मंगळवारी, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी, “तालिबानसोबत ‘डबल गेम’ खेळण्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तान, स्वतःच्याच दुटप्पी धोरणाच्या जाळ्यात अडकला आणि फसवला गेला” अशी जोरदार टीका केली.
अफगाणिस्तानमधील पाकिस्तानच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की, “पाकिस्तानने यापूर्वी दहशतवादाला खतपाणी घालून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे, ज्याचा फटका आता त्यांना बसतो आहे.”
“पाकिस्तान तालिबानसोबत दुहेरी खेळ खेळत होता. तो कधी तालिबानच्या बाजूने होता तक कधी समोरच्यांचा बाजूने. मात्र जेव्हा अमेरिकन फौजांनी माघार घेतली, तेव्हा त्यांचा हा डबल टिकू शकला नाही,” असे जयशंकर यांनी गुजरातमधील चारोतर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात बोलताना सांगितले.
“या दुहेरी खेळातून पाकिस्तानला जे काही फायदे मिळत होते, ते देखील अमेरिका अफगाणिस्तानमधून गेल्यानंतर कमी झाले. शिवाय, त्यांनीच पोसलेली दहशतवादाची पिलावळ अखेर त्यांच्यावरच उलटली,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई हल्ले – एक ‘टर्निंग पॉईंट’
“2008 मध्ये झालेले मुंबईवरील दहशतवादी हल्ले, हे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये एक निर्णायक वळण ठरले,” असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. “या घटनेनंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिकच बिघडले आणि ती दरी अजूनही कायम आहे नाही,” असेही त्यांनी नमूद केले.
“इथून पुढे शेजारी देशाकडून अशा प्रकारचे वर्तन सहन केले जाऊ शकत नाही,” अशी सर्व भारतीयांची एकत्रित भावना झाल्याचे,” ते म्हणाले. “भारतीय समाजात ही भावना अत्यंत तीव्र होती, पण त्यावेळी तत्कालीन सरकारने ती पूर्णपणे समजून घेतली की नाही, हा वेगळा मुद्दा आहे,” असे त्यांनी पुढे जोडले.
गेल्या दहा वर्षात भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या वाटचालीत झालेला फरक अधोरेखित करत जयशंकर म्हणाले, “भारताने स्वतःमध्ये आमूलाग्र परिवर्तन केले आहे, पण पाकिस्तान त्यांच्या ‘वाईट सवयी’ सोडायला तयार नाही.”
“2014 नंतर जेव्हा भारतात नवीन सरकार आले, तेव्हा पाकिस्तानला ठाम संदेश देण्यात आला की, दहशतवादी कृत्यांचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असे जयशंकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
“या मधल्या काळात भारताने आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या प्रगती केली आहे, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आमची पत वाढली आहे, पण पाकिस्तानने मात्र त्यांचे जुने धोरणच चालू ठेवले आहे,” असेही ते म्हणाले.
भारताच्या ‘मौल्यवान वेळेला” पाकिस्तान पात्र नाही
जयशंकर यांनी नमूद केले की, “भारत खूप पुढे गेला आहे, भारतीयांनी पाकिस्तानचा विचार करून त्यांचा मौल्यवान वेळ वाया घालवण्याचे” कोणतेही कारण नाही.”
परराष्ट्रमंत्र्यांनी हे विधान, अमेरिकेने 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला भारतात प्रत्यार्पित केल्यानंतर काही दिवसांतच केले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात दहशतवादविरोधी लढ्यात आणि गुप्तचर माहितीच्या देवाणघेवाणीमध्ये घनिष्ठ सहकार्य आहे आणि दोन्ही देशांचे संबंध “विशेष आणि सन्मानीय राजकीय भागीदारी” म्हणून ओळखले जातात.
राणाच्या प्रत्यार्पणानंतर, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटले की, “आम्ही तहव्वुर हुसेन राणा याला भारतात प्रत्यार्पित केले आहे, ज्याने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन केले होते. भारतासोबत मिळून आम्ही 166 निष्पाप लोकांना, ज्यामध्ये 6 अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केला. मला आनंद आहे की अखेर तो दिवस उजाडला.”
त्यावर प्रतिक्रिया देताना जयशंकर म्हणाले की, “आपल्या दोन्ही देशांमधील दहशतवादविरोधी सहकार्याचे मी कौतुक करतो. 26/11 च्या पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.”
टीम स्ट्रॅटन्यूज