आपण अण्वस्त्र युद्धासाठी तयार असून जर पाश्चिमात्त्य देशांनी युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवले तर तो युद्ध लांबवणारा निर्णय ठरेल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे.
युक्रेनमधील युद्धाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिकेत दोन गट पडले आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांणी मुद्द्यावर वेगवेगळी मते आहेत. युद्धासाठी अमेरिकेचे समर्थन यानंतरही कायम ठेवण्याचा बायडेन यांचे प्रयत्न आहेत, याउलट आपण पुन्हा सत्तेवर आलो तर युद्ध समाप्तीसाठी पुढाकार घेऊ असं वक्तव्य ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचार सभांमध्ये केले आहे.
आपल्याला अण्वस्त्रांचा वापर करायचा नाही आणि युक्रेनमध्येही अण्वस्त्रांचा वापर करण्याची गरज नाही, असे पुतीन यांनी स्पष्ट केले. मात्र, अमेरिकेने अण्वस्त्र चाचण्या घेतल्या तर रशियालाही तेच करायला भाग पाडले जाऊ शकते.
देश खरोखरच आण्विक युद्धासाठी तयार आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना पुतीन यांनी रोसिया-1 दूरचित्रवाणी आणि वृत्तसंस्थेला सांगितले की, “लष्करी-तांत्रिक दृष्टिकोनातून, आम्ही नक्कीच तयार आहोत.
पुतीन पुढे म्हणाले की, आण्विक संघर्षाकडे सगळ्यांची वाटचाल सुरू आहे, असे मला वाटत नाही पण तरीही आम्ही यासाठी तयार आहोत”
गेल्या काही महिन्यांत, रशियन सरकारने पाश्चिमात्य देशांना वारंवार इशारा दिला आहे की, जर त्यांनी युक्रेनमध्ये लढण्यासाठी आपले सैन्य पाठवले तर ते अण्वस्त्र युद्धाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहेत असं मानलं जाईल.
पूर्व युक्रेनमधील डोनेस्तक प्रदेशात आठ वर्षांच्या सलग संघर्षानंतर रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले आणि खऱ्या अर्थाने युद्ध सुरू झाले. युक्रेनमधून आपण रशियन सैन्याला हाकलून लावू या अध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी केलेल्या वक्तव्याचे पाश्चिमात्य देशांनी समर्थन केले. मात्र दोन वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या युद्धात, रशियाने एक पंचमांश भूभागावर नियंत्रण मिळवले आहे.
दोन्ही महासत्तांचे जगातील 90 टक्क्यांहून अधिक अण्वस्त्रांवर नियंत्रण आहे. या मुद्द्यावर गंभीर चर्चेसाठी रशिया तयार असल्याचे पुतीन यांनी याआधीच म्हटले आहे. मध्यस्थांच्या संपर्कानंतरही युक्रेनमधील युद्धबंदीची पुतीन यांनी केलेली सूचना अमेरिकेने नाकारली असल्याचे वृत्त आहे.
पिनाकी चक्रवर्ती