Wednesday, March 11, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi अबू धाबी फायनान्स समिट डेटा: उच्च-प्रोफाइल व्यक्तींची माहिती झाली सार्वजनिक

अबू धाबी फायनान्स समिट डेटा: उच्च-प्रोफाइल व्यक्तींची माहिती झाली सार्वजनिक

0

अबू धाबी येथील एका परिषदेत सहभागी झाल्यानंतर ज्यांचे पासपोर्ट आणि इतर ओळखपत्रे ऑनलाइन उघडकीस आली, त्यात ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन आणि हेज फंड अब्जाधीश ॲलन हॉवर्ड यांचा समावेश असल्याचे वृत्त फायनान्शियल टाईम्सने दिले आहे.

असुरक्षित सर्व्हरवर आढळली शेकडो कागदपत्रे

एफटीने कागदपत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, अबू धाबी फायनान्स वीकशी (ADFW)  संबंधित असुरक्षित क्लाउड स्टोरेज सर्व्हरवर 700 हून अधिक पासपोर्ट आणि राज्य ओळखपत्रे स्कॅन केल्याचे आढळले, हा कार्यक्रम डिसेंबरमध्ये संपन्न झाला आणि त्यात 35 हजारांहून अधिकजणांना आमंत्रित केले गेले होते. सरकारने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

ज्यांची ओळखपत्रे उघड झाली होती त्यामध्ये अमेरिकन गुंतवणूकदार आणि व्हाईट हाऊसचे माजी कम्युनिकेशन्स डायरेक्टर अँथनी स्कारामुची यांचाही समावेश होता, असे एफटीने म्हटले आहे.

हॉवर्ड यांनी टिप्पणी देण्यास नकार दिला, तर कॅमेरॉन आणि स्कारामुची यांनी रॉयटर्सच्या टिप्पणीसाठीच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.

तिसरा गट या असुरक्षिततेला जबाबदार-कार्यक्रम आयोजकांकडून खुलासा

“ADFW 2025 मध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींची संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे नोंदवून घेणाऱ्या तिसऱ्याच गटाकडे असणारे असुरक्षित स्टोरेज वातावरण या सगळ्या प्रकाराला कारणीभूत ठरले,” असे ADFW ने रॉयटर्सला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

“ओळख झाल्यानंतर लगेचच त्यांची कागदपत्रे सुरक्षित करण्यात आली आणि आमच्या सुरुवातीच्या पुनरावलोकनातून असे दिसून आले आहे की या स्टोअरजमध्ये फक्त काहीजणांपुरताच प्रवेश मर्यादित करण्यात आला होता,” ADFW ने पुढे म्हटले आहे.

हा डेटा एका साध्या वेब ब्राउझरचा वापर करणाऱ्या कोणालाही उपलब्ध झाला होता, असे वृत्त FTA ने,  फ्रीलांस सुरक्षा संशोधक आणि सल्लागार रोनी सुचोव्स्की यांच्या हवाल्याने दिले आहे. FT ने सोमवारी माहिती लीक झाल्याप्रकरणी ADFW शी संपर्क साधल्यानंतर सर्व्हर सुरक्षित करण्यात आला, असे वृत्तात म्हटले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous article2020 मध्ये चीनने नवी अणुचाचणी केल्याचा अमेरिकेचा पुन्हा दावा, बीजिंगचा इन्कार
Next articleIndia Signals Maritime Resolve at IFR 2026 in Visakhapatnam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here