दलाई लामांचे “मी पुनर्जन्माचा विचार करत नाही.” हे साधे वक्तव्य म्हणजे अर्थ शी जिनपिंग यांना मिळालेली चपराक असून, चीनने आपल्या देशात घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याची आठवण करून देणारा स्पष्ट संदेश आहे असे तिबेटविषयक अभ्यासकांचे मत आहे.
6 जुलै रोजी 89 वर्षात पदार्पण करणारे तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा हे धरमशाला येथे आलेल्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते. त्यावेळी पत्रकारांनी पुनर्जन्माबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील विधान केले. अमेरिकन सभागृहाच्या माजी सभापती नॅन्सी पेलोसी यांच्यासह अमेरिकी शिष्टमंडळ दलाई लामा यांची बुधवारी भेट घेणार आहेत. धरमशाला येथील मुख्य बौद्ध मंदिरात ही भेट होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पत्रकारांशी दलाई लामा यांचा संवाद झाला.
त्यांचा उत्तराधिकारी असणाऱ्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दलाई लामा म्हणाले, “मी पुनर्जन्माचा विचार करत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी माझ्या उर्जेचा वापर जास्तीत जास्त लोकांना मदत करण्यासाठी केला पाहिजे.”
या बैठकीनंतर नवी दिल्लीतील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने त्वरित एक्सवर आपले याबाबतचे विचार मांडताना तिबेटी आध्यात्मिक नेत्याने या संदर्भात त्यांचे कायदे, विधी आणि परंपरांचे पालन करावे अशी मागणी केली.
चीन सरकार धार्मिक श्रद्धेच्या स्वातंत्र्याचे धोरण राबवत असल्याचा दावा करत प्रवक्त्याने सांगितले की, “14 वे दलाई लामा स्वतः धार्मिक विधी आणि ऐतिहासिक परंपरांनुसार निवडले आणि ओळखले गेले आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्याला तत्कालीन केंद्र सरकारने मान्यता दिली. त्यामुळे दलाई लामांबरोबरच बुद्धांच्या जिवंत पुनर्जन्माने चिनी कायदे आणि नियमांचे पालन केले पाहिजे. त्याबरोबर धार्मिक विधी आणि ऐतिहासिक परंपरांचे पालन केले पाहिजे.
Since @thetribunechd @ajaynewsman is interested in the reincarnation of the #DalaiLama, let me make it clear. Reincarnation of living Buddhas, as a unique institution of inheritance in Tibetan Buddhism, comes with a set range of rituals and conventions. The Chinese government…
— Spokesperson of Chinese Embassy in India (@ChinaSpox_India) June 18, 2024
दिल्लीतील ज्येष्ठ तिबेट निरीक्षकांच्या मते दलाई लामा यांची ही टिप्पणी वरवर पाहता निरुपद्रवी वाटू शकते. पण प्रत्यक्षात ती चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना चेहऱ्यावर मारलेली चपराक होती आणि पुनर्जन्माशी निगडीत मुद्द्यांपासून चीनने दूर रहावे याची आठवण करून देणारी होती.
धरमशाला येथील केंद्रीय तिबेटी प्रशासनाचे प्रवक्ते तेनझिन लेक्शे यांनी चिनी दूतावासातील प्रवक्त्याच्या पोस्टला प्रतिसाद देताना सप्टेंबर 2011 मध्ये दलाई लामा यांनी केलेल्या पुनर्जन्माच्या संकल्पनेवरील भाषणाच्या अनुवादित आवृत्तीकडे त्यांचे लक्ष वेधले.
या मजकुरासोबत 22 फेब्रुवारी 1940 रोजी तिबेटमधील ल्हासा येथे दलाई लामा यांच्या अधिकृत राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी काढलेला त्यांचा कृष्णधवल (Black & White) फोटोही आहे.
