Pahalgam: काश्मीरमध्ये ALH ‘Dhruv’ ची सेवा पुन्हा सुरु करण्याचे आदेश

0

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे, नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने, भारतीय लष्कराला काश्मीरमध्ये स्थगित करण्यात आलेली ‘अॅडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर ‘ध्रुव’ (ALH Dhruv)’ ची सेवा, पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. हे हेलिकॉप्टर काश्मीरमध्ये सुरु झालेल्या तीव्र दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये सहाय्य करेल.

“पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर, भारताकडून सुरू झालेल्या दहशतवादविरोधी प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, श्रीनगर आणि आसपासच्या भागात ग्राउंड कमांडर्सच्या आवश्यकतेनुसार भारतीय लष्कराला ALH Dhruv हेलिकॉप्टर वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे,” असे संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

गुजरातमधील पोरबंदर विमानतळावर कोस्ट गार्डच्या ALH MK III च्या भीषण अपघातानंतर, ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता, त्या अपघातानंतर 5 जानेवारीपासून ध्रुव हेलिकॉप्टरचा संपूर्ण ताफा ग्राउंड करण्यात आला होता. भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि तटरक्षक दल मिळून, सुमारे 330 ALH चालवतात.

या महिन्याच्या सुरुवातीला, जानेवारीच्या अपघाताची चौकशी अनिर्णीत राहिल्याने ग्राउंडिंग आणखी तीन महिने सुरू राहण्याची शक्यता असल्याचे वृत्त होते.

उंचावर ऑपरेशन्स करण्यास सक्षम असलेले ALH Dhruv, हे सशस्त्र दल आणि तटरक्षक दलासाठी एक महत्त्वाचे उपयुक्त साधन आहे. 180 हून अधिक ALH, ज्यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे निर्मित सुमारे 60 सशस्त्र ‘रुद्र’ वेरिएंट्सचा समावेश आहे, ती ग्राउंडिंगमुळे सर्वाधिक प्रभावित झाली आहेत.

ही हेलिकॉप्टर्स युद्ध क्षेत्रांमध्ये पुरवठा, गुप्तचर माहिती संकलन आणि तांत्रिक पाठबळासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleIndo-Pacific मधील सर्वात मोठ्या युद्ध सरावात, भारताचा सहभाग
Next articleरशियन क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात कीवमध्ये 9 ठार, 70 हून अधिक जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here