दमास्कसच्या रस्त्यांवर आता शांतता पसरली असेल असा अनेकांचा समज असला तरी प्रत्यक्षात सीरियाच्या सीमेवर एक वेगळीच कहाणी सुरू आहे. इस्रायलने मंगळवारी सीरियन लष्कराच्या तळांवर हल्ले केले. शस्त्रे शत्रूच्या हातात पडण्यापासून रोखणे हे या हल्ल्यांमागचे उद्दिष्ट होते असे इस्रायलने सांगितले असले तरी आपल्या सैन्याने सीमेवरील बफर झोनच्या पलीकडे सीरियामध्ये प्रवेश केल्याचे नाकारले आहे.
सीरियाच्या राजधानीत अध्यक्ष बशर अल-असाद यांना पदच्युत केल्यानंतर सामान्य जीवन पुन्हा रूळावर यावे या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून बँकांचे व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. दुकाने पुन्हा उघडली गेली, रस्त्यांवरील वाहतूक परत एकदा सुरू झाली, बांधकाम कामगार शहराच्या मध्यभागी एक गोल चक्राची दुरुस्ती करत होते आणि रस्त्यावरील सफाई कर्मचारी रस्त्यावर झाडू मारत होते.
रविवारी असाद हे देश सोडून बाहेर गेल्याने त्यांच्या कुटुंबाच्या पाच दशकांहून अधिक काळ चाललेल्या राजवटीचा अंत झाला. त्यानंतर इस्रायली सैन्याने 1973 च्या युद्धानंतर सीरियामध्ये स्थापन झालेल्या demilitarised zone मध्ये प्रवेश केला. सीमा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही घुसखोरी करण्यात आल्याचे आणि ती तात्पुरती असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
तीन सुरक्षा सूत्रांनी मंगळवारी सांगितले की इस्रायली सैन्य demilitarised zoneमध्ये गेले आहे. सीरियाच्या एका सूत्राने सांगितले की ते बफर झोनच्या पूर्वेस अनेक किलोमीटर अंतरावर आणि दमास्कस विमानतळापासून थोड्या अंतरावर असलेल्या कताना शहरात पोहोचले आहेत.
इस्रायलच्या म्हणण्यानुसार ते सीरियातील नवीन शासन अधिकाऱ्यांशी कोणताही संघर्ष करू इच्छित नाहीत. मात्र सीरियन लष्करी साधनसामग्री शत्रूच्या हाताला लागणार नाही याची खात्री करण्यासाठी आपली विमाने गेल्या तीन दिवसांपासून देशभरातील लक्ष्यांवर बॉम्बफेक करत आहेत.
पतन झालेल्या सीरियन सैन्यातील प्रादेशिक सुरक्षा स्रोत आणि अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यांचे वर्णन आतापर्यंतचे सर्वात मोठे हल्ले असे केले. सीरियातील लष्करी आस्थापने आणि हवाई तळांवर हे हल्ले करण्यात आले. डझनभर हेलिकॉप्टर्स, जेट्स तसेच दमास्कस आणि आसपासच्या रिपब्लिकन गार्डच्या मालमत्ता त्यांनी नष्ट केल्या.
एका रात्रीत केलेल्या अंदाजे 200 हल्ल्यांमुळे सीरियन सैन्याची कोणतीही साधनसामुग्री शिल्लक राहिलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले. इजिप्त, कतार आणि सौदी अरेबियाने इस्रायच्या या घुसखोरीचा निषेध केला आहे. सौदी अरेबियाने म्हटले आहे की हे पाऊल “सीरियाची सुरक्षा पुन्हा सुरळीत करण्याच्या शक्यता नष्ट करणारे आहे.”
इस्रायलने सांगितले की त्यांचे हवाई हल्ले अनेक दिवस सुरू राहणार आहेत. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला त्यांनी सांगितले की ते सीरियाच्या संघर्षात कोणताही हस्तक्षेप करत नसून केवळ आपल्या सुरक्षेसाठी “मर्यादित आणि तात्पुरती उपाययोजना” केल्याचे त्याने म्हटले आहे.
दमास्कसमधील वातावरण अजूनही उत्सवी आहे. सीरियचे पंतप्रधान मोहम्मद जलाली यांनी सोमवारी बंडखोरांच्या नेतृत्वाखालील साल्वेशन सरकारला सत्ता सोपविण्यास सहमती दर्शवली. हे प्रशासन पूर्वी वायव्य सीरियातील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात कार्यरत होते.
यमुख्य बंडखोर कमांडर अहमद अल-शारा, ज्याला अबू मोहम्मद अल-गोलानी या नावाने ओळखले जाते, त्याने आपत्कालीन सरकारवर चर्चा करण्यासाठी सोमवारी जलाली आणि उपाध्यक्ष फैसल मेकदाद यांची भेट घेतली. जलाली म्हणाले की सत्ता हस्तांतर पूर्ण होण्यास काही दिवस लागू शकतात.
अर्थात मंगळवारी बँका पुन्हा उघडणे हे जीवन पूर्वपदावर येण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले एक मोठे पाऊल होते, कारण आठवड्याच्या शेवटी राजवट कोसळल्यानंतर सीरियन लोकांना रोख रकमेशिवाय व्यवहार करणे अशक्य झाले होते.
चार मिनी-बस सीरियाच्या सेंट्रल बँक येथे आल्या, कर्मचारी असाद यांच्या पतनानंतर कामाच्या पहिल्या दिवसासाठी खाली उतरले आणि इमारतीच्या दिशेने चालत गेले.
“हे एक नवीन संक्रमण आहे, हा एक नवीन दिवस आहे, एक नवीन वर्ष आहे, एक नवीन जीवन आहे,” असे सुमायरा अल-मुकली म्हणाल्या.
अल-कायदाशी संलग्न असलेल्या हयात ताहरिर अल-शाम (एचटीएस) या माजी संघटनेच्या नेतृत्वाखालील मिलिशिया आघाडीची झालेली प्रगती हा मध्यपूर्वेसाठी एक टर्निंग पॉइंट होता.
2011 मध्ये सुरू झालेल्या यादवी युद्धात लाखो लोक मारले गेले, ज्यामुळे आधुनिक काळातील सर्वात मोठ्या निर्वासित संकटांपैकी एक संकट निर्माण झाले, शहरांवर बॉम्बफेक सुरू झाली, ग्रामीण भागाची लोकसंख्या कमी झाली आणि जागतिक निर्बंधांमुळे अर्थव्यवस्था पोकळ झाली.
“सीरियन लोकांसाठी हा एक अविश्वसनीय क्षण आहे,” असे संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेचे उपराजदूत रॉबर्ट वुड यांनी न्यूयॉर्कमध्ये सांगितले. “परिस्थिती कशी वळणे घेते हे पाहण्याचा प्रयत्न करण्यावर आम्ही सध्या खरोखर लक्ष केंद्रित केले आहे. सीरियन लोकांचे हक्क आणि प्रतिष्ठा यांचा आदर करणारी एखादी प्रशासकीय सत्ता सीरियामध्ये असू शकते का?” एचटीए हा अल-कायदाचा एक जुना सहयोगी आहे, जो भूतकाळात हिंसाचार कायम ठेवण्यासाठी प्रसिद्ध आहे, असे सर्वांनी सांगितले.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)
(रॉयटर्स)