आपल्या 2011च्या भाषणात दलाई लामा यांनी 1642 पासून राजकीय आणि आध्यात्मिक नेते म्हणून विविध दलाई लामा कसे कार्यरत होते यावर भाष्य केले असून “निहित राजकीय हितसंबंधांचा त्यांचा स्वतःचा राजकीय अजेंडा पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्म प्रणालीचा गैरवापर होण्याचा स्पष्ट धोका आहे,” असा इशारा दिला.
1972 मध्ये धरमशाला येथे दलाई लामा यांची पहिल्यांदा भेट घेणारे आणि अर्ध्या शतकापासून तिबेटी संस्कृती तसेच जीवनाचे दस्तऐवजीकरण ( Documentation) करणारे दिल्लीस्थित पत्रकार आणि तिबेटीशास्त्रज्ञ विजय क्रांती म्हणतात, “पुनर्जन्माबाबत हा दावा करून दलाई लामा यांनी शी जिनपिंग यांना त्यांच्या पुनर्जन्माशी किंवा तिबेटी महामाया बौद्ध धर्मातील तुल्कुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्याही तिबेटी पुनर्जन्माशी संबंधित मुद्द्यांपासून दूर राहण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दलाई लामा यांचा पुनर्जन्म गिळंकृत करण्याचा प्रयत्न करण्याची चीनची योजना सर्वश्रुत आहे.”
त्यामुळे दलाई लामा यांची टिप्पणी ही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना मिळालेली चपराक होती, असे ते मानतात.
14 व्या दलाई लामा यांना केंद्र सरकारने मान्यता दिली होती, असा दावा करत त्यांनी चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याचे विधानही खोडून काढले.
हा पूर्णपणे निरर्थक, खोटारडा आणि इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा खोडकर आणि निर्लज्ज मार्ग आहे. वस्तुस्थिती अशी आहे की ल्हासामध्ये दलाई लामा यांना पदच्युत केले गेले त्यावेळी उपस्थित असलेल्या चिनी प्रतिनिधींना कोणतेही खास विशेषाधिकार नव्हते. पटोला राजवाड्यात उपस्थित असलेल्या इतर परदेशी पाहुण्यांपेक्षा किंवा मान्यवरांपेक्षा त्यांना कोणताही वेगळा दर्जा मिळालेला नव्हता.
“धर्माचा निषेध आणि नाश करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला चिनी कम्युनिस्ट पक्ष अचानक पुनर्जन्माशी संबंधित धार्मिक विधींचे पुरस्कर्ते बनण्याचा प्रयत्न करत आहे हे हास्यास्पद आहे.”
दिल्लीतील सेंटर फॉर हिमालयन एशिया स्टडीज अँड एंगेजमेंटचे (चेस) प्रमुख विजय यांनी 2007 मध्ये चिनी सरकारने जारी केलेल्या ऑर्डर/5 कडे लक्ष वेधले.
नंतर कायद्यात रूपांतरीत झालेला हा आदेश, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला सर्व तिबेटी लामांच्या (तुल्कुस) नवीन अवतारांचा शोध घेणे, त्यांची ओळख पटवणे, त्यांना प्रस्थापित करणे आणि त्यांना शिक्षित करणे असे विशेष अधिकार देतो. 90 च्या दशकात, पंचेन लामा आणि कर्मपा यांचे पुनर्जन्म प्रस्थापित करण्याचे चिनी प्रयत्न दुर्दैवाने अयशस्वी झाले. खरे पंचेन लामा कुठे आहेत हे आजतागायत माहीत नसले तरी कर्मपा चिनी नियंत्रणातून निसटले.
ते पुढे म्हणाले की, अमेरिकी काँग्रेसने नुकत्याच एकमताने मंजूर केलेल्या तीन ठरावांनुसार हे स्पष्ट झाले आहे की दलाई लामा किंवा इतर कोणत्याही अवतारातील लामांची निवड आणि त्यांना प्रस्थापित करण्यात चीनची कोणतीही भूमिका नाही.
तृप्ती नाथ