“स्फोटाच्या तीव्रतेमुळे दोन घरांची छते कोसळली आणि सहा मुले जखमी झाली,” असे या परिसरात तैनात असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी, उत्तर वझिरीस्तान हा दहशतवादी हिंसाचाराचा, विशेषतः तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा (टीटीपी), दीर्घकाळापासूनचा केंद्रबिंदू आहे.
पाकिस्तानमध्ये, विशेषतः खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान या अशांत प्रांतांमध्ये दहशतवादी हिंसाचारात तीव्र वाढ होत असताना हा बॉम्बस्फोट झाला आहे.
मार्चमध्ये, दक्षिण वझिरिस्तानच्या जंडोला चेकपोस्टजवळील फ्रंटियर कॉर्प्स कॅम्पवर आत्मघातकी बॉम्बस्फोट झाल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने 10 संशयित टीटीपी अतिरेक्यांना ठार मारल्याचे वृत्त दिले असल्याचे, जिओ न्यूजने म्हटले आहे.
त्याच महिन्यात, बलुच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) अतिरेक्यांनी गुडालर आणि पिरू कुनरीजवळ जाफर एक्सप्रेस ट्रेनवर हल्ला केला, ज्यामध्ये 21 प्रवासी आणि चार निमलष्करी कर्मचारी ठार झाले.
पाकिस्तान वाढत्या दहशतवादाशी झुंजत आहे, ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 मध्ये दहशतवादाशी संबंधित मृत्यूंमध्ये 45 टक्के वाढ झाल्याचे वृत्त आहे. 2023 मध्ये 748 तर 2024 मध्ये 1 हजार 81 दहशतवादी मृत्यू झाले. या आकडेवारीमुळे पाकिस्तान जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)