मागील आठवड्यात, चीनच्या तटरक्षक दलाने (Chinese Coast Guard) आपल्या सर्वात मोठ्या जहाजांपैकी एका जहाजांचे सामर्थ्य पॅसिफिक बेटांना दाखवून दिले, जे विशेषतः तैवान समुद्रधुनीतील समुद्री कायदा अंमलबजावणीसाठी वापरले जाते. ही कृती चीनच्या पॅसिफिक क्षेत्रात सामरिक उपस्थिती वाढवण्याच्या उद्देशाचे स्पष्ट संकेत देते.
चीन सध्या High seas तपासणीसंबंधी नियमांवरील चर्चांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे. मत्स्य विभागातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, “लवकरच चीन या ‘वर्दळीच्या’ देखरेख क्षेत्रात गस्त सुरू करू शकतो.”
“नेत्यांचे आदरातिथ्य आणि समुद्रातील ऑपरेशनल क्षमता दाखवणे, याचा संकेत आहे की ते त्या जागेत सक्रिय होऊ इच्छितात,” असे फोरम फिशरीज एजन्सीचे (FFA) मत्स्य संचालन संचालक- अॅलन रहारी यांनी रॉयटर्सला सांगितले.
FFA ही संस्था, 18 पॅसिफिक बेट राष्ट्रांसाठी बेकायदेशीर मासेमारीविरोधात कारवाई करते. ज्यात ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स आणि न्यूझीलंड या देशांचे नौदल व हवाई गस्त सहाय्य करतात.
चीन आणि तैवानचे मासेमारी दल पॅसिफिकमधील सर्वात मोठे असून, निरीक्षकांकडून सर्वाधिक उल्लंघन नोटीसा यांच्याच विरोधात दिल्या जातात. तरीही, चीन अनेक पॅसिफिक देशांचा सर्वात मोठा मत्स्य भागीदार आहे. रहारी यांच्या मते, ‘चिनी तटरक्षक दलाला किनारी पाण्यांमध्ये गस्त घालण्याची संधी काही सुरक्षा करारांच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते.’
चीनने 2024 मध्ये, Western & Central Pacific Fisheries Commission (WCPFC) कडे, 26 तटरक्षक जहाजांची नोंदणी केली आहे, जे उघड्या समुद्रावर तपासणी व निरीक्षणासाठी वापरले जाणार आहेत. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचेच या भागात सर्वाधिक तपासणी दल कार्यरत आहे.
WCPFC च्या कार्यकारी संचालिका- रिया मॉस-ख्रिश्चन म्हणतात की, “चीनने प्रत्यक्ष तपासणी केल्याची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, मात्र ते नियमांवरील चर्चेत अधिक सक्रिय झाले आहेत. मार्च महिन्यात चीनने ऑस्ट्रेलिया नेतृत्वाखाली नियम बळकट करण्याच्या चर्चेतही सहभाग घेतला होता.”
10 पॅसिफिक बेट राष्ट्रांचे परराष्ट्रमंत्र्यांनी, चीनच्या श्यामेन शहरात भेट देत ‘Haixun 06’ या दीर्घकालीन सेवा देणाऱ्या समुद्री जहाजाचा दौरा केला. हे जहाज 18,500 किमी किंवा 60 दिवस अखंडपणे चालवता येते.
पापुआ न्यू गिनीचे (PNG) परराष्ट्रमंत्री जस्टिन टकाचेंको म्हणाले की, “त्यांनी चीनच्या समुद्री आपत्कालीन कवायती पाहिल्या, मात्र गस्तीदलांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.”
PNG सध्या ऑस्ट्रेलियाशी संरक्षण करार करत असून, 2023 मध्ये अमेरिकेशी सुरक्षा करार करून यू.एस. कोस्ट गार्डला 2.7 दशलक्ष चौ. किमीच्या आर्थिक क्षेत्रात गस्त घालण्याची परवानगी दिली आहे.
फिजीनेही अलीकडेच ऑस्ट्रेलियासोबत एक नवा समुद्री सुरक्षा करार मंजूर केला आहे.
अमेरिका सध्या 12 पॅसिफिक राष्ट्रांशी समुद्री कायदा अंमलबजावणी करार करून, आपली उपस्थिती वाढवत आहे. रहारी यांच्या मते, “चीनने इतर भागीदारांच्या हितांना धक्का न देता या क्षेत्रात पाऊल ठेवावे, अन्यथा प्रादेशिक संघर्ष उद्भवू शकतो.”
Team BharatShakti
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)