संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने, अत्यंत कमी पल्ल्याच्या ‘VSHORAD’ या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीच्या सलग तीन उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पूर्ण करत, एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. 1 फेब्रुवारी रोजी चांदीपूर, ओडिशाच्या किनारपट्टीवर या चाचण्या पार पडल्या, ज्याद्वारे हाय-स्पीड आणि कमी-उंचीवरील लक्ष्यांविरुद्धची सुरक्षा प्रणालीची अचूकता आणि परिणामकारकता यांचे दर्शन घडले.
“तिन्ही उड्डाण-चाचण्यांदरम्यान, क्षेपणास्त्रांनी विविध उड्डाणांच्या स्थितीत कमी उडणाऱ्या ड्रोनची नक्कल करत, थर्मल स्वाक्षरी कमी करून आपल्या टार्गेट्सना रोखले व पूर्णत: नेस्तनाभूत केले. या उड्डाण-चाचण्या DRDO च्या अंतिम तैनाती कॉन्फिगरेशनमध्ये घेण्यात आल्या, ज्यामध्ये दोन फील्ड ऑपरेटरने शस्त्रास्त्रांची तयारी, टार्गेट संपादन आणि क्षेपणास्त्र गोळीबार यांचा समावेश होता,” असे डीआरडीओने एका निवेदनात म्हटले आहे.
VSHORAD क्षेपणास्त्र प्रणाली ही, भारतीय सशस्त्र दलांच्या तात्काळ हवाई संरक्षण क्षमतांना बळ देण्याकरता विकसित केलेली एक महत्त्वपूर्ण संपत्ती आहे. ही प्रणाली 250 मीटर ते 6,000 मीटर लांबीचे आणि 12,000 फूट उंचीपर्यंतचे लक्ष्य गाठू शकते. भारतीय लष्कराने आधीच 500 प्रक्षेपक आणि 3,000 क्षेपणास्त्रांची गरज भासवली आहे, तर हवाई दल आणि नौदलाने 300 प्रक्षेपक आणि 1,800 क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची योजना आखली आहे.
‘इंटिग्रेटेड टेस्ट रेंज, चांदीपूर द्वारा तैनात विविध रेंज साधनांद्वारे, जसे की टेलीमेट्री- इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टम आणि रडारने कॅप्चर केलेल्या उड्डाण डेटाने, VSHORADS मिसाइल प्रणालीच्या शंभर टक्के अचूकतेची पुष्टी केली आणि ड्रोनसह इतर हवाई धोक्यांना नष्ट करण्याची त्याची अनोखी क्षमता स्थापित केली’, असे निवेदनात म्हटले आहे.
DRDO चे वरिष्ठ अधिकारी, सशस्त्र दलाचे प्रतिनिधी आणि प्रणालीच्या विकास व उत्पादन संघाच्या सदस्यांनी, या चाचण्यांची पाहणी केली आहे. VSHORAD क्षेपणास्त्र प्रणाली ही मानव-पोर्टेबल हवाई संरक्षण उपाय आहे, जे इतर DRDO प्रयोगशाळा आणि औद्योगिक भागीदारांच्या सहकार्याने स्वदेशीपणे डिझाइन आणि विकसित केली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि DRDO चे अध्यक्ष समीर व्ही. कामत यांनी DRDO, सशस्त्र दल आणि संरक्षण उद्योगाचे त्यांच्या यशाबद्दल कौतुक केले आणि या यशस्वी चाचण्यांना, संरक्षण तंत्रज्ञानामधील- भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे प्रतिक असे संबोधले.