पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना, जैश-ए-मोहम्मद (JeM) चा वरिष्ठ कमांडर आणि अलीकडेच भारताला बल्कनायझेशन (विभाजन) करण्याची धमकी देणारा, मौलाना अब्दुल अज़ीज़ इसार (Maulana Abdul Aziz) याचा, सोमवारी पाकिस्तानमधील बहावलपूर येथे संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची माहिती, अहवालातून समोर आली आहे.
अत्यंत टोकाच्या ‘गजवा-ए-हिंद’ विचारसरणीचा प्रचारक असलेल्या आणि JeM मध्ये प्रभावशाली स्थान असलेल्या, अब्दुल इसारच्या अचानक मृत्यूमुळे, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणांमध्ये चर्चा सुरू आहे.
या दहशतवाद्याचे अंत्यसंस्कार बहावलपूरच्या, जैश मुख्यालयातील “सेंट्रल मरकज” येथे करण्यात आले, जे संघटनेसाठी सामरिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे केंद्र मानले जाते.
हेच ठिकाण भारताच्या “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान, प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आले होते, जे सीमापार दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी राबवले गेले होते.
ही सुविधा 2019 मधील, पुलवामा आत्मघाती हल्ल्यासारख्या अनेक दहशतवादी कारवायांच्या नियोजनासाठी वापरली गेली होती, ज्यामध्ये 40 सीआरपीएफ जवानांना आपला जीव गमवावा लागला होता.
JeM समर्थकांनी टेलिग्रामवर इसारचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असा दावा केला असला, तरी पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून यासंबंधी कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
कुख्यात दहशतवादी
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील अशरफवाला गावचा रहिवासी असलेला अब्दुल अज़ीज़ इसार भारताविरुद्धच्या भडकावू भाषणांसाठी कुख्यात होता.
त्याने वारंवार भारताचे तुकडे करण्याचे आणि हिंदू समाजाविरुद्ध हिंसक जिहाद चालवण्याचे खुले आवाहन केले होते. केवळ गेल्या महिन्यातच एका सार्वजनिक सभेत त्याने “बलपूर्वक जम्मू आणि काश्मीर काबीज करण्याची” धमकी दिली होती.
भारताच्या प्रत्युत्तरात्मक दहशतवादविरोधी कारवाईनंतर, अब्दुलने एका व्हिडिओमध्ये नव्या घुसखोरींच्या इशाऱ्यांसह एक आक्रमक संदेश दिला होता. त्याच्या दुसऱ्या भाषणात, त्याने भारताची तुलना सोव्हिएत संघाशी केली आणि आपल्या समर्थकांना गजवा-ए-हिंदचे ध्येय पूर्ण होईपर्यंत चालू ठेवण्याचे आवाहन केले.
संघटनेतील अस्थिरतेची शक्यता
त्याचा अचानक आणि संशयास्पद मृत्यू, ही JeM संघटनेसाठी एक मोठी घटना मानली जात असून, यामुळे संघटनेच्या नेतृत्वात अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सुरक्षा विश्लेषकांचे मत आहे.
भारतीय सुरक्षा यंत्रणा या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, संभाव्य प्रतिशोधात्मक कारवाया किंवा JeM च्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारी घेतली जात आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)