‘वागशीर’ स्कॉर्पीन पाणबुडीचे जलावतरण

0

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमात गौरवशाली वाटचाल सुरू ठेवली आहे. याच परंपरेत प्रकल्प-75 ची सहावी स्कॉर्पीन पाणबुडी ‘वागशीर’चे जलावतरण बुधवारी (20 एप्रिल 2022) प्रमुख पाहुणे वीणा अजय कुमार, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांच्या हस्ते झाले. यानंतर,  वर्षभराहून अधिक काळ या पाणबुडीच्या विविध कठोर आणि व्यापक चाचण्या घेण्यात येणार आहे. त्यानंतर ती नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल. ही एक शक्तिशाली पाणबुडी आहे.
स्कॉर्पीनमध्ये वापरलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उत्कृष्ट स्टेल्थ वैशिष्ट्ये आणि अचूकतेचा वापर करून शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता त्यात आहे. हा हल्ला टॉर्पेडो आणि ट्यूब लाँच केलेल्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी, पाण्याखाली किंवा पृष्ठभागावर केला जाऊ शकतो. हिंद महासागरातील सँड फिश या प्राणघातक माशाच्या नावावरून वागशीर हे नाव देण्यात आले आहे. पहिली पाणबुडी वागशीर, 26 डिसेंबर 1974 रोजी भारतीय नौदलात दाखल झाली होती आणि जवळजवळ तीन दशकांच्या देश सेवेनंतर 30 एप्रिल 1997 रोजी निवृत्त करण्यात आली होती. नाविक परंपरेनुसार, त्याच नावाने ही नवीन पाणबुडी आहे.
स्कॉर्पीन पाणबुडी तयार करणे हे माझगाव डॉकसाठी खरोखरच एक आव्हान होते, कारण जागेच्या प्रश्नामुळे कामांची गुंतागुंत झपाट्याने वाढली. तथापि, गुणवत्तेत किंवा कामगिरीमध्ये कोणतीही तडजोड न करता माझगाव डॉकने विविध आव्हाने यशस्वीरित्या पार पडली. स्कॉर्पीन पाणबुडी विविध प्रकारच्या मोहिमा राबवू शकते. पृष्ठभागावरील युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्तचर माहिती गोळा करणे, भूसुरुंग पेरणे, परिसराची टेहळणी इत्यादीचा यांचा यात समावेश आहे. पाणबुडीची रचना सर्व प्रकारच्या कार्यवाहीसाठी केली आहे.
भारताचे स्थान मजबूत
वागशीरच्या जलावतरणाने, भारताने पाणबुडीची निर्मिती करणारे राष्ट्र म्हणून आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. ‘युद्धनौका आणि पाणबुडी निर्माण करणारे राष्ट्र’, अशी भारताला ओळख देत माझगाव डॉकने आपल्या प्रतिष्ठेपेक्षा अधिक काम केले आहे. हे सरकारच्या सध्याच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने असलेल्या प्रयत्नांशी पूर्णपणे सुसंगत आहे.
माझगाव डॉक इथे चालू असलेल्या प्रोजेक्ट-75 स्कॉर्पीन कार्यक्रमातील कलवरी, खांदेरी, करंज आणि वेला या चार पाणबुड्या भारतीय नौदलात दाखल झाल्या आहेत. पाचवी पाणबुडी वगीर सागरी चाचण्यांच्या टप्प्यात आहे, तर सहाव्या आणि शेवटच्या पाणबुडीचे जलावतरण झाल्यानंतर सागरी चाचण्या पार पडतील. संरक्षण उत्पादन विभाग आणि भारतीय नौदलाच्या सक्रिय प्रोत्साहनाशिवाय तसेच त्यांच्या बिनशर्त पाठिंब्याशिवाय, स्कॉर्पीन प्रकल्पाला सुधारणा आणि त्याच्या बांधकामाच्या विविध टप्प्यांमध्ये सध्याची प्रगती साधता आली नसती.
उल्लेखनीय बाब म्हणजे, माझगाव डॉकने 1992 – 1994 दरम्यान बांधलेल्या दोन एसएसके पाणबुड्या आज 25 वर्षांहून अधिक काळानंतरही सक्रिय सेवेत आहेत. माझगाव डॉक कर्मचाऱ्यांच्या व्यावसायिकतेची आणि क्षमतेचीच ही साक्ष आहे. माझगाव डॉकने भारतीय नौदलाच्या चारही एसएसके वर्गाच्या पाणबुड्यांचे मध्यम रिफिट-कम-अपग्रेडेशन यशस्वीरित्या पार पाडून पाणबुडी रिफिटमध्ये कौशल्य प्राप्त केले.
माझगाव डॉकचे योगदान
राष्ट्रीय सागरी सुरक्षा आणि राष्ट्र उभारणीत माझगाव डॉकचे योगदान सध्या 03 मध्ये सुरू असलेल्या बांधकामासह P-15B विशाखापट्टणम क्लास डिस्ट्रॉयर्स आणि 04 क्र. P-17A निलगिरी क्लास स्टेल्थ फ्रिगेट्स इथे सुरू आहे. संवेदनशील तसेच वेळेत भविष्यातील आव्हानांची जाणीव असल्याने माझगाव डॉकने पायाभूत तसेच इतर सुविधांसाठी एक व्यापक आधुनिकीकरण कार्यक्रम हाती घेतला आणि पूर्ण केला. 04 ड्रायडॉक, 03 स्लिपवे, 02 वेट बेसिन आणि कार्यशाळेचे साठ हजारांहून अधिक चौरस मीटर क्षेत्रफळ, एकाच वेळी 10 कॅपिटल युद्धनौका आणि 11 पाणबुड्या बांधण्याची क्षमता यात आहे.
खरेतर, लिएंडर आणि गोदावरी क्लास फ्रिगेट्स, खुकरी क्लास कॉर्वेट्स, कोस्ट गार्ड ओपीव्ही, 1241 आरई क्लास मिसाईल बोट्स, दिल्ली आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर्स, शिवालिक क्लास स्टेल्थ फ्रिगेट्स, एसएसके पाणबुड्या आणि त्याच्या पट्टयातील स्कॉर्पीन पाणबुडी, हे आधुनिक काळातील माझगाव डॉकचा इतिहास हा स्वदेशी युद्धनौका आणि भारतातील पाणबुडी बांधणीचा समानार्थी शब्द आहे.


Spread the love
Previous articleiDEX Defence: A Game-changer For Make-In-India Push
Next articleलष्कर कमांडरांच्या परिषदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मार्गदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here