इराणचे परराष्ट्र मंत्री, इराण-अमेरिका चर्चेसाठी रशियाशी सल्लामसलत करणार

0
इराणचे

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची या आठवड्यात रशियाला भेट देतील, अशी माहिती इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोमवारी दिली. ओमानमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या ताज्या चर्चांबाबत ते मॉस्कोमध्ये सल्लामसलत करणार असल्याचेही ते म्हणाले.

इराणने आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाविषयी पश्चिमेकडील देशांशी निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी आणि बंदिस्त अर्थव्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी, राजनैतिक प्रयत्न वाढवले आहेत. याच अनुषंगाने या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या अण्वस्त्र निरीक्षक संस्था (IAEA) चे प्रमुख- राफायल ग्रॉसी, यांचीही भेट घेण्याचे अराक्ची यांचे नियोजन आहे.

इराण आणि अमेरिका यांनी ओमानमध्ये झालेल्या चर्चांना “सकारात्मक” आणि “बांधीलकी जपणारे” असे संबोधले असून, शनिवारी पुन्हा एकदा बैठक घेण्याचे निश्चीत केले आहे. या संवादामध्ये इराणच्या वाढत्या अण्वस्त्र कार्यक्रमावर चर्चा होईल.

परराष्ट्र मंत्री अराक्ची, यांची मॉस्को भेट या आठवड्याच्या शेवटी होणार आहे, असे बघाई यांनी स्पष्ट केले. इराणमध्ये आठवड्याचा शेवट शुक्रवारला होतो. त्यांनी सांगितले की, “ही भेट पूर्वनियोजित होती, यामध्ये अमेरिकेसोबत झालेल्या प्राथमिक चर्चांबाबत सल्लामसलत केली जाईल.”

अमेरिका इराणवर अण्वस्त्र तयार करण्याचा आरोप करते, तर तेहरान मात्र त्यांचा अणुकार्यक्रम फक्त नागरी उपयोगासाठी असल्याचे सांगतो.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी ‘इराणचा अणुकार्यक्रम थांबवण्याबाबत कोणताही करार न झाल्यास, लष्करी कारवाई करु’, अशी धमकी दिली आहे. रविवारी त्यांनी, ‘इराणच्या अणु कराराबाबत सल्लागारांशी चर्चा झाली असून लवकरच याविषयी ठोस निर्णय घेण्यात येईल’, असे सांगितले.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्य असलेल्या आणि व्हेटो शक्ती असलेल्या रशियाने, या मुद्यावर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2015 मध्ये झालेल्या अणुकराराचा रशिया एक सह-हस्ताक्षरकर्ता देश होता, ज्या करारातून अमेरिका 2018 मध्ये बाहेर पडली होती.

रशियाने संघर्ष वाढवणाऱ्या कृतींना प्रोत्साहन देण्याऐवजी, राजकीय संवादावर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले आहे.

मागील आठवड्यात रशिया, चीन आणि इराण यांनी, मॉस्कोमध्ये इराणच्या अणुकार्यक्रमावर तज्ज्ञ पातळीवरील चर्चा केली. या चर्चा निर्णायक ठरू शकतात, कारण ट्रम्प यांची अंतिम भूमिका या चर्चांवरच आधारित असेल.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleव्हिएतनामसोबत व्यापारी संबंध मजबूत करण्याचे शी जिनपिंग यांचे आवाहन
Next articleOperation Brahma: How GPS Spoofing Shadows Humanitarian Mission in Myanmar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here