“राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे आपल्या यशाचा गाजावाजा जगजाहीर करण्यात अत्यंत हुशार आहेत, पण ते एक असे कथन (narrative) आहे जे आपल्याला भारी पडू शकेल,” असे माजी राजनैतिक अधिकारी विवेक काटजू म्हणाले. इंडो-अमेरिकन फ्रेंडशिप असोसिएशनने (IAFA) नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत ते बोलत होते.
त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांचेही नाव जोडायला हवे होते. ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांनी आपण कसा विजय मिळवला आणि स्वतःला फील्ड मार्शल म्हणून बढती दिली हे पहा.
या narratives संघर्षात, काहीजण म्हणतात की पाकिस्तानने भारतावर मात केली. याशिवाय जुन्या दृष्टीकोनाचा विचार केला तर इस्लामाबादचा फक्त एकच शत्रू आहे तो म्हणजे भारत. दुसरीकडे भारताला मात्र अनेक आघाड्यांवरील आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. ही आव्हाने तात्कालिक, भौतिक, आर्थिक आणि अशाच प्रकारी आहेत.
आता आपण परत ट्रम्पकडे वळूया. भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्ष विरामाचे श्रेय घेण्यासाठी त्यांनी जो उतावळेपणा दाखवला त्याचा बराचसा संबंध ट्रम्प यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात असू शकतो. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून, त्यांनी युक्रेन संघर्ष आणि गाझा युद्ध कमीत कमी काळात सोडवण्याची बढाई मारली होती. मात्र ही दोन्ही युद्धे अजूनही सुरूच आहेत.
अशा घटनांमागे बऱ्याचशा राजनैतिक बाबी त्यातील बारकाव्यांसह समजून घ्याव्या लागतात. म्हणूनच साउथ ब्लॉकने ट्रम्पच् यांच्या या दाव्याचे लगेच खंडन केले. दुसरीकडे शिक्षणतज्ज्ञ आणि राजनैतिक अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष वेधले: ट्रम्प यांनी 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (ज्यामुळे ऑपरेशन सिंदूरला चालना मिळाली) निषेध केला होता आणि अमेरिका भारतासोबत उभी असल्याचे म्हटले होते.
परंतु जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अमेरिकन राजकारणाचे संशोधन आणि अध्यापन करणारे प्रो. चिंतामणी महापात्रा म्हणतात की ट्रम्प यांनी जे म्हटले “नाही” ते तितकेच महत्त्वाचे आहे.
“ट्रम्प यांनी अनेकदा पंतप्रधान मोदीं यांच्याशी आपली मैत्री दाखवली आहे. परंतु त्यांनी पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा एकदाही आरोप केलेला नाही.”
परंतु त्यापेक्षाही आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केल्याबद्दल भारतावर टीका केली नाही किंवा त्यांनी या कारवाईला पाठिंबाही दिलेला नाही. भारताने नऊ दहशतवादी छावण्यांवर हल्ला केल्यानंतरही त्यांनी संघर्ष विरामाची मागणी केली नाही.
भारतातील काहींना ते पटले असेल, परंतु येथे मुद्दा असा आहे: त्यांनी भारतीय नागरी लक्ष्यांवर हल्ला केल्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली नाही. नागरी लक्ष्यांवर हल्ला केल्यानंतर, भारतीय लष्करी लक्ष्यांवर हल्ला करण्यापासून पाकिस्तानला परावृत्त करण्यासाठी त्यांनी काहीही केले नाही. तसेच, इस्लामाबादवर टीकाही केलेली नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ट्रम्प यांनी संघर्ष विरामाच्या संदर्भात मध्यस्थी, मदत आणि ब्रोकर असे शब्द वापरले. नंतर त्यांनी दावा केला की संघर्षविराम व्हावा यासाठी आपण व्यापारनीतिचा वापर केला होता.
