भारताकडे ऑपरेशनची पूर्ण स्पष्टता आणि स्वायत्तता होती: CDS चौहान

0
CDS चौहान
भारताचे संरक्षण प्रमुख- जनरल अनिल चौहान यांनी, शांग्री-ला संवादाच्या पार्श्वभूमीवर, जगभरातील विविध देशांमधील थिंक टँक्ससोबत अकॅडमिक संवाद साधला. फोटो सौजन्य: X.com/HQ_IDS_India

भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान, यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच सार्वजनिकरित्या भाष्य करताना, पाकिस्तानविषयीची भारताची सद्य धोरणात्मक भूमिका ही “स्ट्रॅटेजिक डिसएंगेजमेंट” (धोरणात्मक विलगीकरण) असल्याचे स्पष्ट केले. सिंगापूरस्थित थिंक टँक्स, शैक्षणिक प्रतिनिधी आणि पत्रकारांसोबत शुक्रवारी झालेल्या संवादादरम्यान, त्यांनी “भारत धोरणात्मक ध्येयहीनतेच्या स्थितीत आहे” या धारणेला फेटाळून लावले.

ते म्हणाले की, “1947 मध्ये पाकिस्तान अनेक क्षेत्रांत भारतापेक्षा पुढे होता, पण आज भारत GDP, सामाजिक सलोखा आणि विकासाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे आणि हे यश दीर्घकालीन रणनीतीचे फलित आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

अण्वस्त्र वाढीबाबत विचारल्यावर, जनरल चौहान म्हणाले की, “भारताची लष्करी यंत्रणा ही तार्किक आणि जबाबदार घटक म्हणून ओळखली जाते. ज्या युद्धांची अधिकृत घोषणा झालेली नसते, त्यामध्ये अण्वस्त्र वापर अयोग्य आणि अनाकलनीय असतो.” “अशा संकटांच्या काळात भारताने पूर्ण ऑपरेशनल स्पष्टता आणि स्वायत्तता कायम ठेवली होती,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

CDS चौहान यांनी, भारताचे चार दिवसीय युद्ध हे नॉन-कॉन्टॅक्ट, मल्टी-डोमेन कॉन्फ्लिक्ट असल्याचे सांगितले. त्यामध्ये किनेटिक (प्रत्यक्ष आघाडीवरील) आणि नॉन-किनेटिक (सायबर, माहिती इ.) घटकांचा समावेश होता.

ते म्हणाले की: “आधुनिक युद्ध ही एक गुंतागुंतीची एकत्रीकरण प्रक्रिया आहे, ज्यामध्ये रणनीती, डोमेन (भू, वायू, जल, सायबर, अवकाश), वेळ आणि कृती यांचा समावेश आहे. आता युद्धासाठी विखुरलेल्या लष्करी फोर्सेस, नॉन-लिनियर ऑपरेशन्स, आणि लवचिक रणनितींची आवश्यकता आहे.”

जनरल चौहान यांच्या मते, नेटवर्किंग हेच युद्धाचे भविष्य आहे, वास्तविक वेळेतील समन्वय हे सर्वात महत्त्वाचे. “प्रगत तंत्रज्ञान तेव्हाच प्रभावी ठरते जेव्हा ते योग्य नेटवर्कशी जोडलेले असते,” असे त्यांनी सांगितले.

भारताने ‘आकाश’ सारख्या स्वदेशी प्लॅटफॉर्म्सवर भर देऊन, एकत्रित एअर डिफेन्स सिस्टम विकसित केली, ज्यामध्ये स्वदेशी आणि परदेशी रडार्सचे एकत्रीकरण करण्यात आले.

जनरल चौहान यांनी, ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील स्वयंपूर्णतेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. ‘स्टार्टअप्स, MSMEs, आणि मोठ्या उद्योगांचे योगदान दिवसेंदिवस वाढत आहे. IITsसारख्या संस्थांतील STEM टॅलेंट ही भारताची मोठी ताकद आहे, जी अजूनही पुरेशी वापरली गेलेली नाही,’ असे त्यांनी यावेळी नमूद केले.

आपल्या भाषणादरम्यान, त्यांनी एक विशेष मुद्दा उचलून धरला की, तो म्हणजे: ऑपरेशन सिंदूरदरम्यान सुमारे 15% ऑपरेशनल वेळ, हा फेक बातम्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचा सामना करण्यात गेला. त्यामुळे माहिती युद्धासाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मात्र त्या परिस्थितीही भारताने केवळ आणि केवळ तथ्यांवर आधारित संवाद धोरण राबवले, मग भलेही संवादासाठी विलंब झाला असेल, भारताने शेवटपर्यंत तथ्याचाच आधार घेतला,’ असे त्यांनी नमूद केले.

ऑपरेशनची माहिती देण्याकरता सुरुवातीला, दोन महिला अधिकारी लष्कराच्या प्रवक्त्याच्या भूमिकेत होत्या. गोळीबार थांबल्यानंतरच तिन्ही सेवेतील थ्री-स्टार अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती दिली.

CDS चौहना म्हणाले की, “दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धामुळे विकासात अडथळे येतात आणि भारत अशा जाळ्यात अडकू इच्छित नाही. म्हणूनच कुठल्याही ऑपरेशन्सनंतर भारत लगेचच त्यातून मोकळा होतो.”

ऑपरेशन सिंदूरच्या तपशीलात जात, जनरल चौहान यांनी सांगितले की, “पाकिस्तानाने त्यावेळी चिनी व्यापारी सॅटेलाइट्सचा वापर केला असण्याची शक्यता आहे, मात्र याचा कोणताही पुरावा नाही. भारताने जे यश मिळवले, ते पूर्णत: स्वदेशी प्रणाली आणि नेटवर्किंगवर आधारित होते.”

“त्यावेळी सायबर ऑपरेशन्सचा मर्यादित वापर झाला होता, काही डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक्स झाले पण लष्करी ऑपरेशनल सिस्टम सुरक्षित राहिल्या,” असे त्यांनी सांगितले.

“ऑटोमेशन व रोबोटिक्स यांचा वापर वाढल्यामुळे मानवी क्षती कमी होते, पण त्यामुळे युद्ध सुरू होण्याची शक्यता वाढते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), भविष्यातील युद्धांमध्ये अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, पण ती योग्य डेटासेट्सवर आधारित असणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या लष्करी AI ओपन-सोर्स डेटावर आधारित असल्यामुळे तिचा वापर मर्यादित आहे.

सीडीएस चौहान म्हणाले की, “भारतीय लष्करात संरचनात्मक सुधारणा सुरू असून, एकत्रित कमांड्स आणि स्लिम, टेक्नॉलॉजी-आधारित स्ट्रक्चर्स तयार होत आहेत. हे नवे सिद्धांत मल्टी-डोमेन ऑपरेशन्स, स्पेस, अवकाश, ISR आणि जॉइंट टार्गेटिंग समाविष्ट करत आहेत.”

— नितीन ए. गोखले


+ posts
Previous articleऐतिहासिक: NDA मधून 17 महिला कॅडेट्सची पहिली बॅच यशस्वीरित्या उत्तीर्ण
Next articleभारत,पाकिस्तान की फक्त व्यवसाय : ट्रम्प नक्की कोणाचे समर्थक?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here