इंडो-पॅसिफिक एअरफील्ड्सवर China कडून हल्ले झाल्यास त्यामुळे अमेरिकेच्या लष्करी विमानांना अडथळा निर्माण होऊ शकतो, असा इशारा एका अभ्यासाद्वारे देण्यात आला आहे.
याबाबत संशोधकांचे असे म्हणणे आहे की, पहिल्या बेटांच्या साखळीतील तळ हे इंडोनेशियापासून ते उत्तर-पूर्वेकडे साधारण जपानपर्यंत पसरलेल्या द्वीपसमूहांचा संग्रह असून, याच दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्राचाही समावेश आहे. हा संपूर्ण भाग हजारो चिनी क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आहे. त्यामुळे जर ते लष्करी तळांची धावपट्टी नष्ट करण्यासाठी किंवा अक्षम करण्यासाठी समर्पित असतील तर जपानमधील एअरफील्ड किमान 11.7 दिवसांसाठी बंद पाडू शकतात.
याशिवाय तिथून दूर असलेल्या ग्वाम आणि पॅसिफिक बेटांवरील एअरफील्ड, किमान 1.7 दिवसांसाठी बंद होऊ शकतील.
“अभ्यासानुसार, चीन युनायटेड स्टेट्सला हवाई इंधन भरण्याचे ऑपरेशन करण्यासाठी धावपट्टीचा वापर करण्यास नकार देऊ शकते आणि यूएसच्या लढाऊ ऑपरेशनमध्ये जास्त काळ व्यत्यय आणू शकतो,” असे सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.
याबाबत अभ्यास करुन तयार करण्यात आलेला, “क्रेटरिंग इफेक्ट्स: चायनीज मिसाइल थ्रेट्स टू यूएस एअर बेस इन इंडो-पॅसिफिक” (Cratering Effects: Chinese Missile Threats to US Air Bases in the Indo-Pacific) हा विशेष अहवाल गुरुवारी स्टिमसन सेंटर या संरक्षण आणि सुरक्षा थिंक टँकने प्रकाशित केला आहे.
लहान धावपट्ट्यांसह काम करू शकणारी अधिक क्रू असलेली सुसज्ज विमाने तयार करण्याचे हा अहवाल सुचवतो. तसेच धावपट्टी-दुरुस्ती आणि एअर बेसवरील क्षमता विकसित करणे आणि अमेरिकेसोबतची युती अधिक बळकट करणे यावर भर देण्याबाबतही यात सुचित केले आहे.
दरम्यान यूएस इंडो-पॅसिफिक कमांड, जे या प्रदेशातील अमेरिकन सैन्याची देखरेख करते, टिप्पणीच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. तसेच चिनी संरक्षण मंत्रालयाने देखील टिप्पणीच्या या विनंतीला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.
अलीकडच्या काही वर्षांत, हवाई दलाने रॅपिड एअरफील्ड डॅमेज रिकव्हरी (RADR) नावाचा कार्यक्रमही विकसित केला आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर रनवे त्वरीत पुन्हा उघडण्यासाठी आणि त्यांना “हजारो” सोर्टीजसाठी सक्रिय ठेवण्यासाठी हा कार्यक्रम आहे. तसेच यूएस लष्करी नियोजकांनी वितरित केलेली ऑपरेशन्स – संपूर्ण प्रदेशात प्रसारित करण्याच्या संकल्पनेवरही भर देण्याबाबत नमूद केले आहे.
अहवलात म्हटल्यानुसार, पॅसिफिक डेटरन्स इनिशिएटिव्हचा एक भाग म्हणून, ऑस्ट्रेलिया आणि टिनियन बेट सारख्या ठिकाणी एअरफील्ड अपग्रेड करण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च केले गेले आहेत.
इंडो-पॅसिफिक संघर्ष सिम्युलेशनचे ज्ञान असलेले US Air Force चे लॉजिस्टिक्स ऑफिसर म्हणतात, की या अहवालाने संबंधित समस्येचे चांगले मूल्यांकन केले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘RADR आणि क्षेपणास्त्र संरक्षण अहवालाच्या अंदाजापेक्षा हा अहवाल अधिक प्रभावी असेल आणि चीनी स्ट्राइक प्लॅनर बहुधा 100% अँटी-रनवे सबम्युनिशन्सऐवजी युद्धसामग्रीचे मिश्रण वापरतील, जसे या अहवालात नमूद केले आहे.’
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या अहवालात पायथन प्रोग्राममध्ये सांखिक मॉडेलिंग स्क्रिप्ट तयार करून चिनी हल्ल्यांच्या प्रभावाची गणना केली गेली आहे. ज्यामध्ये हवाई तळावरील रनवेचा आकार, चीनी शस्त्रास्त्रांबाबतची अचूक माहिती आणि US संरक्षण प्रणाली यासारख्या व्हेरिएबल्सचा विचार केला गेला आहे.
या अहवालाच्या लेखकांपैकी एक – केली ग्रीको म्हणतात, की “गेल्या वर्षात, मी अनेक धोरणकर्ते आणि विश्लेषकांकडून असे ऐकले आहे की अमेरिकेला जपान आणि ग्वाममधील तळांवर प्रवेश मिळेपर्यंत, चीनची पुरेशी जहाजे बुडविणे आणि तैवानचे रक्षण करणे हे युनायटेड स्टेट्ससाठी व्यवहार्य असेल आहे.’’
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)
अनुवाद- वेद बर्वे