अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump, यांनी शुक्रवारी घोषणा केली की, ‘ते अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवरील शुल्क 25 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहेत.’ यामुळे जागतिक स्टील उत्पादकांवर दबाव वाढेल आणि त्यांचा चालू असलेला व्यापार संघर्ष आणखी तीव्र होईल.
पेनसिल्व्हेनियामधील प्रचारसभेत ट्रम्प म्हणाले की: “आम्ही आधीच्या शुल्कात 25 टक्क्यांनी वाढ करत आहोत. म्हणजे आयात स्टीलवरील शुल्क 25% वरून 50% वर नेणार आहोत. यामुळे अमेरिकेतील स्टील उद्योग आणखी मजबूत होईल.”
ही घोषणा त्यांनी पिट्सबर्गजवळ येथे केली, जिथे त्यांनी निप्पॉन स्टील आणि यूएस स्टीलमधील 14.9 अब्ज डॉलरच्या कराराचे स्वागत केले. ‘हा करार आणि शुल्कवाढ दोन्ही अमेरिकन स्टील कामगारांची नोकरी टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे,’ असे ट्रम्प यांनी नमूद केले.
नंतर त्यांनी सोशल मीडियावर, ‘ही टॅरिफ वाढ अॅल्युमिनियम उत्पादनांवरही लागू होईल आणि बुधवारपासून ती अंमलात येईल,’ असे जाहीर केले.
या घोषणेनंतर, Cleveland-Cliffs Inc या स्टील कंपनीचे शेअर्स, बाजार बंद झाल्यावर २६ टक्क्यांनी वाढले. गुंतवणूकदारांना असे वाटते की, ही शुल्कवाढ त्यांच्या नफ्यास मदत करेल.
या शुल्कवाढीनंतर, ट्रम्प यांचे जागतिक व्यापारयुद्ध अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. काही तासांपूर्वीच त्यांनी चीनवर अमेरिकेसोबतच्या महत्त्वाच्या खनिजांवरील व्यापार कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.
कॅनडाच्या चेंबर ऑफ कॉमर्सने यावर त्वरीत प्रतिक्रिया देत, ही शुल्कवाढ “उत्तर अमेरिकेच्या आर्थिक सुरक्षेला विरोधी” असल्याचे म्हटले.
“स्टील आणि अॅल्युमिनियमसारख्या कार्यक्षम व स्पर्धात्मक पुरवठा साखळ्यांचे विघटन दोन्ही देशांना महागात पडेल,” असे चेंबरच्या अध्यक्ष कॅन्डिस लायंग यांनी म्हटले.
ऑस्ट्रेलियानेही या शुल्कवाढीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. व्यापारमंत्री डॉन फैरेल म्हणाले की: “ही कृती अन्यायकारक असून मित्र देशाने असे वागणे अपेक्षित नाही.”
त्यांनी स्पष्ट केले की, “ऑस्ट्रेलिया हा इंडो-पॅसिफिकमधील अमेरिकेचा प्रमुख सुरक्षा भागीदार असून, या शुल्कांचा निषेध आणि त्याच्या रद्दबातलतेसाठी प्रयत्न सुरू ठेवणार आहे.”
ट्रम्प यांनी हे भाषण, यूएस स्टीलच्या “Mon Valley Works” प्लांटमध्ये दिले, जे अमेरिकन उत्पादनक्षेत्राच्या पूर्वीच्या वैभवाचे व नंतरच्या घसरणीचे प्रतीक मानले जाते. “पेनसिल्व्हेनिया हे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचे राज्य असून, या भाषणाचा राजकीय हेतूही लपलेला नव्हता,” असे विश्लेषकांचे मत आहे.
अमेरिका युरोपियन युनियन वगळता, जगातील सर्वात मोठा स्टील आयातदार आहे. वाणिज्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये 26.2 दशलक्ष टन स्टीलची आयात झाली. त्यामुळे या नव्या शुल्कवाढीमुळे स्टीलचे दर वाढण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम उद्योग आणि ग्राहक दोघांवरही होईल.
मार्च 2024 मध्ये, ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात 25 टक्के स्टील व अॅल्युमिनियम शुल्क प्रथम लागू करण्यात आले. कॅनडाच्या स्टीलवर 50 टक्क्यांचे शुल्क लावण्याची धमकी दिली होती, पण ती नंतर मागे घेण्यात आली.
सेक्शन 232 (राष्ट्रीय सुरक्षा) अंतर्गत लागू करण्यात आलेल्या आयात करांमध्ये, केवळ कच्चे धातूच नव्हे तर स्टेनलेस स्टील सिंक, गॅस रेंज, एअर कंडिशनरचे कॉइल्स, घोड्यांचे नाल, अॅल्युमिनियमच्या फ्रायपॅन आणि स्टीलच्या दारांचे फॅटके यांसारख्या विविध उत्पादनेही समाविष्ट आहेत.
2024 मध्ये 289 उत्पादन वर्गांवरील आयात मूल्य $147.3 अब्ज डॉलर्स होते, ज्यात सुमारे दोन-तृतीयांश अॅल्युमिनियम आणि एक-तृतीयांश स्टील होते.
तुलनेने, ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे 2018 मध्ये, चीनच्या औद्योगिक उत्पादनांवर लावलेल्या पहिल्या दोन टप्प्यांतील दंडात्मक शुल्कांचे वार्षिक मूल्य $50 अब्ज डॉलर्स इतके होते.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रायटर्सच्या इनपुटसह)