एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या एअर मोबिलिटी कमांडचे मुख्य केंद्र असलेल्या रावळपिंडी येथील नूर खान हवाई तळावर यशस्वीरित्या हल्ला करून, आधुनिक युद्धाला नवा आयाम देत इतिहास घडवला आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये, IAF ने अपवादात्मक हवाई वर्चस्व आणि गतिरोध क्षमतांमध्ये अचूकता दर्शविली, आकाशावर प्रचंड नियंत्रण प्रस्थापित केले आणि शत्रूच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना पंगू केले आणि हे सर्व देशाची सीमा न ओलांडता.
हवाई ऑपरेशन्स महासंचालनालयाच्या अधिकृत खुलाशानुसार, या मोहिमेने भारताच्या धोरणात्मक भूमिकेत निर्णायक बदल घडवून आणला. दक्षिण आशियातील नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक स्वरूपाची पुनर्रचना करण्यासाठी लांब पल्ल्याच्या अचूक शस्त्रास्त्रांचा, एकात्मिक हवाई संरक्षण आणि स्वदेशी तांत्रिक सामर्थ्याचा IAF ने पुरेपूर लाभ घेतला.
ब्रह्मोसः भारताच्या भाल्याचे टोक
या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र होते – एक संयुक्त भारत-रशियन प्लॅटफॉर्म जो आता स्वदेशी बनावटीचा आणि अतुलनीय प्रभावीतेसह कार्यरत आहे. Su-30MKI मल्टीरोल लढाऊ विमानांमधून तैनात केलेल्या, विस्तारित श्रेणीच्या ब्रह्मोसने पसरूर, चुनियान आणि सियालकोटमधील प्रमुख शत्रू पायाभूत सुविधांवर हवाई दलाला खोलवर हल्ला करण्यास सक्षम केले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील एकाही भारतीय विमानाने आंतरराष्ट्रीय सीमा (IB) ओलांडली नाही.
मॅक २.८ चा उच्चतम वेग आणि कमी रडार वैशिष्ट्यासह, ब्रह्मोस क्षेपणास्त्र शत्रूंला प्रतिक्रिया देण्याचा वेळ लक्षणीयरीत्या फक्त काही सेकंद इतका कमी करते. Su-30MKI ची 1हजार 500 किलोमीटरची लढाऊ त्रिज्या आणि ब्रह्मोसची 450 किलोमीटरची स्टँडऑफ रेंज यांच्या संयोजनामुळे भारतीय हवाई दलाच्या हल्ल्याच्या क्षमतेत बदल झाला आहे, ज्यामुळे ते भारतीय हवाई क्षेत्राच्या आतून मोक्याच्या ठिकाणांना लक्ष्य करू शकले आहे. “परिणामी झालेला विनाश सर्वांना श्वास रोखून लावणारा होता,” असे एका लष्करी निरीक्षकाने सांगितले.
पसारा न मांडता अचूक लक्ष्यभेद : एक नवीन युद्ध नमुना
ऑपरेशन सिंदूरने, निकटतेपेक्षा अचूकतेवर भर देत, तंत्रज्ञान-सक्षम गतिरोध युद्धावर भारताचे वाढते अवलंबित्व अधोरेखित केले. अनेक व्हिडिओंद्वारे बघायला मिळालेली अधिकृत वृत्ते अत्याधुनिक शस्त्रागार तैनात केल्याची पुष्टी करतात, ज्यात अतिशय मजबूत भूमिगत बंकरांना लक्ष्य करण्यासाठी क्रिस्टल मेझ-2 प्रणाली, शत्रूच्या हवाई क्षेत्रांना निष्प्रभ करण्यासाठी SCALP आणि हॅमर क्षेपणास्त्रे तसेच डीप-स्ट्राइक, बंकर-बस्टिंग मोहिमांसाठी स्पाइस-2000 बॉम्ब यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नियंत्रण रेषेचे उल्लंघन न करता यांचा वापर करण्यात आला.
भारताचे एकात्मिक हवाई संरक्षणः एक अखंड कवच
भारताच्या आक्रमक हवाई कारवाया बातम्यांमध्ये गाजत असताना, भारताच्या बहुस्तरीय हवाई संरक्षण नेटवर्कची ताकद तितकीच निर्णायक ठरली. भारतीय हवाई दलाने, तीनही दलांच्या एकत्रीकरणासह, शत्रूकडून येणाऱ्या प्रत्युत्तराच्या अपेक्षेने एक घन संरक्षणात्मक मॅट्रिक्स सक्रिय केला:
- थर्मल इमेजिंग आणि स्वयंचलित अग्नि नियंत्रणासह आता डिजिटलाइज्ड L-70 विमानविरोधी तोफा, पहलगामसारख्या क्षेत्रात कमी उंचीवरून उडणारे असंख्य UAVs रोखले.
- भारतात डिझाइन तसेच उत्पादित झालेल्या आकाश SAMs ने 25 किमी अंतरापर्यंत वेगाने फिरणाऱ्या हवाई लक्ष्यांविरुद्ध संरक्षणाचा पहिला गतिज स्तर तयार केला.
- इस्रायलसोबत संयुक्तपणे विकसित केलेल्या MR-SAMs ने मध्यम-श्रेणीचे अडथळे प्रदान केले, शत्रूच्या लढाऊ विमानांना आणि ड्रोनना अचूकतेने लक्ष्य केले.
