राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी- NDA) मध्ये, 30 मे 2025 रोजी ऐतिहासिक घटना घडली. NDA मधून प्रथमच 17 महिला कॅडेट्सची बॅच, 336 कॅडेट्ससोबत यशस्वीरित्या पासआउट झाली. या कँडिडेस्टनी स्प्रिंग टर्म 2025 मधील 148वा कोर्स त्यांनी पूर्ण केला.
30 मे 2025 रोजी, महाराष्ट्रातील खडकवासला येथील, प्रतिष्ठित खेतरपाल परेड ग्राउंडवर पार पडलेल्या ‘पासिंग आऊट परेडमध्ये’, एकूण 1,341 कॅडेट्स सहभागी झाले होते, यामध्ये 336 कॅडेट्स हे पासिंग आउट बॅचचे होते. या प्रसंगी मिजोरामचे राज्यपाल जनरल (डॉ.) व्ही. के. सिंग (निवृत्त) हे रिव्ह्यूइंग ऑफिसर म्हणून उपस्थित होते.
परेडचे नेतृत्व
ही परेड, सर्व कॅडेट्सने कठोर लष्करी व शैक्षणिक प्रशिक्षण पूर्ण केल्याचा गौरवशाली सोहळा होता. ज्यात अचूकता, शिस्त आणि लष्करी वृत्ती यांचे भव्य प्रदर्शन घडले. ही परेड, अॅडज्युटंट लेफ्टनंट कर्नल प्रवीण कुमार तिवारी यांच्या कुशल नेतृत्वाखाली, त्यांच्या ‘रिलायंट रॉबिन’ नावाच्या घोड्यावर स्वार होऊन, उत्कृष्टरीत्या पार पडली. अकॅडमी कॅडेट कॅप्टन उदयवीर सिंग नेगी (‘G’ स्क्वॉड्रन) यांनी परेडचे प्रभावी आणि शिस्तबद्ध नेतृत्व केले.
पुरस्कार विजेते कॅडेट्स
उत्कृष्ट प्रदर्शनाच्या गौरवार्थ, रिव्ह्यूइंग ऑफिसर्सनी खालील प्रमाणे पुरस्कार प्रदान केले:
- राष्ट्रपती सुवर्ण पदक: बटालियन कॅडेट अॅडज्युटंट प्रिन्स राज
- राष्ट्रपती रौप्य पदक: अकॅडमी कॅडेट कॅप्टन उदयवीर सिंग नेगी
- राष्ट्रपती कांस्य पदक: बटालियन कॅडेट कॅप्टन तेजस भट्ट
याशिवाय, सर्वांगीण उत्कृष्टतेसाठी प्रतिष्ठित चीफ्स ऑफ स्टाफ बॅनर ‘गोल्फ स्क्वॉड्रन’ना प्रदान करण्यात आला.
फ्लायपास्ट
कार्यक्रमाचा समारोप भव्य फ्लायपास्टने झाला, ज्यामध्ये ध्वज घेऊन जाणारे चेतक हेलिकॉप्टर्स, सुपर डिमोना मोटराइज्ड ग्लायडर्स आणि भव्य सुखोई-30 फायटर विमानांचा समावेश होता. हे प्रदर्शन म्हणजे, कॅडेट्सच्या प्रशिक्षणाची पूर्तता आणि त्यांच्या पुढील लष्करी प्रवासासाठी सज्जतेचे प्रतीक होते.
या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती होती, ज्यामध्ये अभिमानाने सहभागी झालेल्या कुटुंबीयांपासून ते प्रतिष्ठित पाहुणे, शाळकरी विद्यार्थी, नागरी नागरिक तसेच सेवा बजावत असलेले व निवृत्त लष्करी अधिकारीही उपस्थित होते.
स्प्रिंग टर्म 2025 ची परेड, ही अकॅडमीच्या भविष्यातील लष्करी नेत्यांच्या घडामोडींसाठी असलेल्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. महिला कॅडेट्सचा समावेश ही यातील एक ऐतिहासिक भर असून, या सर्व महिला आता सन्मानपूर्वक व शौर्याने राष्ट्राची सेवा करण्यासाठी सज्ज आहेत.
(टीम भारतशक्ती)