भारतीय नौदलाच्या हिंद महासागर जहाज सागरच्या (आयओएस सागर) पहिल्या उपक्रमात भारतीय खलाशी आणि आयएनएस सुनयना या नौकेतील नऊ भागीदार देशांतील 44 कर्मचाऱ्यांच्या संयुक्त चमूने कोची येथील दक्षिण नौदल कमांड येथे त्यांचा बंदर आणि सागरी प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण केला. आता आयओएस सागर आपल्या कर्मचाऱ्यांसह कारवारला रवाना झाली आहे, असे भारतीय नौदलाने गुरुवारी सांगितले. या प्रशिक्षणार्थींसाठी मूलभूत नाविक उपक्रमांपासून ते अत्याधुनिक सिम्युलेटर प्रशिक्षणापर्यंत विशेष प्रशिक्षण कॅप्सूल तयार करण्यात आले होते.
“गेल्या काही दशकांमध्ये, भारतीय नौदलाच्या सागरी प्रशिक्षण संस्थांनी 50 हून अधिक एफएफसीमधील 20 हजारांहून अधिक अधिकारी आणि नाविकांना प्रशिक्षण दिले आहे, ज्यात प्राथमिक प्रशिक्षणापासून ते सागरी कौशल्य आणि क्षमता वाढवणाऱ्या विशिष्ट व्यावसायिक व्यापार अभ्यासक्रमांचा समावेश आहे”, असे निवेदनात म्हटले आहे.
याव्यतिरिक्त, भारतीय नौदलाच्या वर्क अप चमूने आयएनएस सुनयनाच्या भारतीय नौदलाच्या चमूसह आंतरराष्ट्रीय चमूला सागरी प्रशिक्षण दिले.
भारतीय नौदलाने म्हटले आहे की, “सागरी प्रशिक्षणाचा उद्देश आंतरराष्ट्रीय नाविकांना भारतीय नौदलाच्या प्रणाली आणि कार्यपद्धतींशी जुळवून घेणे हा होता, ज्यामुळे ते आगामी तैनातीदरम्यान एक सुसज्ज आणि एकसंध युनिट म्हणून काम करू शकतील.”
आयओएस सागर हे सखोल सागरी समज वाढवण्याचे आणि प्रादेशिक स्थिरता आणि सहकार्याला चालना देण्याचे एक अद्वितीय उदाहरण आहे. प्रादेशिक नौदलांबरोबर भारतीय नौदलाच्या सहकार्याने हिंद महासागर प्रदेशातील (आयओआर) भागीदार राष्ट्रांसह सामूहिक सागरी हितसंबंधांचे रक्षण आणि क्षमता बांधणीसाठीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.
भारतीय नौदलाने हिंद महासागर प्रदेशातील (आयओआर) मित्र राष्ट्रांशी संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी दोन प्रमुख उपक्रमांची घोषणा केली आहे. सध्या सुरू असलेल्या लष्करी व्यापाराचा एक भाग म्हणून, नौदल या महिन्यात दहा आफ्रिकन देशांसोबत ‘AIKEYME’ (आफ्रिका-भारत प्रमुख सागरी सहभाग) हा सागरी सराव आयोजित करणार आहे.
आयओएस सागर उपक्रमांतर्गत आयएनएस सुनयना ने कोमोरोस, केनिया, मादागास्कर, मालदीव, मॉरिशस, मोझांबिक, सेशेल्स, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेतील बहुराष्ट्रीय कर्मचाऱ्यांसह नैऋत्य आयओआरमध्ये तैनात केले.
भागीदार देशांतील कर्मचारी कोची येथील विविध नौदल व्यावसायिक शाळांमध्ये समुद्र आधारित प्रशिक्षणासह दोन आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेतील. या उपक्रमांमुळे भारताची सागरी भागीदारी आणि प्रादेशिक सुरक्षेप्रती असलेली बांधिलकी आणखी मजबूत होऊन आयओआरमधील धोरणात्मक उपस्थिती अधिक मजबूत झाली आहे.
टीम भारतशक्ती