प्राध्यापक महापात्रा यांनी आणखी एक मुद्दा मांडला: “ट्रम्प सीमापार दहशतवादाची अजिबात काळजी करत नाहीत, ज्याबद्दल भारत सतत तक्रार करत असतो. त्यांना खात्री आहे की पाकिस्तान देखील दहशतवादाचा बळी आहे आणि अफगाणिस्तानात अमेरिकेच्या वतीने दहशतवाद्यांशी अनेक दशकांपासून लढत आहे. पाकिस्तानने अलीकडेच एका जुन्या दहशतवाद्याला अमेरिकेला सोपवले.”
ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसला दिलेल्या भाषणात पाकिस्तानचे खूप कौतुक केले. संघर्षविराम केल्याचे श्रेय घेतल्यानंतर इस्लामाबादने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कौतुक केल्यामुळे हा कौतुक समारंभ पार पडला असावा.
ट्रम्प यांनी भूमिका बजावल्याच्या भारताच्या दाव्याला भारताने पाठिंबा न दिल्याने पाकिस्तानला जगाला हे सांगणे सोपे झाले की ट्रम्प दिल्लीवर नाराज आहेत. इस्लामाबादने काश्मीर सोडविण्यात अमेरिकेच्या भूमिकेबद्दल जुन्याच सुरात परतले, तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला विरोध करून भारताला या प्रकरणाचा खलनायक म्हणून चित्रित केले.
ट्रम्प यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली या त्यांच्या दाव्याला भारताने पाठिंबा न दिल्याने, ट्रम्प दिल्लीबद्दल नाराज आहेत हे जगाला सांगणे पाकिस्तानसाठी सोपे झाले. तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला विरोध करून भारताला खलनायकाच्या रूपात चित्रित करत, इस्लामाबादने काश्मीरचे निराकरण करण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घ्यावा हा जुना सूर पुन्हा आळवायला सुरूवात केली आहे.
या सगळ्या घटनांचा एकत्रितपणे विचार केल्यास, अमेरिकेतील विविध नेत्यांच्या या काळातील विधानांमुळे साऊथ ब्लॉकला वॉशिंग्टन डी. सीचे विचार समजून घेण्यास क्वचितच मदत झाली आहे.
उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स म्हणाले, “आम्ही अशा युद्धात सहभागी होणार नाही, जे मुळात आमचे काम नाही आणि अमेरिकेचा त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेशी काहीही संबंध नाही.”
राजनैतिक अधिकारी म्हणून प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता विवेक काटजू यांचा असा विश्वास आहे की, “अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या निवेदनात त्यांनी ‘संघर्षविराम मध्यस्थी’ हा शब्द वापरला होता. या बाबींमध्ये माझा स्वतःचा अनुभव असा आहे की अशा परिस्थितीत संभाषणाचे जाळे तयार होत राहते. अमेरिकन लोक बोलतात, युरोपीय लोक आमच्याशी बोलतात, पाकिस्तानी राजकारण्यांशी बोलतात, आपण नागरिकांशी संवाद साधतो, पाकिस्तानीही त्यांच्या नागरिकांशी संवाद साधतात. मात्र, अंतिम निर्णय द्विपक्षीय पद्धतीनेच घ्यावे लागतात.”
ते शेवटचे विधान तुम्हाला द्विपक्षीय चर्चेबाबतची भारताची अधिकृत भूमिका सांगते, की फक्त दोन्ही देशांनीच -अगदी संघर्षविराम किंवा शत्रुत्व संपुष्टात आणणे – यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. ट्रम्प हे भारताचे समर्थक असोत किंवा पाकिस्तानचे, किंवा ते दोन्हीही देशांचे नसोत. शेवटी, ट्रम्प यांच्यासाठी हे सर्व व्यापाराशी – ते स्वतः एक व्यावसायिक आहेत- निगडीत आहे. म्हणूनच कदाचित त्यांच्यावर अधिक बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
ऐश्वर्या पारीख