारतीय लष्कराला पूर्व क्षेत्र आणि त्यापलीकडे विकसित होणाऱ्या क्षेत्रातील बदलत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्वदेशी नवकल्पना ओळखून त्यांचे एकत्रीकरण करण्यात मदत करणे हा होता.
सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या (एसआयडीएम) सहकार्याने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचा उद्देश प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक ऑफ-द-शेल्फ (सीओटीएस) उपाययोजनांची ओळख करून देऊन त्यांचे तांत्रिक ज्ञान अधिक सखोल करणे हा होता. संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ईस्ट टेक 2024 ने संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनाला प्रोत्साहन देणाऱ्या रक्षा आत्मनिर्भरता उपक्रमांतर्गत भारतीय उत्पादकांनी विकसित केलेल्या नवनवीन हार्डवेअर उपायांबद्दल आणि नवकल्पनांबद्दल संरक्षण भागधारकांमध्ये जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला.
लेफ्टनंट जनरल आर. सी. तिवारी यांच्या निरीक्षणानुसार संरक्षण उद्योगातील 140 हून अधिक सहभागींनी या दोन दिवसीय कार्यक्रमात विविध संरक्षण उत्पादन क्षेत्रांमधील त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन केले. “दररोज उद्भवणारे नवीन धोके आणि आव्हाने आपण ओळखली पाहिजेत. म्हणूनच, संरक्षण उद्योगाने आम्हाला आवश्यक युद्धभूमीवर सुसज्ज करण्यासाठी  प्रयत्नशील असले पाहिजे,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात प्रदर्शन आणि थेट प्रात्यक्षिके समाविष्ट होती, ज्यात सहभागींना स्वदेशी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव आणि त्यांच्या क्षमतांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची संधी देण्यात आली.
टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleInside East Tech 2024: A Glimpse Into Future Defence Solutions
Next articleसुसी वाइल्स बनल्या व्हाईट हाऊसच्या पहिल्या महिला चीफ ऑफ स्टाफ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here