DRDO ने बहुउद्देशीय ‘Quantum Technology संशोधन केंद्राचे’ केले उद्घाटन

0

संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ने, 27 मे 2025 रोजी, दिल्लीतील मेटकॅल्फ हाऊस येथे, ‘Quantum Technology संशोधन केंद्राचे‘ (QTRC) उद्घाटन केले. संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव व DRDO चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांच्या हस्ते. या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.  धोरणात्मक आणि संरक्षण क्षेत्रासाठी स्वदेशी ‘क्वांटम’ क्षमतांना बळकटी देणे,हा या केंद्राच्या उभारणीमागील प्रमुख उद्देश आहे.

QTRC मध्ये, अत्याधुनिक प्रयोगशाळा प्रणाली असून, त्या महत्त्वाच्या क्वांटम क्षेत्रांतील संशोधन आणि विकासासाठी अनुकूल आहेत. DRDO च्या या केंद्राच्या मुख्य क्षमता खालीलप्रमाणे आहेत:

  • Vertical-Cavity Surface-Emitting Lasers (VCSELs) आणि Distributed Feedback Lasers यांचे वैशिष्ट्यपूर्ण परीक्षण
  • सिंगल फोटॉन स्त्रोतांचे मूल्यांकन करण्यासाठी टेस्ट-बेड्स
  • सूक्ष्म-निर्मित अल्कली वाष्प कोशिकांचे परीक्षण करण्यासाठी उपकरणे

‘Quantum Key Distribution (QKD) तंत्रज्ञान’ विकसित करण्यासाठी आणि त्याची पडताळणी करण्यासाठी प्रयोगात्मक प्लॅटफॉर्म, जे पोस्ट-क्वांटम युगात अत्यंत सुरक्षित संवादासाठी उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमाचे नेतृत्व DRDO च्या Scientific Analysis Group (SAG) ने केले आहे.

या केंद्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यात DRDO च्या Solid State Physics Laboratory (SSPL) च्या नेतृत्वाखाली मूलभूत तंत्रज्ञानांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे:

अत्यंत अचूक वेळ मोजण्यासाठी Coherent Population Trapping आधारित अतिसूक्ष्म अणुघडी, जी Global Navigation Satellite System (GNSS) अनुपलब्ध परिस्थितीत उपयुक्त ठरेल.

Optically Pumped Magnetometry आधारित अणु चुंबकमापी, जो अतिसंवेदनशील चुंबकीय क्षेत्रांचा शोध घेण्यासाठी उपयुक्त आहे, त्याचाही यात समावेश आहे.

अत्याधुनिक Solid-State Quantum Devices आणि साहित्य

DRDO भारतातील क्वांटम क्षेत्रातील प्रमुख उपक्रमांचे नेतृत्व करत असून, क्वांटम सेन्सिंग, सुरक्षित संवाद आणि पोस्ट-क्वांटम क्रिप्टोग्राफीसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशनमध्ये महत्त्वाचा भागीदार म्हणून DRDO स्वदेशी नवकल्पनांना प्रोत्साहन देत असून, देशाच्या रणनीतिक भविष्यासाठी स्वतंत्र क्वांटम तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कटिबद्ध आहे. भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा आणि भविष्यातील संघर्षांच्या स्वरूपावर प्रभाव टाकणाऱ्या महत्त्वाच्या तंत्रज्ञानांमध्ये पारंगत होण्याचा संकल्प केला आहे.

या उद्घाटन समारंभाला महासंचालक (मायक्रो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, संगणकीय प्रणाली आणि सायबर प्रणाली) सुमा वरुघीस या उपस्थित होत्या, ज्यांनी या आधुनिक केंद्राची संकल्पना मांडण्यात मोलाची भूमिका बजावली. महासंचालक (संसाधन व व्यवस्थापन) डॉ. मनु कोरुल्ला, तसेच SSPL व SAG चे संचालक, वरिष्ठ वैज्ञानिक आणि अन्य मान्यवर या समारंभाला उपस्थित होते.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleपहलगामनंतर पाकिस्तानने भारतावर कशाप्रकारे Cyber War लादले?
Next articleChina explosion: केमिकल प्लांटमधील स्फोटात 5 ठार, तर 19 जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here