Exercise Trishul: थिएटर लॉजिस्टिक्सचे युद्धशक्तीत रूपांतर करणारा सराव

0

पुणे-स्थित भारतीय लष्कराची दक्षिण कमांड, सौराष्ट्र किनारपट्टी, वाळवंटी भाग आणि खाडी क्षेत्रांचा समावेश असलेल्या ‘त्रिशूल’ (Trishul) या त्रि-सेवा सरावासाठी सज्ज होत आहे. हा सराव, केवळ लष्करी शक्तींचे प्रदर्शन नसून, भारताच्या विकसित होत असलेल्या ‘थिएटरिझेशन’ आराखड्यासाठी (theaterisation blueprint) एक महत्वाचा टप्पा आहे. जिथे केवळ नेतृत्व नाही, तर रसद/सामग्री पुरवठा व्यवस्थाही निर्णायक ठरते.

इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स आणि टेहळणी (ISR), इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर (EW) आणि सायबर ऑपरेशन्स यांना एकाच ग्रिडअंतर्गत एकत्रित करून, CDS जनरल अनिल चौहान यांच्या “जय” सिद्धांताला (JAI doctrine) कार्यान्वित करणे, ‘त्रिशूल’ सरावाचा मुख्य उद्देश आहे. हे धोरण संयुक्तता, आत्मनिर्भरता आणि नवोपक्रमाला चालना देते. 

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नेतृत्वाखाली, दक्षिण कमांडने सेवांमध्ये समन्वय आणि स्वदेशी क्षमतेसाठी ख्याती मिळवली आहे. आता, त्याच्यासमोर सर्वात मोठी आणि कठीण कसोटी आहे ती म्हणजे हे सिद्ध करणे की: भारताच्या रसद पुरवठा यंत्रणेत (logistics machinery) हवाई, जमीन आणि समुद्र या तिन्ही क्षेत्रांमध्ये अखंडपणे, वेगाने आणि आत्मनिर्भरतेने बहु-डोमेन ऑपरेशन्स टिकवून ठेवण्याची क्षमता आहे.

 थिएटर पॉवरचा लॉजिस्टिक्स कणा

स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्करात होत असलेला सर्वात आमूलाग्र बदल म्हणजे, एकात्मिक थिएटर कमांड्समध्ये भारताचा होत असलेला विकास. परंतु, रणनिती तज्ञांच्या मते, या सुधारणेचे यश किंवा अपयश अखेरीस पुरवठा व्यवस्थेवर ठरणार आहे. कमांड स्ट्रक्चर नक्कीच महत्त्वाचे आहे, मात्र पुरवठा कशाप्रकारे होतो, ताफे रसद पुरवठा कसा भरून काढतात, आणि लष्करी डेपो तो पुरवठा कशाप्रकारे टिकवून ठेवतात, हेच अखेर देशाची लढाऊ क्षमता सिद्ध करतात.

हिमालयातील दर्‍यांपासून ते सागरी वाळवंटांपर्यंत, रसदव्यवस्था ही भारताच्या सामर्थ्याची जीववाहिनी आहे, जी वकृत्वातून नव्हे, तर वेग, भारवाहनक्षमता आणि लवचिकता यांमधून सिद्ध होते.

लडाखमधील शिकवण: हिवाळी साठा आणि धोरणात्मक तयारी

2020 चा लडाख संघर्ष, हा कारगिल संघर्षानंतरचे भारतासमोरचे सर्वात मोठे गहन लॉजिस्टिक्स आव्हान होते. प्रत्येक शरद ऋतूमध्ये, बर्फ डोंगराची खिंडी सील करण्यापूर्वी, लष्कर प्रगत हिवाळी साठा (AWS – Advanced Winter Stocking) करते. ज्यामध्ये, 14,000 फुटांवर तैनात असलेल्या 50,000 हून अधिक सैनिकांसाठी अन्न, इंधन आणि दारूगोळा याची आधीच साठवणूक केली जाते. 2020 मध्ये, भारताने युद्ध आघाडीवर 90,000 टन पुरवठा हलवला होता, जी दशकांतील एक अतुलनीय कामगिरी होती. ही शिकवण आता भविष्यातील उत्तर थिएटर कमांडसाठी लॉजिस्टिक्स नियोजनाचा आधार बनली आहेत, ज्यामुळे कोणत्याही डोंगराळ भागात पुरवठा कमी पडणार नाही, याची खात्री बाळगली जाऊ शकते.

