भारत आणि मालदीवने संयुक्त आर्थिक व सागरी सुरक्षा भागीदारीला चालना दिली

0

भारत आणि मालदीव यांच्यातील, दुसरी उच्चस्तरीय प्रमु गटांची (HLCG) बैठक, सोमवारी नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांनी व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीसाठी तयार केलेल्या संयुक्त दृष्टिकोनाच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले.

बैठकीनंतर MEA (Ministry of External Affairs) चे प्रवक्ते- रणधीर जयस्वाल यांनी, X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, “राजकीय देवाणघेवाण, संरक्षण व सुरक्षा सहकार्य, विकास भागीदारी, व्यापार, अर्थव्यवस्था, आरोग्य आणि नागरी संबंध अशा विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर भर देत, दोन्ही देशांनी व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीच्या संयुक्त दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केले.”

परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला खलील यांचा भारत दौरा

मालदीवचे परराष्ट्रमंत्री डॉ. अब्दुल्ला खलील, 25 ते 27 मे 2025 दरम्यान, भारत दौऱ्यावर आले होते.

या वर्षातील जानेवारी आणि मार्चनंतरची, ही त्यांची तिसरी भारत भेट होती.

हा दौरा दोन्ही देशांतील वाढती राजकीय देवाणघेवाण आणि द्विपक्षीय संबंधांच्या वाढीचे प्रतीक मानला जात आहे.

मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू, यांच्या ऑक्टोबर 2024 मधील भारत दौऱ्यावेळी स्वीकारलेल्या ‘व्यापक आर्थिक व सागरी सुरक्षा भागीदारीच्या’ दस्तऐवजाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे हे बैठकीचे प्रमुख उद्दिष्ट होते.

याच दौऱ्यात, डॉ. खलील यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील केली.

भारत-मालदीव संबंधांचे महत्व

मालदीव हा भारताचा प्रमुख सागरी शेजारी असून, ‘Neighbourhood Firs’ धोरणांतर्गत आणि ‘Vision MAHASAGAR’ (Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions) या दृष्टीकोनातून मालदीव भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे.

MEA च्या निवेदनानुसार, भारत-मालदीव यांच्यातील व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारी अधिक दृढ करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता.

ही बैठक, दोन्ही देशांमधील रणनीतिक भागीदारीला चालना देणारी आणि हिंद महासागर क्षेत्रातील सहकार्य वाढवणारी ठरली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleChina explosion: केमिकल प्लांटमधील स्फोटात 5 ठार, तर 19 जखमी
Next articleसुरक्षेच्या दृष्टीने आशियाई देशांकडून शस्त्रास्त्र खर्च आणि संरक्षण संशोधनात वाढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here