नेपाळमधील विमान अपघातात सूर्या एअरलाइन्सच्या 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

0
नेपाळमधील
24 जुलै 2024 रोजी नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताना धावपट्टीवर घसरून आग लागल्यानंतर अपघातग्रस्त झालेल्या सूर्य एअरलाइन्सच्या विमानाचे अवशेष एका दृश्यात दिसत आहेत. (रॉयटर्स)

नेपाळमधील काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताना सूर्य एअरलाइन्सच्या विमानाला लागलेल्या आगीत 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

वृत्तानुसार, धावपट्टीवरून घसरल्यानंतर विमानाला आग लागली.

पोखराला जाणाऱ्या या विमानातील कॅप्टन एम. आर. शाक्य हेच केवळ या अपघातातून बचावले आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अपघातस्थळावरून सिनामंगल येथील काठमांडू वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती कशी आहे याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी काढलेल्या छायाचित्रांमध्ये धूर वाढत असल्याचे आणि विमानाचे अवशेष संपूर्ण खंदकात विखुरलेले बघायला मिळाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

नेपाळी माध्यमांनी नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या हवाल्याने, नोंदणी क्रमांक 9एन-एएमई असलेल्या सूर्या एअरलाइन्सच्या विमानातील (सीआरजे2) 18 प्रवाशांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

नेपाळच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या बचाव समन्वय केंद्राने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, विमान उजवीकडे वळले आणि 11.11 (स्थानिक वेळ) मिनिटांनी केलेल्या उड्डाणानंतर थोड्याच वेळात धावपट्टीच्या पूर्वेकडे कोसळले.

नेपाळ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विमानात विमान कंपनीचे 17 कर्मचारी आणि दोन क्रू मेंबर्स विमानाच्या देखभालीसाठी प्रवास करत होते.

नेपाळी प्रसारमाध्यमांनी, शौर्य एअरलाइन्सच्या हवाल्याने, कंपनी कर्मचारी आणि त्यांच्या क्रू मेंबर्सची नावे जाहीर केली आहेत. कॅप्टन एम. आर. शाक्य यांच्यासह सह-पायलट एस. कटूवाल, अमित मान महाराजन, सागर आचार्य, दिलीप वर्मा, मनू राज शर्मा, अश्विन निरौला, सुदीप लाल जोशी, सर्बेश मरसैनी, श्याम बिंदूकर, नवराज आले, राजा राम आचार्य, प्रिझा खातीवाडा, अधी राज शर्मा, उद्धब पुरी, यज्ञ प्रसाद पौड्याल, संतोष महतो, पुण्य रत्न साही आणि आरेफ रेडा हे विमानात होते.

पंतप्रधान के. पी. शर्मा ओली परिस्थितीची पाहणी तसेच शौर्य एअरलाइन्सच्या विमान अपघाताची माहिती करून घेण्यासाठी अपघातस्थळी पोहोचले.

त्याआधी, गृहमंत्री रमेश लेख, सांस्कृतिक, पर्यटन आणि नागरी उड्डाण मंत्री बद्रीलाल पांडे आणि राज्य व्यवहार समितीचे अध्यक्ष रामहरी खाटीवाडा यांची टीम घटनेचा तपशील गोळा करून आवश्यक त्या सूचना देण्यासाठी घटनास्थळी पोहोचली होती.

पर्वतांनी वेढलेल्या नेपाळमध्ये प्राणघातक विमान अपघातांचा  इतिहास बघायला मिळतो.

बुधवारच्या या अपघाताच्या आधी, 2000पासून देशात झालेल्या 19 विमान अपघातांमध्ये सुमारे 360 प्रवाशांचा मृत्यू झाला.

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या देशात या शतकात वारंवार होणारे विमान आणि हेलिकॉप्टर अपघात ही निश्चितच गंभीर आणि चिंतेची बाब आहे.

नेपाळमध्ये, अनेक विमान कंपन्या दुर्गम टेकड्यांमध्ये, ढगांनी झाकलेल्या आणि रस्त्यांपासून लांब असलेल्या पर्वतांमध्ये तयार करण्यात आलेल्या छोट्या विमानतळांवर आपली उड्डाणे करतात.

24 जुलै 2024

नेपाळची राजधानी काठमांडूहून उड्डाण करत असताना बॉम्बार्डियर सीआरजे 200 विमान कोसळले आणि त्याला आग लागली. यात किमान 18 जणांचा मृत्यू झाला.

11 जुलै 2023

मध्य नेपाळमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. माऊंट एव्हरेस्ट आणि त्याच्या इतर उंच पर्वत शिखरांवर वसलेल्या सोलुखुन्व्हू जिल्ह्यातून निघालेल्या हेलिकॉप्टरमध्ये पाच मेक्सिकन नागरिक आणि एक नेपाळी पायलट होता.

15 जानेवारी 2023

नेपाळच्या यती एअरलाइन्सचे 72 प्रवाशांना घेऊन जाणारे दुहेरी-इंजिन असलेले एटीआर 72 विमान पोखरामध्ये क्रॅश झाले आणि त्यातील सर्वांचा मृत्यू झाला.

1992 साली पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान काठमांडूमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत असताना डोंगरावर कोसळल्यानंतरचा  हा देशातील सर्वात वाईट विमान अपघात होता.