संकल्पनेतून कमांडकडे: नवीन लॉजिस्टिक्स ग्रीड

सीडीएस अंतर्गत केलेल्या सुधारणांनंतर मुंबई, गुवाहाटी आणि पोर्ट ब्लेअर येथे, संयुक्त लॉजिस्टिक्स नोड्स (JLNs) च्या माध्यमातून एकल-सेवा साठ्यांची जागा सामायिक संसाधनांनी घेतली आहे. आगामी संयुक्त थिएटर लॉजिस्टिक्स कमांड्स (JTLCs)- पुरवठा, वाहतूक आणि देखभाल थिएटर नियंत्रणाखाली एकत्रित करून हे कार्य पुढे नेतील. ‘त्रिशूल सराव’ या लॉजिस्टिक्स प्रवाहांना एका थिएटर-व्यापी प्रणालीमध्ये एकत्रित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. लष्कर अजूनही सुमारे ७५% लॉजिस्टिक्स भार सहन करते, परंतु नौदलाची पोहोच आणि हवाई दलाची उचल पुरवठा लयीत समन्वय आणते.

त्रिशूलची गती: जमीन, समुद्र आणि आकाशाला एकत्र जोडते

दक्षिण कमांडच्या कार्यक्षेत्रात, कच्छच्या दलदलीपासून ते गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत, ‘त्रिशूल’ प्रत्येक वातावरणीय परिस्थितीला एकाच कार्यान्वयित थिएटरमध्ये समाविष्ट करतो. या सरावात उभयचर लँडिंग, हवाई मदत आणि भूदल कवायती एकाच लॉजिस्टिक्स ग्रीडद्वारे एकत्र आणल्या जातात. 

‘आत्मनिर्भर भारत’ उद्दिष्टांतर्गत विकसित केलेल्या स्वदेशी प्रणाली, जसे की – ब्रिजिंग उपकरणे, मॉड्युलर इंधन साठा प्रणाली आणि स्वनिर्मित ISR प्लॅटफॉर्म्स, या सर्वांची चाचणी सरावादरम्यान प्रत्यक्ष रणभूमीच्या परिस्थितीत केली जाईल. प्रत्येक यशस्वी मिशन ही भारताच्या आत्मनिर्भर युद्धकौशल्य परिसंस्थेची ठोस पुष्टी ठरेल.

BRO: विजयाचे नवे मार्ग तयार करत आहे

बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO) ही थिएटर शक्तीची मूक समर्थक आहे. पाच वर्षांत, त्यांनी दारबुक-श्योक-डीबीओ रस्ता, तसेच सेला आणि नेचिफू बोगद्यांसह 8,000 कोटी रुपयांचे 330 प्रकल्प पूर्ण केले आहेत.

संरक्षण मंत्रालय, आता रस्त्यांच्या प्राधान्यांना ऑपरेशनल टाइमलाइईनसह संरेखित करते. यातील यश “टाइम-टू-फ्रंट” द्वारे मोजले जाते. न्योमा आणि मिस्सामारीला नवीन रेल्वे लिंक्स आणि बंदरांपासून एअरबेसपर्यंत दक्षिणेकडील फीडर लाईन्स, लॉजिस्टिक्स लॅगमध्ये लक्षणीय घट करतील आणि इंधन संयुक्त गतिशीलता वाढवतील.

