हवाई वर्चस्व, Narrative setback: ऑपरेशन सिंदूरचे धडे

0

वेगवान आणि निर्णायक ऑपरेशन सिंदूरमुळे निर्माण झालेला धुराळा शांत होत असताना, भारत स्वतः एका गंभीर टप्प्यावर अडकला आहे. एकीकडे, भारतीय लष्कराने आपल्या कामगिरीने एक स्पष्ट संदेश दिला आहे-अतुलनीय तांत्रिक श्रेष्ठत्व, अखंड समन्वय आणि हवेत कार्यरत वर्चस्व प्रदर्शित करणे. दुसरीकडे, माहिती आणि वर्णनात्मक जगात अजूनही एक वेगळीच युद्धभूमी बघायला मिळत आहे जिथे विजयाकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि यासंदर्भातील धारणा, मते अनेकदा भारताबाहेरून आकाराला येत आहेत, बनवली जात आहेत.

मुख्य संपादक नितीन ए गोखले यांनी अमिताभ रेवी आणि नीलांजना बॅनर्जी यांच्यासोबत बसून ऑपरेशन सिंदूरची कथा उलगडली. या शोने एक अस्वस्थ करणारे सत्य अधोरेखित केले: भारत गतिमान क्षेत्रात युद्धे जिंकत असताना, पाकिस्तान विविध narrative तयार करण्यात वरचढ ठरत आहे.

धोरणात्मक नकाशाची पुनर्रचना करणारी मोहीम

ऑपरेशन सिंदूरने, सर्व बाबतींत, भारताच्या पारंपरिक प्रतिबंधात्मक स्थितीत लक्षणीय बदल केला. काळजीपूर्वक तयार करण्यात आलेल्या या मोहिमेत पाकिस्तानात
लष्करी आणि दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. हवाई तळांवर हल्ले करण्यात आले, दारुगोळा नष्ट करण्यात आला आणि अतिशय आलिशान अशा घरांमध्ये राहणाऱ्या दहशतवाद्यांना योग्य प्रकारे टिपून त्यांना यमसदनी पाठवण्यात आले-हे सर्व अत्यंत अचूकपणे आणि भारताला कोणत्याही व्यापक संघर्षात न खेचता.

संघर्षवाढीच्या दरम्यान भारताच्या हवाई संरक्षणाचे उल्लंघन झाले नाही ही वस्तुस्थिती देशाच्या सातत्याने परिपक्व होत असलेल्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेचा पुरावा आहे. गेल्या दशकात स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि आधुनिकीकरणाद्वारे विकसित केलेल्या क्षमतांचे एक महत्त्वपूर्ण प्रतीक असलेल्या Kamikaze drones, loitering munitions आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींनी भारतीय अवकाश सुरक्षित करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

विशेष म्हणजे, चीनचे मूळ उत्पादन असलेल्या HQ-9 प्रणालीसह पाकिस्तानी हवाई संरक्षण कोणत्याही विश्वासार्ह प्रत्युत्तराची नोंद करण्यात अयशस्वी ठरले. भारतशक्तीचे मुख्य संपादक नितीन अ. गोखले यांच्या मते, “भारताने आक्रमक हल्ले करण्यापासून ते हवेतील हल्ले – प्रतिहल्ले यांचे नियम ठरवण्यापर्यंत मजल मारली आहे.”

पाकिस्तानचे पतन आणि सक्तीचे Narrative Spin

शत्रूत्वाच्या या टप्प्यात जे दिसून आले ते म्हणजे तयारी आणि प्रत्युत्तर या दोन्ही बाबतीत पाकिस्तानी सैन्याचे अक्षरशः झालेले पतन. अनेक मोक्याच्या ठिकाणी भारताने हल्ला केला असला तरी, त्याला फारसे प्रभावी प्रत्युत्तर पाकिस्तानला देता आले नाही.

