गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तान सोबतचा महत्त्वाचा पाणीवाटप करार स्थगित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानला यापुढे भारताच्या नद्यांचे पाणी मिळणार नाही याचा पुनरुच्चार केला.
22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर – ज्यामध्ये 25 हिंदू पुरुष पर्यटकांचा मृत्यू झाला – गेल्या महिन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध जाहीर केलेल्या अनेक उपाययोजनांपैकी 1960 मध्ये जागतिक बँकेने वाटाघाटी केलेल्या सिंधू पाणीवाटप कराराचे निलंबन हा एक होता.
या हल्ल्याला पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचा भारताने आरोप केला होता. हा आरोप इस्लामाबादने फेटाळला लावला. त्यामुळे 10 मे रोजी युद्धबंदीवर सहमती देण्यापूर्वी जवळजवळ तीन दशकांमधील सर्वात वाईट लष्करी लढाईत भारत आणि पाकिस्तान सहभागी झाले होते.
“प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल … पाकिस्तानचे सैन्य ते चुकवेल, पाकिस्तानची अर्थव्यवस्था ते चुकवेल,” असे मोदी पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या वायव्येकडील राजस्थानमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात म्हणाले.
सिंधू पाणी वाटप करार
सिंधू करारानुसार भारताकडून वाहणाऱ्या तीन नद्यांमधून पाकिस्तानच्या80 टक्के शेतीला पाणी पुरवले जाते. मात्र या स्थगितीचा “तात्काळ परिणाम” होणार नाही असा दावा पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी या महिन्यात केला.
दोन्ही देशांमधील संघर्षविराम मोठ्या प्रमाणात कायम आहे, भारतीय परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले की सध्या सीमेवर गोळीबाराच्या घटना घडलेल्या नाहीत. “त्यामुळे तशा पद्धतीने सैन्याची काहीशी पुनर्स्थापना करण्यात आली आहे.”
“(लष्करी) कारवाई सुरूच आहे कारण एक स्पष्ट संदेश आहे… की जर 22 एप्रिल रोजी झालेली कृत्ये परत झाली तर प्रत्युत्तर दिले जाईल, आम्ही दहशतवाद्यांना नक्कीच मारू,” असे जयशंकर यांनी डच वृत्तसंस्थेला सांगितले.
“जर दहशतवादी पाकिस्तानात असतील तर आम्ही त्यांना तिथे जाऊन मारू,” असे ते पुढे म्हणाले.
मोदी आणि जयशंकर यांच्या टिप्पण्यांवर पाकिस्तानकडून त्वरित प्रतिक्रिया आली नाही.
1947 मध्ये ब्रिटिश भारतातून वेगळे झाल्यापासून भारत आणि पाकिस्तानचे संबंध बिघडले आहेत आणि त्यांच्यात आतापर्यंत तीन युद्धे झाली आहेत, त्यापैकी दोन युद्धे काश्मीर संदर्भात झाली आहेत, ज्यावर हे दोन्ही देश दावा करतात.
नवी दिल्ली पाकिस्तानवर काश्मीरच्या त्यांच्या भागात सुरक्षा दलांशी लढणाऱ्या इस्लामी फुटीरतावाद्यांना पाठिंबा देण्याचा आरोप करते, परंतु इस्लामाबादने हा आरोप कायमच फेटाळून लावला आहे.
एप्रिलमध्ये पहलगामला झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांविरुद्ध विविध उपाययोजनांचा अवलंब केला आहे. यात व्यापार निलंबित करणे, जमीन सीमा बंद करणे आणि बहुतेक व्हिसा निलंबित करणे अशा गोष्टींचा समावेश आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)