हिंद महासागर क्षेत्रातील (IOR) भारताची सामरिक स्थिती, विस्तीर्ण किनारपट्टी आणि वाढते सागरी हितसंबंध, या सर्व गोष्टी ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस’ (UDA) म्हणजेच पाण्याखालील क्षेत्रातील जागरुकतेला, राष्ट्रीय सुरक्षेच्या केंद्रस्थानी आणतात. सागरी धोके अधिक प्रगत आणि व्यापक होत असताना, भारताच्या पाण्याखालील क्षमतांचे बळकटीकरण हे एक सामरिक आवश्यकतेचे आणि कार्यात्मक प्राधान्याचे रूप धारण करत आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान, UDA चे महत्त्व ठळकपणे अधोरेखित झाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या या ऑपरेशनचा मुख्य उद्देश, दहशतवादी नेटवर्क्सचा नायनाट करणे हा असला, तरी त्याने सागरी सीमेचे आणि पाण्याखालील पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्याची तातडीची गरज अधोरेखित केली, विशेषतः सततच्या सीमापार धमक्यांच्या पार्श्वभूमीवर.
या वाढत्या सुरक्षा वातावरणात, उप-ॲडमिरल ए.एन. प्रमोद, नौदल ऑपरेशन्सचे महासंचालक (DGNO), यांनी भारताची सागरी भुमिका बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानच्या संभाव्य आक्रमणाविषयी बोलताना ते म्हणाले की, “पाकिस्तानला चांगलंच ठाऊक आहे, की त्यांनी भारतावर हल्ला केल्यास काय होईल.” त्यांचा पवित्रा सामरिक व राजकीय वर्तुळात उमटला असून, भारताच्या सागरी प्रतिबंध धोरणाची कटिबद्धता अधोरेखित झाली आहे.
उप-ॲडमिरल प्रमोद यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय नौदलाने अरबी समुद्रात आक्रमक आणि लक्षपूर्वक कामगिरी पार पाडली. वेस्टर्न फ्लीटचे (Navy’s ‘sword arm’) फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून, त्यांच्या आधीच्या कार्यकाळातून मिळालेला अनुभव त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरला, ज्यामुळे जलद प्रतिसाद असलेल्या आणि गुंतागुंतीच्या नौदल हालचाली शक्य झाल्या.
Underwater Drones: UDA क्षमतेला बळकटी
भारताताच्या पाण्याखालील सुधारित संरक्षण धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे- Autonomous Underwater Vehicles (AUVs) — ज्यात, स्वायत्त Underwater Drones चा समावेश आहे. हे ड्रोन्स प्रत्यक्ष निरीक्षण, संभाव्य धोक्याची ओळख आणि धोकादायक मोहिमांची अंमलबजावणी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
सागर डिफेन्स इंजिनिअरिंगचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक- कॅप्टन निकुंज पराशर, यांनी भारतशक्तीशी बोलताना सांगितले की: “AUVs ची तैनाती, विशेषतः SDEPL च्या स्वयं-अभ्यास करणाऱ्या GENISYS कमांड आणि कंट्रोल मॉड्यूलसह, UDA बळकट करण्यात अत्यंत महत्त्वाची ठरते. प्रगत सेन्सर्स, कॅमेरे आणि संवाद प्रणालींनी सुसज्ज हे ड्रोन सतत निरीक्षण करून जागतिक सागरी सुरक्षेला हातभार लावतात.”
कॅप्टन पराशर यांच्या मते, ‘हे AUVs नौदल माईन्स किंवा बेकायदेशीर मासेमारीसारख्या पाण्याखालील धोक्यांची ओळख करून देऊ शकतात. हे ड्रोन मनुष्यबळ न वापरता धोकादायक मोहिमा पार पाडू शकतात, त्यामुळे ते कमी खर्चिक आणि अधिक कार्यक्षम ठरतात. याशिवाय, अॅण्टी-सबमरीन वॉरफेअर (ASW) आणि माईन काउंटर-मेजर्स (MCM) ऑपरेशन्समध्येही त्यांचा मोठा उपयोग होतो.’
“हे अंडरवॉटर ड्रोन्स किनारपट्टीचे मोठ्या प्रमाणावर निरीक्षण करू शकतात आणि कुठलीही संशयास्पद हालचाल ओळखून ती राष्ट्रीय सुरक्षेला इशारा देऊ शकतात,” असेही ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, या ड्रोन्सनी सागरी कॉरिडॉर आणि ऑफशोअर इन्स्टॉलेशन्सचं संरक्षण केले, ज्यामुळे बहुआयामी संरक्षण धोरणाची रचना शक्य झाली.
स्वदेशी नवप्रवर्तन आणि सामरिक भागीदारी
भारताची UDA च्या दिशेने वाढती धोरणे, स्वदेशी तंत्रज्ञान विकासालाही चालना देत आहे. आजचे AUVs, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (AI) आधारित आणि प्रगत नेव्हिगेशन प्रणालींसह, अत्यल्प मानवी हस्तक्षेपाने अत्यंत जटिल कार्य पार पाडू शकतात. यामुळे नौदलाच्या गुप्तचर आणि अंडरसी वॉरफेअर धोरणांमध्ये मोठा बदल होत आहे.
या क्षेत्रातील एक उल्लेखनीय पुढाकार म्हणजे, Autonomous Systems Industry Alliance (ASIA) ची स्थापना. ही भागीदारी, सागर डिफेन्स इंजिनिअरिंग आणि अमेरिकेतील Liquid Robotics (Boeing ची उपकंपनी) यांच्यातील असून, या संयुक्त उपक्रमाचा उद्देश- पाणबुडी तंत्रज्ञानाला पूरक ठरणाऱ्या Unmanned Surface Vehicles (USVs) चा विकास करणे हा आहे.
हे सहकार्य केवळ सागरी तंत्रज्ञानात सुधारणा करत नाही, तर भारत-अमेरिका संरक्षण सहकार्यालाही गती देते. विशेषतः लॉजिस्टिक्स, निगराणी आणि गुप्तचर सामायिकरणाच्या क्षेत्रांमध्ये. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वाढती सामरिक स्पर्धा पाहता, अशा सहकार्यामुळे भारताची जलद प्रतिसाद देण्याची आणि कार्य करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढते आहे.
हुमा सिद्दीकी