भारतीय सैनिक 6 व्या ‘Dharma Guardian’ सरावासाठी जपानला रवाना

0

भारतीय सैन्य दल, 6 व्या ‘Dharma Guardian‘ (धर्म गार्डियन) सरावासाठी जपानला रवाना झाले आहे, जो भारत आणि जपान यांच्यातील संयुक्त लष्करी सरावाचा एक वार्षिक कार्यक्रम आहे. 24 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान, हा सराव जपानमधील ईस्ट फुजी मनोव्हर ट्रेनिंग एरिया येथे पार पडेल. सरावाची याआधीची आवृत्ती राजस्थानमध्ये फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

भारतीय लष्करी दलात 120 सैनिकांचा समावेश असून, त्यात मद्रास रेजिमेंटच्या बटालियनचे सैनिक आणि इतर शस्त्र व सेवा शाखांतील कर्मचारी देखील सहभागी होतील. जपान ग्राउंड सेल्फ-डिफेन्स फोर्स (JGSDF), समान सामर्थ्याच्या दलाचे 34 व्या इन्फंट्री रेजिमेंटद्वारे प्रतिनिधित्व करेल.

दोन्ही देशातील सामंजस्य वाढविण्याच्या उद्देशाने, हा सराव संयुक्त शहरी युद्ध आणि दहशतवाद विरोधी ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित करेल. यातील प्रमुख पैलू म्हणून तांत्रिक सराव, संयुक्त नियोजन, आपत्ती प्रतिसाद धोरणे, आणि शारीरिक परिस्थिती सुधारण्यासाठी युद्धकौशल्य व सहकार्य वृद्धीकरण अशा विविध उपक्रमांची यावेळी तयारी केली जाईल.

भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “हा सराव संयुक्त तांत्रिक सराव आणि ऑपरेशनल नियोजनावर आधारित असेल, जे आपल्या प्रभावी संयुक्त ऑपरेशन्सची तयारी वाढविण्यात मदत करतील.”

सैन्य प्रमुखांच्या जपान दौऱ्याच्या (14 ते 17 ऑक्टोबर, 2024) गतीवर आधारित, धर्म गार्डियन भारत-जपान द्विपक्षीय संरक्षण संबंधांना अधिक बळकटी मिळणार आहे. हा सराव दोन्ही देशांच्या क्षेत्रीय सुरक्षा, शांतता आणि स्थैर्याबद्दलच्या सामायिक बांधिलकीला अधोरेखित करतो तसेच त्यांचे मुक्त, खुले आणि सर्व-समावेशक Indo-Pacific भूमिकेचा दृष्टिकोन दर्शवितो.

एखाद्या अन्य एका लष्करी उपक्रमाच्या तुलनेत, Dharma Guardian हा सराव- भारत आणि जपान यांच्यातील शाश्वत मैत्री, विश्वास आणि सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक आहे, ज्यामुळे द्विपक्षीय लष्करी संबंध अधिक दृढ होतात आणि धोरणात्मक सहकार्याला प्रोत्साहन मिळते.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleIndian Army Troops Head to Japan for 6th Edition of Dharma Guardian
Next articleड्रोन युद्धाचा सामना करण्यासाठी, भारतीय सैन्याची धाडसी मोहीम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here