- सर्वात बाहेरील स्तरावर, S-400 ट्रायम्फ प्रणालीने पाकिस्तानच्या फताह-II बॅलिस्टिक क्षेपणास्त्रासह लांब पल्ल्याच्या धोक्यांना रोखले आणि निष्प्रभ केले आणि भारताच्या उच्च-स्तरीय क्षेपणास्त्र ढालीची विश्वासार्हता सिद्ध केली.या एकात्मिक हवाई संरक्षण ग्रीडने संपूर्ण मोहिमेत भारतीय हवाई क्षेत्राची अखंडता कायम ठेवत शत्रू राष्ट्राच्या हवाई प्रणालींचा प्रवेश शून्य एवढा ठेवण्यात यशस्वी झाले.स्वदेशी संरक्षण क्षेत्रात वाढ
या मोहिमेमुळे संरक्षण उत्पादनात भारताच्या स्वावलंबी होण्याच्या वेगाकडेही लक्ष वेधले गेले. ब्रह्मोस, आता पूर्णपणे भारतात उत्पादित केले जाते – नुकत्याच उद्घाटन झालेल्या लखनौ सुविधेसह (राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन, 11 मे, 2025 रोजी याचे उद्घाटन केले गेले) – हे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे प्रमुख प्रतीक आहे. 130 हून अधिक यशस्वी चाचण्यांसह, ब्रह्मोस युद्धभूमीवरील अति महत्त्वाचा घटक आणि भू-राजकीय संकेत अशा दोन्ही दृष्टीने उदयास आले आहे.
आगामी ब्रह्मोस-एनजी (next generation) प्रकार, वजनाला अतिशय हलका आणि वेगवान, तेजस एमके1ए आणि राफेल सारख्या प्लॅटफॉर्मशी सुसंगतता वाढवणारा असेल. त्यामुळे आसियान आणि लॅटिन अमेरिकन देशांमध्ये याची निर्यात क्षमता वाढवणार आहे.
उदयोन्मुख क्षेपणास्त्र महासत्ता
ब्रह्मोसच्या नेतृत्वामुळे, स्वदेशी संशोधन आणि विकासाद्वारे बळकट केलेले भारताचे क्षेपणास्त्र शस्त्रागार वेगाने नवीन क्षेत्रांमध्ये विस्तारत आहे. नौदल आणि पाणबुडीतून सोडल्या जाणाऱ्या प्रकारांसह, ब्रह्मोस-एनजी एक विश्वासार्ह पूर्ण-स्पेक्ट्रम प्रतिबंधक आहे. त्याच वेळी HSTDV (Hypersonic Technology Demonstrator Vehicle) सारख्या प्रकल्पांमध्ये दिसणारी डीआरडीओची हायपरसोनिक महत्त्वाकांक्षा एक संभाव्य प्रगती दर्शवितात जी भारताला हायपरसोनिक-सक्षम राष्ट्रांच्या निवडक गटात स्थान देऊ शकते.
डीआरडीओच्या एका शास्त्रज्ञाने म्हटल्याप्रमाणे:
“ब्रह्मोस आता फक्त एक क्षेपणास्त्र राहिलेले नाही – तो एक धोरणात्मक सिद्धांत आहे. याचा अर्थ भारत खोलवर, वेगाने आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मारा करू शकतो.”
धोरणात्मक संदेश आणि प्रतिबंध
एका वरिष्ठ हवाई दलाच्या अधिकाऱ्याने निरीक्षण केल्याप्रमाणे, “ही केवळ एक कारवाई नव्हती – तो एक अचूक संदेश होता. भारत एकही रेषा न ओलांडता अचूकता, शिस्तबद्ध आणि जबरदस्त शक्तीने हल्ला करू शकतो.”
या कामगिरीविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात हीच भावना प्रतिबिंबित झाली
“फक्त तीन दिवसांत, आमच्या सैन्याने पाकिस्तानला कधीही अपेक्षित नसलेले नुकसान केले. आम्ही तेच हवाई तळ उद्ध्वस्त केले जे ते एकेकाळी अभिमानाने दाखवत होते.”
IAF च्या ऑपरेशन सिंदूरच्या अंमलबजावणीने केवळ विरोधकांसाठीच नव्हे तर जागतिक सुरक्षा समुदायासाठीही एक धोरणात्मक प्रतिबंधात्मक संकेत पाठवलाः भारत आता तणाव फार न वाढवता युद्धक्षेत्राला आकार देण्यास सक्षम आहे.
ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या संरक्षणविषयक भूमिकेतील एक निर्णायक क्षण आहे. त्याने अनेक वर्षांच्या सैद्धांतिक उत्क्रांतीला, स्वदेशी नवकल्पनांना आणि संयुक्त-शक्ती सज्जतेला मान्यता दिली. IAF ने केवळ आकाशावर वर्चस्व गाजवले नाही तर सध्याच्या युद्ध युगात आधुनिक हवाई दलाने स्पर्श न करताही हल्लीच्या साधनांनी शत्रूला कसे रोखते जाते, परावृत्त केले जाते आणि अचूकपणे काम करता येते हे दाखवून दिले.
हुमा सिद्दिकी/ रवी शंकर