कारवाई झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच, पाकिस्तानी अधिकारी आणि माध्यमांनी “विजय” घोषित केला आणि दावा केला की भारताला “धडा शिकवण्यात आला आहे” तसेच पाकिस्तानवरील “संकट टळले आहे.” ही विधाने वास्तवापासून पूर्णपणे वेगळी होती. मात्र ती अनेक दशकांपासूनच्या hyper-nationalistic state narratives साठी स्थानिक प्रेक्षकांना उद्देशून होती.

गोखले यांनी आठवण करून दिली की, माहितीचा असा विपर्यास ही नवीन गोष्ट नाही. 1965 मध्ये, भारतीय रणगाडे त्यांच्या हद्दीत खोलवर घुसले असतानाही पाकिस्तानने युद्ध जिंकल्याचा दावा केला होता. 1971 मध्ये 93 हजार सैन्याच्या आत्मसमर्पणाला राजनैतिक “तडजोडी” मध्ये रूपांतरित केले गेले. या ऐतिहासिक पद्धतीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे.

मात्र अधिक चिंताजनक बाब म्हणजे अशा spin केलेल्या गोष्टींचा आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटणारा प्रतिध्वनी. काही पाश्चात्य माध्यमांनी – विशेषतः सीएनएन आणि द न्यू यॉर्क टाईम्स – स्वतंत्र स्रोतांकडून किंवा भारतीय अधिकाऱ्यांकडून तथ्ये पडताळून न बघता, पाकिस्तानी चर्चेचे मुद्दे उचलले. परिणाम – अशा घटनांबद्दल एक विकृत जागतिक धारणा निर्माण होते ज्यामध्ये भारताचा स्पष्ट धोरणात्मक विजय अशा काही माध्यमांच्या संपादकीय पक्षपातीपणा किंवा संदर्भाच्या अभावामुळे धूसर होतो.

पहलगाम: ऑपरेशन सिंदूरमुळे ठिणगी पेटली

पण ऑपरेशन सिंदूरने भारताच्या कठोर शक्ती क्षमतेचे प्रदर्शन केले असले तरी, अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनाबद्दल कठोर प्रश्न उपस्थित करणे महत्त्वाचे आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर स्थिर, सुरक्षित आणि व्यवसायासाठी खुले असल्याचे भारत सरकारच्या दृढ प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर पहलगाममधील अलिकडच्या हल्ल्याची सुरुवात झाली. 2024 मध्ये विक्रमी पर्यटकांचे आगमन – 3.5 दशलक्षांहून अधिक – सामान्य स्थिती  आल्याचा पुरावा म्हणून सांगितले गेले, नागरी झोनमध्ये सुरक्षा तैनाती हळूहळू शिथिल करण्यात आली. परंतु ती शांतता कदाचित फसवी होती.

मुख्य संपादक नितीन अ. गोखले, अमिताभ रेवी आणि नीलांजना बॅनर्जी यांनी अतिरेकी गटांनी या परिस्थितीचा कसा गैरफायदा उचलला याचा आढावा घेतला. गोखले यांनी असा युक्तिवाद केला की पहलगाम हल्ला हा केवळ आणखी एक दहशतवादी हल्ला नव्हता – तो अशा वेळी करण्यात आलेला एक सुनियोजित हल्ला होता जेव्हा पाकिस्तानचे सैन्य आणि गुप्तचर संस्था जागतिक दबावाखाली होते आणि विश्वासार्हतेच्या मुद्द्यांमुळे अडचणीत होते. या हल्ल्याचा उद्देश केवळ जीवितहानीच नव्हे तर अधिकाधिक नुकसान पोहोचवणे, भारताची शांतता उद्ध्वस्त करणे, काश्मीरच्या आर्थिक पुनरुज्जीवनाला धक्का देणे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रदेशात पुन्हा भीती निर्माण करणे हा होता.

