भारत-पॅराग्वे यांच्यात ऐतिहासिक Space करार, विविध क्षेत्रांतील संबंध वाढवणार

0
भारत

भारत-पॅराग्वे अंतराळ सहकार्य

भारत आणि पॅराग्वे या दोन्ही देशांनी, बाह्य अवकाशाच्या शांततापूर्ण वापराच्या सहकार्यासाठी पहिलाच सामंजस्य करार (MoU) केला असून, हा करार द्विपक्षीय संबंधांमध्ये एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅंटियागो पेना यांच्या भारतातील पहिल्या राजकीय दौऱ्याच्या समाप्तीनंतर, हा करार जाहीर करण्यात आला. यामुळे भविष्यात, पॅराग्वेची अंतराळ संस्था AEP आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO यांच्यातील सहकार्य अधिक बळकट होईल.

ISRO सोबत CubeSat विकसित करणे, भारतीय प्रक्षेपण यंत्रणेद्वारे प्रक्षेपण करणे, तसेच पृथ्वी निरीक्षण प्रणाली विकासीत करणे, या सर्वामध्ये AEP ने दाखवलेली सहकार्यात्मक रूची कौतुकास्पद असल्याचे, दोन्ही देशांनी म्हटले.

राष्ट्राध्यक्ष पेना यांच्या दौऱ्यानंतर, बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनानुसार, ‘दोन्ही देशांनी उपग्रह निर्मिती, प्रक्षेपण सेवा आणि स्थानिक अंतराळ क्षेत्रातील क्षमता वाढीसाठी व्यावसायिक भागीदारी वाढवण्याचे मान्य केले. पेना यांनी, भारतीय रिमोट सेन्सिंग संस्थेमध्ये पॅराग्वेच्या अधिकाऱ्याला प्रशिक्षण दिल्याबद्दल भारताचे आभार मानले.’

ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य

ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ग्लोबल बायोफ्युएल्स अलायन्स (GBA) मध्ये, संस्थापक सदस्य म्हणून पॅराग्वेच्या सहभागाचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी बायोफ्युएल्स आणि ग्रीन हायड्रोजनवर एकत्रित काम करण्याचे, संयुक्त प्रकल्प, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि मानके एकसंध करण्याचे वचन दिले. भारताने हायड्रोकार्बन मूल्यसाखळीतील तांत्रिक सल्लागार सेवा देण्याची तयारी दर्शवली.

महत्त्वाच्या खनिज पदार्थ व दुर्मिळ खनिज क्षेत्रातील गुंतवणूक संधींचा शोध घेण्यावर, त्या दोघांचे एकमत झाले, ज्यामध्ये स्रोत शोध, व्यापार, सरकारी आणि खाजगी स्तरावरील सहकार्य समाविष्ट आहे.

आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) चा, 100 वा सदस्य म्हणूनही पॅराग्वेचे स्वागत केले गेले. भारताच्या एनटीपीसीच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या 500 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातील प्रगती आणि भारताच्या एक्झिम बँकेकडून संभाव्य आर्थिक सहाय्य, याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले.

मोदींनी पॅराग्वेला आपत्ती-सहनशील पायाभूत सुविधा युती (CDRI) मध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले, ही युती ४३ राष्ट्रांची असून हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधांची ताकद वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते.

दहशतवादाविरुद्ध लढा

संयुक्त निवेदनात, जागतिक दहशतवादाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. दोन्ही नेत्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारताने मांडलेल्या व्यापक आंतरराष्ट्रीय दहशतवाद परिषदेच्या (CCIT) प्रस्तावासह बहुपक्षीय दहशतवादविरोधी प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला. पॅराग्वेने GAFILAT आणि Egmont Group यांसारख्या प्रादेशिक संस्थांमार्फत पाठिंबा पुन्हा एकदा स्पष्ट केला.

इंटरनेट आणि सायबरस्पेसचा गैरवापर आणि विशेषतः तरुण पिढीवर होणारा त्याचा परिणाम, यावरही चिंता व्यक्त करण्यात आली. दोन्ही देशांनी सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षिततेसाठी बहुपक्षीय सहकार्य वाढवण्याचे ठरवले.

MERCOSUR चर्चासत्र

व्यापार व गुंतवणूक क्षेत्रात, दोन्ही नेत्यांनी भारत-MERCOSUR प्राधान्य व्यापार कराराअंतर्गत सहकार्य वाढवण्यावर सहमती दर्शवली. तांत्रिक पातळीवरील समित्या बाजार प्रवेशातील अडथळे दूर करण्यासाठी, सहकार्य विस्तारित करण्यासाठी व क्षेत्रीय माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी काम करतील.

कृषी विषयक

कृषी आणि पशुपालन क्षेत्राच्या महत्त्वावर भर देण्यात आला. दोन्ही देश एक परस्पर समजुतीचा करार (MoU) करण्याच्या प्रक्रियेत आहेत, ज्यायोगे उत्तम पद्धती शेअर करून उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येईल.

दोन्ही नेत्यांनी सर्जनशील उद्योगांचे महत्त्व मान्य केले आणि ऑडिओव्हिज्युअल सहनिर्मिती करार राबवण्याचे आश्वासन दिले. यामुळे दोन्ही देशांच्या चित्रपट व माध्यम उद्योगासाठी सरकारी प्रोत्साहने, संयुक्त उपक्रम आणि बाजार विस्ताराच्या संधी निर्माण होतील.

राष्ट्राध्यक्ष पेन्या यांच्या भारत भेटीने भारत-पॅराग्वे संबंधांचे क्षितिज व्यापक केले आहे. दोन्ही देश अंतराळ, ऊर्जा, कृषी, सायबर सुरक्षा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यामध्ये अधिक बळकट भागीदारीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

by- Huma Siddiqui


+ posts
Previous articleOperation Sindoor: पाकिस्तानच्या ड्रोन योजनेतील त्रुटी उघडकीस
Next articleDassault Aviation and Tata Tie Up to Manufacture Rafale Fuselages in Hyderabad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here