
“एकदा खटला संपून त्याचा निकाल लागला की, आम्ही औपचारिकपणे भारताला हसीनांना आमच्याकडे सुपूर्द करण्याची विनंती करू,” हे अधोरेखित करत दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याची सदस्यता घेतल्यामुळे, “भारत त्याचे पालन करण्यास बांधील असेल,” असे नमूद करायला ते विसरले नाहीत.
बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेबाबत भारत सरकारच्या चिंतेबद्दल विचारले असता युनुस म्हणाले, “या मुद्द्यावर जे काही बोलले जात आहे तो बहुतांश अपप्रचार (propaganda) आहे आणि तथ्यांवर आधारित नाही.”
“भारताशी मजबूत आणि सहकार्यात्मक संबंध” असावेत असे एकीकडे म्हणत असताना त्यांनी बांगलादेशच्या सर्वात मोठ्या शेजारी देशावर (भारतावर) घणाघाती टीका केली. याशिवाय सार्कचे (साउथ एशियन असोसिएशन फॉर रीजनल कोऑपरेशन) पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानच्या डावपेचांमुळे अकार्यक्षम बनलेल्या या गटात फार कार्यक्षम राहण्यात भारताला फार काही रस असेल असे वाटत नाही.
घटनात्मक आणि न्यायिक सुधारणांची अंमलबजावणी केल्यानंतरच निवडणुका घेतल्या जातील, तसेच निवडणूक व्यवस्थेतही बदल केला जाईल, असे सांगताना निवडणुका घेण्याबाबत पूर्वी केलेल्या मुद्द्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
“आम्हाला अर्थव्यवस्था, प्रशासन, नोकरशाही आणि न्यायव्यवस्थेत सर्वसमावेशक सुधारणांची गरज आहे”, असे ते म्हणाले. अनेक गट आता सुधारणांची अंमलबजावणी कशी करावी याचा अभ्यास करत आहेत आणि एकदा त्यांच्याकडून शिफारसी आल्या की त्यावर अंमलबजावणी सुरू होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्यासाठी किती कालमर्यादा देण्यात आली आहे याबाबत त्यांनी कोणताही खुलासा केला नाही.
“या सुधारणांची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ लागणार आहे कारण आपण मुळापासून नवीन बांगलादेश तयार करत आहोत,” असे ते म्हणाले. त्यांच्या स्वतःच्या योजनांबद्दल, “मी राजकारणी नाही, मी नेहमीच राजकारणापासून दूर राहिले आहे. ज्या व्यक्ती तत्त्वांचे पालन करतात, नियम आणि कार्यपद्धतींचे पालन करतात आणि भ्रष्टाचारापासून मुक्त आहेत, त्यांनी निवडणुकीत उभे राहिले पाहिजे,” असेही मत त्यांनी व्यक्त केले.