China explosion: केमिकल प्लांटमधील स्फोटात 5 ठार, तर 19 जखमी

0

चीनच्या पूर्वेकडील शानदोंग प्रांतात, मंगळवारी एका केमिकल प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये किमान 5 जणांचा मृत्यू झाला असून, 19 जण जखमी झाल्याची आणि 6 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती, सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने मंगळवारी रात्री उशीरा जाहीर केली.

हा स्फोट, मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या काही मिनिटांपूर्वी, वेइफांग शहरातील शानदोंग योडाओ केमिकल कंपनीच्या प्रकल्पात झाला. या प्रंचंड स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला.

चीनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणि रॉयटर्सने पडताळलेल्या व्हिडिओंमध्ये, स्फोटानंतर नारंगी आणि काळ्या रंगाचे धूराचे महाकाय लोट आकाशात दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये स्फोटामुळे जवळील इमारतींच्या खिडक्या उडून गेल्याचे दिसते आहे.

200 हून अधिक आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी

चीनच्या आपत्कालीन प्रतिसाद विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 200 हून अधिक आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी तात्काळ पोहोचले. द बीजिंग न्यूज, या सरकारी माध्यमाने प्रसिद्ध केलेल्या ड्रोन व्हिडिओमध्ये, योडाओ केमिकल प्रकल्पातून आणि जवळील दुसऱ्या एका ओळख न पटलेल्या प्लांटमधून धूर निघताना दिसत आहे.

Baidu Maps नुसार, योडाओच्या प्रकल्पाशेजारी एक वस्त्र उत्पादन कंपनी, एक यंत्रसामग्री कंपनी, आणि औद्योगिक कोटिंग मटेरिअल बनवणारी कंपनी आहे.

वेइफांग पर्यावरण विभागाने, स्फोटाच्या ठिकाणी तपासणीसाठी कर्मचारी पाठवले आहेत. अद्याप घटनेचा तपशीलवार अहवला आलेला नसून, दरम्यान स्थानिक रहिवाशांना मुखवटे घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे बीजिंग न्यूजने सांगितले.

शेअर बाजारात घसरण

शानदोंग योडाओ केमिकल कंपनी, ही हिमाईल ग्रुपची मालकीची आहे. अपघातानंतर, हिमाईल ग्रुपची सूचीबद्ध कंपनी असलेल्या हिमाईल मेकॅनिकलचे शेअर्स, 3.6% टक्क्यांनी घसरले.

ही कंपनी ऑगस्ट 2019 मध्ये स्थापन झाली असून, गाओमी रेन्हे केमिकल पार्क, वेइफांग येथे स्थित आहे. सुमारे 47 हेक्टर (116 एकर) जागेवर पसरलेली ही कंपनी, 300 हून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देते. कंपनीमध्ये कीटकनाशके व औषधनिर्मितीसाठी रासायनिक घटक तयार करते.

यापूर्वीचे धोकादायक स्फोट

चीनमध्ये यापूर्वीही अशा प्रकारचे घातक स्फोट घडले आहेत:

  • 2024 मध्ये निंगशिया प्रांतात
  • 2023 मध्ये जियांग्शी प्रांतात
  • 2025 मध्ये टिआनजिन बंदरातील दोन मोठ्या स्फोटांमध्ये, 170 जणांचा मृत्यू आणि 700 पेक्षा जास्त जखमी

याचवर्षी शानदोंग मधील अन्य एका प्रकल्पात 13 जण मृत्युमुखी पडले होते, ज्यानंतर चीन सरकारने रासायनिक साठवणुकीवरील कायदे कठोर केले होते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleDRDO ने बहुउद्देशीय ‘Quantum Technology संशोधन केंद्राचे’ केले उद्घाटन
Next articleभारत आणि मालदीवने संयुक्त आर्थिक व सागरी सुरक्षा भागीदारीला चालना दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here