पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याचा Hafiz Saeed च्या भूमिकेला दुजोरा

0
Hafiz Saeed

पाकिस्तानच्या लष्कराचे मुख्य प्रवक्ते- लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी, यांनी भारताला दिलेली धमकी ही, ‘लष्कर-ए-तोयबा’ (LeT) संघटनेचा संस्थापक आणि नामांकित दहशतवादी Hafiz Saeed च्या भडकाऊ भाषणांची आठवण करून देणारी आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने Indus Water Treaty च्या (सिंधू जल कराराच्या) काही प्रमुख अटींना स्थगिती दिली, त्याच पार्श्वभूमीवर जनरल चौधरी यांनी भारताला जाहीर धमकी दिली.

“तुमचा श्वास रोखू”

पाकिस्तानमध्ये एका विद्यापीठातील कार्यक्रमात बोलताना चौधरी म्हणाले, “जर तुम्ही आमचं पाणी रोखलंत, तर आम्ही तुमचा श्वास रोखू”, त्यांचे हेच विधान – दहशतवादी हाफिज सईदने, यापूर्वी त्याच्या एका भाषणात वापरले होते, ज्याचा व्हिडिओ X वर व्हायरल देखील झाला होता.

हाफिज सईद, 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार असून, तो भारत आणि पाश्चिमात्य देशांविरोधात वेळोवेळी द्वेषपूर्ण भाषणांसाठी कुप्रसिद्ध आहे.

Indus Waters Treaty

1960 मध्ये, जागतिक बँकेच्या मध्यस्थीने करण्यात आलेल्या Indus Waters Treaty करारानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पाण्याच्या वाटपाची नियमावली निश्चित करण्यात आली आहे, आणि नियमित डेटा देवाण-घेवाण करण्याची अट आहे.

भारताने एप्रिल 23 रोजी, या करारातील काही अटी स्थगित करून, आता दहशतवाद आणि संवाद वेगळे ठेवण्याचा दृष्टिकोन सोडल्याचे स्पष्ट केले.

भारत सातत्याने स्पष्टपणे म्हणत आला आहे की, “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही; संवाद आणि दहशतवाद एकत्र होऊ शकत नाही.”

ऑपरेशन सिंदूर: भारताची ठाम भूमिका

मे 7 रोजी, भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या धोरणात्मक लष्करी कारवाईमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील, 11 हवाई तळ निष्क्रिय करण्यात आले आणि 9 दहशतवादी ठिकाणांवर लक्ष्यबद्ध हल्ले करण्यात आले.

सॅटेलाईट प्रतिमा दर्शवतात की, पाकिस्तानातील अनेक हवाई तळ इतकी नुकसानग्रस्त झाली आहेत, की त्यांचे रनवे किमान जूनपर्यंत वापरासाठी निकामी राहतील.

आंतरराष्ट्रीय संरक्षण विश्लेषकांनी या कारवाईच्या अचूकतेचे कौतुक केले असून, ही “प्रगल्भ आक्रमकतेची” निशाणी असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी या मोहिमेबद्दल बोलताना सांगितले की, हे ‘न्यायाचं नवीन रूप’ आहे. “हा प्रतिशोध नव्हे, तर भारताच्या सामर्थ्याचे आणि निर्धाराचे दर्शन आहे. भारत आता दहशतीच्या विरोधात शांत बसणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

इस्लामाबादची नकारात्मकता आणि दिशाभूल

पाकिस्तानच्या नेतृत्वाने, या पराभवांनंतर नेहमीप्रमाणे नकारात्मकता आणि भावनिक वक्तव्यांचा आधार घेतला आहे.

इतिहासात, पाकिस्तानने आपल्या लष्करी आणि धोरणात्मक अपयशांना कमी लेखण्याची किंवा त्यांचा उत्सव साजरा करण्याची सवय जपली आहे. अंतर्मुख होण्याऐवजी, ते वारंवार आक्रमक भाषेत बोलत लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात.

परंतु या वेळेस ऑपरेशन सिंदूरमुळे, पाकिस्तानच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाला खऱ्या अर्थाने हादरा बसलेला दिसतो आहे.

ही कारवाई केवळ दहशतवादी आणि लष्करी संरचनेचा नाश करणारी नव्हे, तर पाकिस्तानच्या जनरल्सनी निर्माण केलेल्या “धोरणात्मक वर्चस्वाच्या” भ्रमालाही चकनाचूर करणारी ठरली आहे.

भारताच्या या ठोस कारवाईने आणि कूटनीतिक निर्धाराने स्पष्टपणे दाखवले आहे की, शांती आणि जबाबदारी यांचे थेट नाते जोडणारा, भारताचा हा नवा दृष्टिकोन आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleजागतिक Cybercrime Crackdown मध्ये 300+ सर्व्हर बंद
Next articleभारतीय उद्योगांना Anti-Dumping Duties ची कशी मदत झाली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here