स्थानिक वृत्त माध्यमांच्या हवाई फुटेजमध्ये मंगळवारी संध्याकाळी राज्याची राजधानी सॅक्रामेंटोपासून सुमारे 40 मैल (64 किमी) पश्चिमेला असलेल्या एस्पार्टोच्या योलो काउंटी समुदायाजवळ असणाऱ्या विस्तृत भागात एका प्रचंड, गडगडाटी आवाजात एका आगीच्या गोळ्यात मोठ्या गोदामासारखी इमारत उध्वस्त झाल्याचे दिसून आले.
व्यापक नुकसान
स्फोटानंतर काळ्या धुराचे लोट सर्वत्र पसरले आणि त्यानंतर घटनास्थळी साठवण्यात आलेल्या साहित्याच्या साठ्यामुळे आकाशात डझनभर लहान स्फोट झाल्याचे बघायला मिळाले.
कॅलिफोर्नियाच्या वनीकरण आणि अग्निशमन विभागाचे प्रवक्ते जेसन क्ले यांच्या मते, स्फोटातून पसरलेल्या ज्वाळांनी आजूबाजूच्या सुमारे 78 एकर (32 हेक्टर) वनस्पती जळून खाक झाल्या.
“सुरुवातीला या घटनेत” जखमी झालेल्या दोन जणांना वैद्यकीय उपचार मिळाले असले तरी इतर सातजण बेपत्ता असल्याचे, एस्पार्टो अग्निशमन जिल्ह्याचे अग्निशमन प्रमुख कर्टिस लॉरेन्स यांनी बुधवारी घटनेनंतर सुमारे २४ तासांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
घटनेचा तपास सुरू
4 जुलै रोजी होणाऱ्या अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या तीन दिवस आधी घडलेल्या या घटनेमागचे कारण राज्य अग्निशमन दलाच्या कार्यालय तपासत असल्याचे लॉरेन्स यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की अग्निशमन दलाचे जवान आणि इतर आपत्कालीन प्रतिसाद कर्मचारी घटनास्थळापासून सुरक्षित अंतर राखून मदतकार्य करत होते. फटाक्यांमुळे निर्माण झालेल्या धोक्यांचा अंदाज बांधता येत नसल्याने बुधवारी संध्याकाळपर्यंत संपूर्ण काळजी घेत मदतकार्य सुरू राहिले.
लॉरेन्स म्हणाले की, बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी तसेच संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मदतपथकांकडून त्या भागात ड्रोन आणि विमानांचे उड्डाण सुरू होते
‘असे काहीही पाहिले नाही’
बेपत्ता झालेले लोक त्या कारखान्यातील कामगार होते की प्रत्यक्षदर्शी होते याबाबत माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला, मात्र अग्निशमन दल किंवा इतर आपत्कालीन कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी त्यांनी स्पष्ट केले.
“मी असे काहीही पाहिले नाही,” लॉरेन्स म्हणाले.
घटनास्थळी आत जाणे पुरेसे सुरक्षित केव्हा आहे हे अधिकाऱ्यांना कसे समजेल असे विचारले असता, ते म्हणाले, “ते केव्हा होणार आहे आणि घटनास्थळ प्रत्यक्षात कसे दिसते याचे निश्चित उत्तर मिळणे आतातरी कठीण आहे.”
लॉरेन्स म्हणाले की, या घटनेमुळे घटनास्थळाभोवती असलेला परिसर रिकामा करण्यात आला. सुमारे 150 घरे आणि शेतांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे.
उद्ध्वस्त झालेल्या कारखान्यात सार्वजनिक प्रदर्शनासाठी विकल्या जाणाऱ्या व्यावसायिक फटाक्यांशी संबंधित परवानाधारक आतिशबाजी करणारे फटाके होते. परंतु फटाके तिथे फक्त साठवले जात होते की उत्पादित केले जात होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)