‘Tata Advanced Systems Limited’ (TASL) ने भारतीय सैन्याला (Indian Army) अत्याधुनिक अशा ‘Tactical Access Switch’ (TAS) सिस्टीमच्या पहिल्या बॅचचे यशस्वी वितरण केले आहे. या बॅचमध्ये एकूण 40 उपकरणे असून या हस्तांतरणामुळे ‘टीएएसल’ आणि भारतीय लष्करातील परस्पर व्यवहाराचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला आहे.
‘बाय इंडिया’ (Buy India initiative) उपक्रमांतर्गत एकूण 100 सिस्टीमसाठी व्यापक करार पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून हे पहिले महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल. ज्याचा उद्देश भारतीय लष्कराच्या दळणवळणातील पायाभूत सुविधांना (Communication infrastructure) चालना देणे आणि त्यांची परिचालन क्षमता (Operational capabilities) वाढवणे हा आहे.
‘टॅक्टिकल ऍक्सेस स्विच’ काय आहे?
रिपोर्टनुसार, ‘Tactical Access Switch’ हे नवीन टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधीत्व करणारे एक अत्याधुनिक राउटर आहे. ज्याच्या साहाय्याने सर्व स्तरावरील लष्करी ऑपरेशन्सवर वेगवान आणि अखंडपणे लक्ष ठेवता येईल. ऑपरेशन्समधील ऑडिओ, व्हिडिओ आणि डेटा संप्रेषण सक्षम करण्यासाठी हे राउटर खासरित्या डिझाइन केले गेले आहे.
फ्रंटलाइन इन्फंट्री युनिट्सपासून ते रणनीतिक कमांड मुख्यालयापर्यंत हे प्रगत तंत्रज्ञान भारतीय लष्कराच्या कामी येईल. लष्कराच्या संप्रेषण नेटवर्कच्या आधुनिकीकरणात, मोहिमेदरम्यान अधिक कार्यक्षमता वाढवण्यात आणि परस्पर प्रतिसाद सुनिश्चित करण्यात ‘Tactical Access Switch’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे..
भारतीय लष्करातील विकसनशील संरक्षण आव्हाने आणि ऑपरेशनल गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या या अत्याधुनिक उपायांसह, भारतीय सशस्त्र दलांना सक्षम बनवण्याच्या मोहिमेत TASL ने एक महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
टीम भारतशक्ती
अनुवाद- वेद बर्वे