Thursday, March 5, 2026
Solar
Home Bharat Shakti Marathi अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर, मोदींची घेणार भेट

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर, मोदींची घेणार भेट

0
उपराष्ट्राध्यक्ष
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स 11 फेब्रुवारी 2025 रोजी पॅरिस, फ्रान्स येथील अमेरिकेच्या राजदूताच्या निवासस्थानी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या द्विपक्षीय बैठकीला उपस्थित होते. (रॉयटर्स/लेह मिलिस/पूल)
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स सहकुटुंब 18 ते 24 एप्रिल दरम्यान इटली आणि भारताला भेट देणार असून दोन्ही देशांमध्ये आर्थिक आणि धोरणात्मक चर्चा पुढे नेण्याच्या योजना आहेत. 

उपराष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जे. डी. व्हान्स आठवड्याच्या उत्तरार्धात भारतात येण्यापूर्वी प्रथम रोमला भेट देतील.

त्यांची पत्नी उषा व्हान्स-अमेरिकेच्या पहिल्या भारतीय ज्या अमेरिकेच्या द्वितीय महिला बनल्या आहेत त्यांच्या इवान, विवेक आणि मिराबेल या तीन मुलांसह जे. डी. व्हान्स यांच्यासोबत असतील.

पहिला अधिकृत भारत दौरा

उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. त्यांच्या दौऱ्यादरम्यान ते 21 एप्रिल रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील, याला परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे.

व्हान्स या़चे शिष्टमंडळ जयपूर आणि आग्रा येथेही जाईल आणि दोन्ही बाजूंच्या कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होईल.

व्यापारी वाटाघाटी

संभाव्य व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे चीन वगळता परस्पर शुल्क 90 दिवसांसाठी स्थगित केल्याच्या अध्यक्ष ट्रम्प यांच्या अलीकडील घोषणेनंतर नवीन व्यापार तणावाच्या दरम्यान व्हान्स यांचा भारत दौरा होणार आहे.

या चर्चेत व्यापार चर्चा ठळकपणे होण्याची अपेक्षा आहे.  एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याने ब्लूमबर्ग न्यूजला सांगितले की सहा आठवड्यांत अमेरिकेबरोबर व्यापार कराराला अंतिम रूप देण्याची भारताला आशा आहे.

व्हान्स-मोदी पॅरिस बैठक

फेब्रुवारीमध्ये पॅरिसमध्ये एआय कृती शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि व्हान्स यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा दौरा होणार आहे.

अलीकडेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याआधी ही बैठक झाली होती. व्हाईट हाऊसने नमूद केले की दोन्ही नेत्यांनी स्वच्छ उर्जेमध्ये, विशेषतः अमेरिकन आण्विक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अमेरिका-भारत सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली.

व्हॅन्स यांचा इटली दौरा

इटलीमध्ये, व्हान्स पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि व्हॅटिकन सेक्रेटरी ऑफ स्टेट कार्डिनल पिएट्रो पॅरोलिन यांची भेट घेणार आहे.

रोममधील त्यांच्या बैठका इस्टर-संबंधित समारंभांशी जुळणाऱ्या असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चेसाठी मेलोनीच्या स्वतःच्या वॉशिंग्टन दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी ईयूच्या शुल्क सवलत अजेंड्यावर चर्चा होणार आहे.

ट्रम्प यांच्या नवीन व्यापार अजेंड्याखाली व्यापार वाटाघाटी तापत असताना व्हान्स यांचा हा दौरा होत आहे.

यापूर्वी लादलेल्या दरांमुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली.‌अर्थात प्रशासनाने नंतर नवीन सौद्यांना वेळ देण्यासाठी शुल्क तात्पुरत्या 10 टक्के दरापर्यंत कमी केले. या चौकटीअंतर्गत इटली आणि भारत हे दोन्ही अमेरिकेचे महत्त्वपूर्ण व्यापारी भागीदार देश तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज

+ posts
Previous articleDAP-2020 : संरक्षण संपादन प्रक्रियेचे सोप्या शब्दांत विश्लेषण
Next articleUkraine: ओडेसा शहरावर रशियाचा ड्रोन हल्ला; तीनजण जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here