‘भारताची दुखरी नस: द नॅरेटिव्ह बॅटलफिल्ड’

संघर्षामध्ये यश मिळाल्यानंतरही भारत Narrative च्या आघाडीवर वारंवार अपयशी का ठरत आहे? नितीन गोखले यांनी एका संरचनात्मक अंतराबाबत स्पष्टीकरण केले -जेव्हा आंतरराष्ट्रीय व्याप्तीचा विचार केला जातो तेव्हा भारताची लष्करी आणि राजनैतिक शस्त्रे अनेकदा बंदिस्त अवस्थेत काम करतात. त्यात भर पडते ती जागतिक माध्यम परिसंस्था आणि विचारवंतांशी सातत्याने संबंध टिकवून ठेवण्याबाबत असणारी उदासीनता. परिणामी या पातळीवर एक पोकळी निर्माण झाली आहे, ज्याचा पाकिस्तान आणि त्याचे लॉबिस्ट त्वरित फायदा उचलत आहेत. त्यांच्या मते, ते म्हणतात, “माहितीचे युद्ध आता दुय्यम राहिलेले नाही हे आमच्या धोरणकर्त्यांनी अजूनही स्वीकारलेले नाही. माहिती हा आधुनिक संघर्षाचा केंद्रबिंदू आहे.”

यानंतर लक्षात ठेवण्याचे धडे

ऑपरेशन सिंदूर हे केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे, तर स्वतः भारतासाठी एक जागे करणारा इशारा असला पाहिजे. या मोहिमेने हे सिद्ध केले की भारताकडे आता सखोल, अचूक आणि दुर्लक्ष करता येणार नाही अशा गतिमान कारवाया करण्याची क्षमता आहे. त्यात सक्रिय मोहिमांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण बघायला मिळाले आणि संपूर्ण युद्धात कुठेही न अडखळता आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची भारताची क्षमता अधोरेखित झाली.

यानंतरच्या काळात लष्करी श्रेष्ठत्वाला योग्य त्या narrative dominance ची जोड मिळाली पाहिजे. आजच्या माहितीच्या युगात परस्परांशी जोडलेल्या जगात, जनतेची मते, विशेषतः जागतिक व्यासपीठांवर, राजनैतिक परिणाम, आर्थिक धारणा आणि आंतरराष्ट्रीय वैधतेस आकार देतात.

पत्रकारिता, शिक्षण, राजनैतिकता आणि संरक्षण क्षेत्रातील प्रतिभांना आकर्षित करून भारताने धोरणात्मक संवाद विभागांना संस्थात्मक स्वरूप देण्याची वेळ आली आहे. आकलनाची लढाई ही केवळ युद्धाची पोस्टस्क्रिप्ट नाही. ती वाढत्या प्रमाणात युद्धच बनत चालली आहे.

थोडक्यात पण महत्त्वाचे

ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या गतिज लष्करी सिद्धांतातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून लक्षात ठेवले जाईल – एक असा क्षण जेव्हा हवाई शक्ती, तांत्रिक अत्याधुनिकता आणि real time बुद्धिमत्ता एकत्रितपणे जलद आणि आश्चर्यकारक परिणाम दाखवत होते. पाकिस्तानच्या प्रतिसादातील ढिलाईमुळे खोलवरच्या धोरणात्मक असुरक्षा उघड झाल्या आहेत.

मात्र, जोपर्यंत भारत आपली कहाणी जागतिक स्तरावर – जलद, विश्वासार्ह आणि खात्रीशीरपणे – स्वीकारण्यासाठी आणि सांगण्यासाठी पुढे येत नाही तोपर्यंत त्याने मिळवलेले विजय पुसून टाकण्याचा किंवा मोठमोठ्याने बोलणाऱ्या शत्रूंकडून वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचा धोका आहे.

आधुनिक युद्धात, perception ही शक्ती आहे. भारताने आता हे वास्तव स्वीकारायला पाहिजे.

नीलांजना बॅनर्जी


+ posts
Previous articleIndia Asserts Military Superiority By Beating Pakistan’s Chinese Arms
Next articleWashington Shifts to ‘Direct Talks’ Line After India Rejects Trump’s Mediation Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here