Dustlik-VI: भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील लष्करी सरावाचा प्रारंभ

0

भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील, सहाव्या संयुक्त लष्करी सरावाचा (Exercise Dustlik-VI), पुण्यातील औंध येथील Foreign Training Node येथे प्रारंभ झाला. 16 एप्रिल ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत होणारा हा द्वीपक्षीय सराव दोन आठवड्यांचा असून, दहशतवादविरोधी कारवायांमध्ये दोन्ही देशांचा समन्वय वाढवणे आणि सेमी-अर्बन क्षेत्रांतील ऑपरेशन्समधील दोन्ही लष्करांच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.

या वर्षीच्या सरावामध्ये भारतीय लष्करातील 60 सदस्यांचा ताफा सहभागी झाला असून, त्यामध्ये जाट रेजिमेंटच्या एका बटालियनचा समावेश आहे. याशिवाय भारतीय हवाई दलाचेही (IAF) काही घटक यात सहभागी आहेत. उझबेकिस्तानकडूनही त्यांच्या लष्करातील अधिकारी आणि जवान सरावात सहभागी झाले आहेत.

‘Exercise Dustlik’ हा भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात दरवर्षी आयोजित होणारा लष्करी सराव असून, तो एकदा भारतात आणि एकदा उझबेकिस्तानमध्ये, अशा प्रकारे पर्यायी स्वरूपात घेतला जाते. मागील सराव एप्रिल 2024 मध्ये, उझबेकिस्तानच्या तर्मेझ जिल्ह्यात झाला होता.

Semi-Urban भागात दहशतवादविरोधी मोहिम

भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात पुणे येथे सुरू झालेल्या ‘Exercise Dustlik-VI’ या संयुक्त लष्करी सरावाचा मुख्य उद्देश आहे Semi-Urban परिसरातील बहुआयामी आणि संयुक्त पातळीवरील दहशतवादविरोधी मोहिमा. या सरावाचा उद्देश, दहशतवादी गटांनी भूभाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला त्वरित प्रतिसाद देण्याच्या क्षमतेचा विकास करणे हा आहे.

सरावातील प्रशिक्षणामध्ये, बटालियन स्तरावर संयुक्त ऑपरेशन्स सेंटर स्थापन करणे, नागरी लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्याच्या उपाययोजना करणे, शोधणे व नष्ट करणे (Search-and-Destroy) यासाखी ऑपरेशन्स, समन्वित हल्ले व कारवाया, हवाई साधनांच्या वापरासह दहशतवादी ठिकाणांचा नायनाट… अशा विविध प्रकारांचा समावेश आहे.

भारतीय लष्करानुसार, लष्कर आणि हवाई दलाच्या विशेष दलांचे (Special Forces) संयुक्तपणे हेलिपॅड सुरक्षीत करण्याचे सिम्युलेशनही या सरावामध्ये होईल, जे पुढील मोहिमांसाठी प्रक्षेपण केंद्र म्हणून वापरले जाईल.

याशिवाय, सरावातील प्रमुख हवाई ऑपरेशन्समध्ये: स्पेशल हेलिबॉर्न ऑपरेशन्स (SHBO), स्मॉल टीम इन्सर्शन अँड एक्सट्रॅक्शन (STIE), आणि देखरेखीसाठी हेलिकॉप्टर तैनात करणे यांचा समावेश असेल.

ड्रोन तंत्रज्ञान व लॉजिस्टिक्सवर भर

युद्धक्षेत्राच्या बदलते स्वरुप लक्षात घेता, भविष्याच्या दृष्टीने ड्रोन्स (Drones) व काउंटर-यूएएस (Unmanned Aerial System) तंत्रज्ञानाच्या वापर अभ्यासाचा समावेश, सरावात करण्यात आला आहे. याशिवाय, भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून होणारा लॉजिस्टिक पुरवठा देखील ऑपरेशनल गती टिकवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.

धोरणात्मक संबंधांना चालना

Dustlik-VI हा सराव, केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित न राहता भारत-उझबेकिस्तान यांच्यातील परस्पर सहकार्य, द्विपक्षीय धोरणात्मक संबंध, आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या वृद्धीकरता, एक प्रमुख व्यासपीठ ठरतो आहे. यामधून दोन्ही देशांच्या लष्करी यंत्रणांना Joint TTPs (Tactics, Techniques, Procedures) ची देवाण-घेवाण करता येते आणि बहुआयामी सुरक्षा भागीदारी अधिक बळकट होते.

या सरावामुळे दोन्ही देशांचे प्रादेशिक स्थैर्य आणि दहशतवादविरोधी सहकार्य यावरील कटिबद्धताही अधोरेखित होते.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleUranium Shortage: भारताच्या अणुऊर्जा योजनांवर परिणाम होईल?
Next articleDAP-2020 : संरक्षण संपादन प्रक्रियेचे सोप्या शब्दांत विश्लेषण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here