दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त स्कार्बरो शोल परिसरात, चीन आणि फिलीपिन्स यांनी पुन्हा एकमेकांवर धोकादायक हालचालींचे आरोप केल्यामुळे, करत तणाव वाढवला आहे. या समुद्रातील या विशीष्ट भागावर दोन्ही देश आपला हक्क सांगतात, त्यामुळे या क्षेत्रातील संघर्ष गेल्या दोन वर्षांत अधिक तीव्र झाला आहे.
सोमवारी, चीनच्या Coast Guard जहाजाने, फिलीपिन्सच्या एका जहाजाचा मार्ग अडवून धोकादायक हालचाल केल्याचा आरोप फिलीपिन्सने केला आहे. ही घटना स्कार्बरो शोलपासून सुमारे 36 नॉटिकल मैल अंतरावर घडली, असे फिलीपिन्सच्या तटरक्षक दलाने सांगितले.
“ही घटना, आंतरराष्ट्रीय समुद्री नियमांचे उल्लंघन आहे आणि समुद्रातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे,” असे त्यांनी म्हटले.
याउलट, चीनने आरोप केला की, ‘फिलीपिन्सच्या जहाजाने हेतूपूर्वक त्यांच्या जहाजाच्या मार्गात घुसून, बनावट धडक झाल्यासारखी स्थिती निर्माण केली. “फिलीपिन्स आमच्या नियमित गस्त घालणाऱ्या जहाजाजवळ बेकायदेशीरित्या आणि धोकादायक पद्धतीने आले, ज्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांचा धोका वाढला,” असे चीनच्या अधिकृत शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
याव्यतिरिक्त, मंगळवारी फिलीपिन्सच्या कोस्ट गार्ड दलाने, एक चिनी संशोधन जहाज फिलीपिन्सचे वर्चस्व असलेल्या उत्तर समुद्रात विनापरवाना कार्यरत असल्याचा आरोप केला. ‘Zhong Shan Da Xue’ नावाचे हे चिनी जहाज बातानेस प्रांताच्या 78 नॉटिकल मैल उत्तरेस फिरताना आढळले, मात्र फिलीपिन्सच्या ‘आयलँडर’ विमानाने पाठवलेल्या रेडिओ संदेशांना त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही, असे तटरक्षक दलाने सांगितले.
“या चिनी जहाजाला फिलीपिन्सच्या exclusive economic zone मध्ये, समुद्र विज्ञान संशोधन करण्याची अधिकृत परवानगी नाही,” असे फिलीपिन्स कोस्टगार्डने स्पष्ट केले.
दक्षिण चीन समुद्रातील ही समुद्र पट्टी, अंदाजे $3 ट्रिलियन डॉलरच्या वार्षिक सागरी व्यापारासाठी महत्त्वाची आहे. या भागावर चीन आपली पूर्ण मालकी सांगतो, तर ब्रुनेई, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स आणि व्हिएतनाम हेही त्यावर दावा करत आहेत.
तैवानचा प्रश्नही या क्षेत्रात कायम चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. चीनच्या आक्रमक धोरणांमुळे अनेक आशियाई देशांमध्ये त्याविरोधात सध्या नाराजी वाढत आहे.
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)