पंतप्रधान मोदींनी संयुक्त कमांडर्स परिषदेत, संरक्षण सजत्तेचा घेतला आढावा

0
पंतप्रधान मोदींनी
पंतप्रधान मोदींनी, कोलकाता येथे, 'संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स 2025' ला संबोधित केले.

पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे, भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांड मुख्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 16व्या संयुक्त कमांडर्स परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदींनी सशस्त्र दलांची सुरक्षा परिस्थिती आणि कार्यक्षमतेची तयारी यांचा आढावा घेतला.

ऑपरेशन सिंदूरनंतर, सशस्त्र दलांची सज्जता आणि नव्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान तसेच युद्धनीतीमुळे बदलत असलेल्या युद्धाच्या स्वरूपाविषयीस पंतप्रधानांना सविस्तर माहिती देण्यात आली. याशिवाय, गेल्या दोन वर्षांत राबविण्यात आलेल्या विविध सुधारणा आणि आगामी लष्करी परिवर्तनाच्या टप्प्यासाठीचा आराखडा यांचाही त्यांनी आढावा घेतला.

ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल लष्करी सेवांचे अभिनंदन करताना, पंतप्रधान मोदींनी राष्ट्रनिर्मितीमधील लष्कराच्या भूमिकेचा, समुद्री दरोडेखोरीविरोधी मोहिमांचा, संघर्षग्रस्त भागांतून भारतीयांचे सुरक्षित स्थलांतर आणि भागीदार राष्ट्रांना मानवतावादी व आपत्ती सहाय्य पुरवण्याच्या कार्याचा उल्लेख केला, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली.

2025 हे संरक्षण क्षेत्रातील ‘सुधारणांचे वर्ष’ असल्याचे अधोरेखित करत, पंतप्रधानांनी संरक्षण मंत्रालयाला भविष्यातील आव्हानांकरिता अधिक चांगल्याप्रकारे तयार राहण्यासाठी त्रिसेवा समन्वय, आत्मनिर्भरता आणि नवप्रवर्तन या उपक्रमांना गती देण्याचे निर्देश दिले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. 16 सप्टेंबर रोजी, राजनाथ सिंह कमांडर्सना संबोधित करतील, त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आपले भाषण देतील.

CCC ही दर दोन वर्षांनी भरवली जाणारी बैठक असून, ती नागरी आणि लष्करी नेतृत्वासाठी- धोरणात्मक, संरचनात्मक आणि कार्यक्षमतेसंबंधी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठीचे सर्वोच्च लष्करी व्यासपीठ आहे. यंदाच्या परिषदेचा विषय “सुधारणांचे वर्ष – भविष्यातील परिवर्तन” असा असून, सशस्त्र दलांमध्ये सुरू असलेल्या आधुनिकीकरणाशी सुसंगत आहे.

या परिषदेमध्ये, भारतीय सशस्त्र दलांमधील ‘परिवर्तनात्मक सुधारणांची गरज’ यावर विशेष भर देण्यात आला. ‘या चर्चेमध्ये आधुनिकीकरण, संयुक्त मोहिमा, सेवा समन्वय आणि बहुपरिमितीय युद्धासाठी सज्जता वाढविणे यांसारख्या अनेक धोरणात्मक मुद्द्यांचा समावेश होता,’ असे मुख्यालय IDS ने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढील दोन दिवस सुरू राहणाऱ्या या परिषदेमध्ये: लष्करी सज्जतेचा, तसेच संरचनात्मक आणि प्रशासकीय सुधारणांचा सविस्तर आढावा घेतला जाईल आणि भारताच्या लष्करी परिवर्तनासाठी पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्यासाठी रोडमॅप निश्चित करेल.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleभारतीय नौदलामध्ये ‘INS Androth’ या दुसऱ्या ASW जहाजाचा समावेश
Next articleनेपाळमधील जेन झीचे लक्ष आता नवीन अंतरिम नेत्यांच्या निवडीकडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here