इंधन, शक्ती आणि डेटा: नवीन लॉजिस्टिक्स त्रिकूट

आधुनिक युद्धासाठी, केवळ रसद आणि डिझेल पुरवठ्यापेक्षाही जास्त मागणी आहे, ती डेटा, शक्ती आणि बँडविड्थ या लॉजिस्टिकल पुरवठ्याची. आगामी संयुक्त हवाई संरक्षण कमांड (JADC) स्थिर इलेक्ट्रॉनिक पुरवठा साखळ्या, ताकदीतील लवचिकता आणि सुरक्षित डेटा लिंक्सवर अवलंबून असणार आहे. ‘त्रिशूल’ सरावादरम्यान, सायबर आणि ईडब्ल्यू (EW) युनिट्स या परिसंस्थेची कसून चाचणी घेतील, जेणेकरून इंधनाच्या लाईन्सप्रमाणेच माहितीचा प्रवाहही अखंड राहील.

विजयाचे मापदंड: टनेजपासून वेगापर्यंत

रसद पुरवठा व्यवस्थेचे यश हे केवळ आकर्षकतेने नाही, तर कार्यक्षमतेने मोजले जाते.  किती सामग्री पोचवली, त्यासाठी किती वेळ लागला, आणि सामग्री योग्य ठिकाणी ठेवली गेली की नाही, हेही निकष महत्वाचे असतात.

जर लडाखमधील 90,000 टन साठ्याचा बेंचमार्क स्थिर तयारी दर्शवतो, तर ‘त्रिशूल’ सराव गतिशील आणि विविध विभागांमध्ये टिकून राहण्याची क्षमता तपासतो. इंधन भरण्याचा वेळ, ताफ्यांचे मार्गदर्शन, आणि पुनर्पुरवठ्याशिवाय टिकून राहण्याची क्षमता तपासतो.

हेच आता युद्धाचे नवे मापदंड आहेत, जिथे रसदव्यवस्थेची तयारी सैन्यसंख्या किंवा उपकरणांपेक्षा जास्त महत्त्वाची ठरते.

आत्मनिर्भर लॉजिस्टिक्स: टिकून राहणारा नवोपक्रम

‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाने लॉजिस्टिक्सला केवळ बॅकेंड फंक्शन म्हणून कार्यरत न ठेवता, त्याला एक लढाऊ शक्ती वाढवणारे साधन बनवले आहे. स्वदेशी वाहने, मॉड्यूलर निवासस्थान, वंगण आणि अति-उंचीवरील शिधा, आता आघाडीवरील मालमत्ता आहेत. iDEX आणि SPRINT अंतर्गत, स्टार्टअप्स आता स्वयंचलित वस्तूंची यादी प्रणाली आणि हायब्रीड इंधन तंत्रज्ञान विकसित करत आहेत, ज्यामुळे बाहेरील अवलंबित्व कमी होते आणि निर्बंध किंवा नाकाबंदीच्या परिस्थितीत लवचिकता वाढते. त्रिशूलचा स्वदेशी प्रणालींवरचा आग्रह सुनिश्चित करतो की नवोपक्रम, आत्मनिर्भरता आणि कार्याची सज्जता एकत्र प्रगती करतील की नाही.

लॉजिस्टिक्स क्लॉकचे समक्रमण 

थिएटरिझेशनसाठी ‘लॉजिस्टिक्स क्लॉक’ या एकसंध लयीची आवश्यकता आहे. प्रत्येक इंधन भरण्याचे ठिकाण, डेपो डिस्पॅच आणि हवाई उचल  एकाच वेळी समक्रमित होणे आवश्यक आहे. लष्कर गती प्रदान करते, नौदल आणि वायुसेना तिची पोहोच वाढवतात आणि ते एकत्र येऊन मनुष्यबळ, सामग्री आणि माहितीचा प्रवाह टिकवून ठेवतात.

दक्षिणी कमांडचा ‘त्रिशूल’ सराव, भविष्यातील द्वीपकल्पीय थिएटर कमांडसाठी एक पाया आहे, जिथे उभयचर आणि हवाई-जमिनीवरील युद्धतंत्र भारताच्या दक्षिणेकडील सीमेला बळकटी देतील.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleUN@80: दहशतवादाला आळा घालण्यासाठी सुधारणांची गरज- भारत
Next articleसंयुक्त राष्ट्र महासचिवपदासाठी, खुल्या जागतिक निवडीचा अमेरिकेचा प्रस्ताव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here