मंगळवारी, डचमधील उजव्या विचारसरणीचे नेतेद गीर्ट विल्डर्स यांनी, त्यांचा PVV (Party for Freedom) पक्ष सत्ताधारी आघाडीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले, ज्यामुळे लगेचच उजव्या विचारसरणीचे Dutch सरकार कोसळले.
विल्डर्स यांनी सांगितले की, “त्यांच्या आघाडीतील भागीदारांनी आश्रय स्थलांतर थांबवण्याच्या त्यांच्या कल्पनांना पाठिंबा देण्यास नकार दिला, ज्यासाठी त्यांनी मागील आठवड्यात त्वरित पाठिंबा मागितला होता.”
संकटाची छाया
“आमच्या आश्रय योजनेवर कोणताही स्वाक्षरी नाही. मुख्य धोरण करारात कोणतेही बदल झालेले नाहीत. PVV आघाडीतून बाहेर पडत आहे,” असे विल्डर्स यांनी डच भाषेतून इंग्रजीत अनुवादित केलेल्या त्यांच्या X (पूर्वीचे Twitter) पोस्टद्वारे जारी केले.
सोमवारी विल्डर्स यांनी, नेदरलँड्समधील आधीच अस्थिर असलेल्या राईट विंग सरकारला कोसळवण्याची धमकी दिली होती, कारण सरकारने त्यांच्या कठोर आश्रय धोरणांना पाठिंबा दिला नाही, असे त्यांनी म्हटले होते.
PVV आघाडीचे सरकार, जुलै 2024 पासून अस्तित्वात असून, सुरूवातीपासूनच कोणत्याही मुद्द्यावर एकमत साधण्यात अडचण येत होती. आगामी महिन्यांत सरकारला अनेक कठीण आणि महत्वपूर्ण निर्णय घ्यायचे होते, ज्यात नवीन NATO टार्गेट पूर्ण करण्यासाठी लष्करी खर्चात ऐतिहासिक वाढ करणे, याचाही समावेश होता.
तात्पुरते सरकार NATO परिषदेसाठी यजमानपद सांभाळणार
या घडामोडींमुळे पुढील काही महिन्यांत, नेदरलँड्समध्ये नवीन निवडणुका होण्याची शक्यता आहे, जे युरो झोनमधील पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेत आणखी राजकीय अनिश्चितता निर्माण करेल.
नवीन NATO टार्गेट निश्चित करण्यासाठी या महिन्याच्या शेवटी, हेग शहरात होणाऱ्या शिखर परिषदेचे यजमानपद नेदरलँड्सकडे असेल, पण तोपर्यंत केवळ तात्पुरते सरकार कार्यरत असेल.
समर्थनात घट
मुस्लिमविरोधी भूमिकेसाठी ओळखले जाणारे लोकाभिमुख नेते विल्डर्स, यांनी मागील आठवड्यात सरकारकडे आश्रय स्थलांतर पूर्णपणे थांबवणे, सिरियन निर्वासितांना त्यांच्या मूळ देशात पाठवणे आणि आश्रय केंद्रे बंद करणे यासाठी त्वरित पाठिंबा मागितला होता.
मात्र, आघाडीतील भागीदारांनी त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही, आणि त्यांनी स्पष्ट केले की स्थानिक पातळीवरील धोरणांची जबाबदारी PVV पक्षाच्या स्थलांतर मंत्र्यावरच आहे.
सोमवारी संध्याकाळी झालेल्या आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर, विल्डर्स यांनी स्पष्ट केले की, “ही पावले त्यांच्या अपेक्षांनुसार अपुरी आहेत आणि त्यामुळे आघाडीतील त्यांचा पाठिंबा कायम राहू शकणार नाही.”
“आपल्यासमोर एक गंभीर समस्या आहे,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. “उद्या सकाळी यावर पुन्हा चर्चा करू, पण परिस्थिती काहीशी चिंताजनक आहे.”
अलीकडेच विल्डर्स यांनी, पोलंडमध्ये राष्ट्रभक्त राष्ट्राध्यक्ष निवडून आल्याबद्दल त्या देशाचे अभिनंदन केले होते. नॅशनलिस्ट कॅरोल नव्रॉकी यांनी वॉर्साॅ शहराचे महापौर राफाल ट्रझास्कोव्स्की यांच्यावर विजय मिळवला होता.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)