सुटका झाल्यानंतर आठवडाभरातच हमास अतिरेक्याचा मृत्यू

0

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास यांच्यातील ओलिस – कैदी अदलाबदल करारांतर्गत अलीकडेच सोडण्यात आलेला हमासचा अतिरेकी नायल आबिद हा पूर्व जेरुसलेममधील त्याच्या निवासस्थानाच्या छतावरून पडून मरण पावल्याचे स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.21 वर्षे तुरुंगात

गेल्या शनिवारी युद्धविराम कराराचा भाग म्हणून अनेक पॅलेस्टिनी कैद्यांची इस्रायली ओलिसांबरोबर देवाणघेवाण झाली होती. त्यात आबिदची कैदी म्हणून सुटका करण्यात आली. मात्र सुटका होण्यापूर्वी आबिदने 21 वर्षे तुरुंगात घालवली होती.

वायनेटच्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारी घडली आणि अधिकाऱ्यांनी त्याच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे.

आत्महत्येची शक्यता

प्राथमिक तपासानुसार आत्महत्येची शक्यता वाटत असली तरी, अधिकाऱ्यांना मृत्यूचे कारण अद्याप निश्चित करता आलेले नाही.

घटनेची माहिती मिळताच आबिदला पूर्व जेरुसलेममधील हदासा माउंट स्कोपस रुग्णालयात नेण्यात आले, जिथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

2003 चा जेरुसेलम कॅफे हल्ला

हमासचा अतिरेकी नायल आबिद याला जेरुसलेममधील 2003च्या हिलेल कॅफेत झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात सहभागी असलेल्यांना मदत केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते.

या बॉम्बस्फोटात सात इस्रायली ठार तर इतर 57 जण जखमी झाले. गेल्या आठवड्यात आबिदच्या सुटकेमुळे वाद निर्माण झाला, कारण तो हल्ल्यात सहभागी असल्याबद्दल जन्मठेपेच्या अनेक शिक्षा भोगत होता.

पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या माहिती कार्यालयाने आबिदच्या मृत्यूला दुजोरा दिला आणि सांगितले की तो अति उंचीवरून पडला.  21 वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर अलीकडील कैद्यांच्या देवाणघेवाणीत त्याला सोडण्यात आले होते.

ओलिस – कैद्यांची अदलाबदल

इस्रायल आणि हमास यांच्यात नुकत्याच झालेल्या ओलिस – कैदी यांच्या अदलाबदलावरून सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

या करारामुळे असंख्य इस्रायली ओलिसांना परत इस्रायलला पाठवण्यात आले, तर शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका झाली.  यापैकी काहींना गंभीर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले होते.

इस्रायली ओलिसांची ‘हत्या’

बिबास कुटुंबाची हत्या झाल्याचे उघडकीला आल्यानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी या कृत्याचा निषेध करत या हत्यांचा तपास करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे म्हटले होते. याशिवाय हमासच्या आणखी कैद्यांची केली जाणारी सुटका तात्पुरती स्थगित करत असल्याचे घोषित केले.

व्यापक कराराचा एक भाग म्हणून, इस्रायलने 620 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यास सहमती दर्शविली आहे, ज्यापैकी काहींना हिंसक गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे.

याशिवाय दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा पूर्वेतिहास असलेल्या कैद्यांची सुटका करण्याशी संबंधित जोखमींबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या कराराबाबत इस्रायलमध्ये आता वादाला तोंड फुटले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज


Spread the love
Previous articleArmy Chief Gen Upendra Dwivedi’s France Visit Amid Pinaka Rocket Deal Talks
Next articleपिनाका रॉकेट करारावरील चर्चेदरम्यान लष्करप्रमुख फ्रान्स दौऱ्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here