अमेरिकेचे सिनेटर- लिंडसे ग्रॅहम यांनी, सोमवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘गाझा योजना’ नाकारली, तर सिनेटर रिचर्ड ब्लुमेंथल यांनी आशा व्यक्त केली की, अरब राज्यं ट्रम्प याबाबत एक व्यवहार्य पर्याय सादर करतील.
अमेरिकेन सिनेटर्सच्या द्विपक्षीय गटातील प्रमुख खासदार असलेल्या रिचर्ड यांनी, याआधी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूसोबत तेल अविवमध्ये भेट घेतली होती, ज्यांनी रविवारी ट्रम्प यांच्या वादग्रस्त गाझा योजनेला पाठिंबा दर्शविला होता.
इस्रायली अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या प्रस्तावावर लक्ष केंद्रित केले असून, इस्रायली संरक्षणमंत्री- इस्राएल कॅट्झ यांनी सैन्याला एक अशी योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्याद्वारे गाझामधील पॅलेस्टिनी लोक स्वेच्छेने तिथून बाहेर पडू शकतात.
‘नॉन-स्टार्टर’ योजना
मात्र लिंडसे ग्रॅहम, जे ट्रम्प यांचे दीर्घकालीन सहयोगी आहेत आणि काँग्रेसमधील एक प्रमुख रिपब्लिकन सदस्य आहेत, ज्यांचा परदेश धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत प्रभाव आहे, त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “अमेरिकेने गाझा प्रदेशाला कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही रूपात ताब्यात घ्यावे अशी सिनेटची मुळीच इच्छा नाही.”
‘ब्लूमेंथल यांनी फक्त असे म्हटले की, ही योजना “नॉन-स्टार्टर” आहे.’
ट्रम्प यांच्या योजनेची अरब अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर निंदा केली आहे, तर काही टीकाकारांनी असे म्हटले आहे की, ‘ही योजना जातीय निर्मूलनाशी समांतर आहे’. नेतन्याहू यांनी सोमवारी असे देखील म्हटले की, गाझामधील पॅलेस्टिनी लोकांना परत जाण्याचा पर्याय दिला पाहिजे.
दरम्यान कॅट्झ यांनी सोमवारी सांगितले की, “ते गाझामधून पॅलेस्टिनी लोकांच्या स्वेच्छेने बाहेर जाण्याच्या मुद्द्याबाबात, मंत्रालयात एक संचलन स्थापित करतील.”
अरब देशांचा पर्याय
ग्रॅहम यावेळी म्हणाले की, “अध्यक्ष ट्रम्प यांनी एक अशी चर्चा सुरू केली जी दीर्घकाळापासून प्रलंबित होती आणि त्यामुळे आता अरब देश गझासाठी चांगला पर्याय शोधण्यासाठी जागी झाली आहेत.”
सौदी, एमीरेटी, जॉर्डन आणि इजिप्शियन अधिकारी अपेक्षेप्रमाणे या महिन्याच्या अखेरीस, गझाच्या भविष्याविषयी चर्चा करण्यासाठी भेटतील आणि ट्रम्प यांच्या प्रस्तावाला प्रतिकार करण्यासाठी, एक योजना तयार करण्याचा प्रयत्न करतील.
ब्लूमेंथल यांनी सांगितले की, जॉर्डनचे राजा अब्दुल्ला यांनी त्यांना विश्वास दिला आहे की, अरब देश एक अशी योजना सादर करतील, ज्यात इस्रायलसह संबंध सामान्य करणे, पॅलेस्टिनींसाठी आत्मनिर्णयाचा ठराव पास करणे, प्रादेशिक संरक्षण व्यवस्था आणि इस्रायलची सुरक्षा या सर्व घटकांचा समावेश असेल.
“जर हे घटक एक यथार्थवादी योजनेचा भाग असतील, तर ते या प्रदेशासाठी गेम चेंजर ठरु शकतील,” असे त्यांनी सांगितले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)