29 मे 2022

काठमांडूच्या पश्चिमेस 125 किमी (80 मैल) अंतरावर असलेल्या पोखराहून उड्डाण केल्यानंतर 15 मिनिटांत कोसळलेल्या डी हॅविलँड कॅनडा डीएचसी -6-300 ट्विन ओटर विमानातील सोळा नेपाळी, चार भारतीय आणि दोन जर्मन नागरिकांचा मृत्यू झाला.

27 फेब्रुवारी 2019

पूर्व नेपाळमध्ये खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले, त्यात पर्यटन मंत्र्यांसह सर्व सात जणांचा मृत्यू झाला.

12 मार्च 2018

नेपाळी राजधानीच्या डोंगराळ विमानतळावर उतरताना ढगाळ हवामानामुळे कोसळलेल्या यूएस -बांगला एअरलाइन्सच्या बांगलादेशी विमानातील 71 पैकी 51 जणांचा मृत्यू झाला.

26 फेब्रुवारी 2016

पश्चिम नेपाळच्या कालीकोट जिल्ह्यात एका छोट्या विमानाच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली गेली. हे विमान कस्तमंडप एअरलाइन्सद्वारे चालवले जात होते.

24 फेब्रुवारी 2016

खराब हवामानामुळे एक छोटे विमान कोसळले, ज्यात सर्व 23 जणांचा मृत्यू झाला. तारा एअरद्वारे चालवले जाणारे ट्विन ओटर विमान पोखारा येथून पश्चिम नेपाळमधील जोमसोमला जात होते.

16 फेब्रुवारी 2014

खराब हवामानात अपघात झालेल्या एका लहान विमानातील सर्व 18 जणांचा मृत्यू झाला. ट्विन ऑटर विमान सरकारी नेपाळ एअरलाइन्स कॉर्पोरेशनद्वारे चालवले जात होते.

28 सप्टेंबर 2012

एक लहान प्रोपेलर-चालित डॉर्नियर विमान काठमांडूहून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच एका पक्ष्याला धडकले आणि क्रॅश झाले, त्यात सात ब्रिटिश आणि पाच चिनी प्रवाशांसह 19 जणांचा मृत्यू झाला.

25 सप्टेंबर 2011

माऊंट एव्हरेस्ट पाहण्यासाठी परदेशी पर्यटकांना घेऊन जाणारे छोटे विमान काठमांडूजवळ खराब हवामानात कोसळले आणि त्यात सर्व 19 जणांचा मृत्यू झाला.
हे विमान बुद्ध एअर या खासगी विमान कंपनीने चालवले होते.

16 डिसेंबर 2010

दुर्गम अशा पूर्व नेपाळच्या हिमालयाच्या पायथ्याशी एक छोटे विमान कोसळले, त्यात विमानातील सर्व 22 जणांचा मृत्यू झाला. ट्विन ऑटर विमान तारा एअरद्वारे चालवले जात होते.

24 ऑगस्ट 2010

नेपाळमध्ये खराब हवामानामुळे एक छोटे विमान कोसळल्याने चौदा प्रवासी – चार अमेरिकन, एक जपानी आणि ब्रिटिश नागरिकांसह – ठार झाले. ते खाजगी मालकीच्या अग्नी एअरद्वारे चालवले जात होते.

8 ऑक्टोबर 2008

ईशान्य नेपाळच्या दुर्गम पर्वतांमध्ये एक लहान ट्विन ऑटर विमान कोसळले, ज्यात कमीतकमी 18 लोक ठार झाले, यातील बहुतेक परदेशी प्रवासी होते.

4 मार्च 2008

हेलिकॉप्टर अपघातात किमान 10 लोकांचा मृत्यू. मृतांमध्ये चार संयुक्त राष्ट्र शस्त्रास्त्र मॉनिटर्सचा समावेश होता.

21 जून 2006

यती एअरलाइन्सने चालवलेले ट्विन ऑटर प्रवासी विमान देशाच्या पश्चिमेला लँडिंगच्या काही मिनिटे आधी क्रॅश झाले आणि त्यात बसलेल्या सर्व नऊ जणांचा मृत्यू झाला.

25 मे 2004

ट्विन ऑटर मालवाहू विमान माउंट एव्हरेस्ट प्रदेशात कोसळले आणि त्यातील तीन कर्मचारी ठार झाले. हे विमान यती एअरलाइन्सद्वारे चालवले जात होते.

22 ऑगस्ट 2002

परदेशी पर्यटकांना घेऊन जाणारे दुसरे ट्विन ऑटर विमान नेपाळमधील खराब हवामानामुळे डोंगरावर आदळले आणि त्यात सर्व १८ जणांचा मृत्यू झाला. शांग्रीला एअरद्वारे ही उड्डाण सेवा चालवली जात होती.

17 जुलै 2002

दुहेरी इंजिन असलेले विमान जमिनीवर उतरण्याच्या फक्त काही मिनिटे आधी पश्चिम नेपाळमधील डोंगरावर कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली गेली होती.

27 जुलै 2000

कॅनेडियन-निर्मित ट्विन ऑटर पॅसेंजर विमान पश्चिम नेपाळमध्ये कोसळले, त्यात सर्व 25 लोक ठार झाले. हे विमान सरकारी मालकीच्या रॉयल नेपाळ एअरलाइन्सद्वारे चालवले जात होते.

तृप्ती नाथ
(रॉयटर्स)


+ posts
Previous articleDefence Ministry Reserves Over One Lakh Crore For Indian Firms
Next articleNavy Chief Reviews INS Brahmaputra Damage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here