रशियन हवाई हद्दीतील उड्डाणांवर बंदी घालण्याचा ट्रम्प प्रस्ताव चीनने फेटाळला

0

चीनमधून अमेरिकेला येणाऱ्या विमानांचे रशियाच्या हवाई हद्दीतून होणाऱ्या उड्डाणावर बंदी घालण्याची योजना रद्द करण्याची विनंती मंगळवारी प्रमुख चिनी विमान कंपन्यांनी ट्रम्प प्रशासनाला केली. या कंपन्यांनी असा इशारा दिला की यामुळे प्रवासाचा वेळ वाढेल, विमानभाडी वाढतील आणि काही सेवांमध्ये व्यत्यय येऊ शकेल.

 

गेल्या आठवड्यात, अमेरिकेच्या वाहतूक विभागाने चिनी विमान कंपन्यांसमोर अमेरिकेत येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांना रशियावरून उड्डाण करण्यापासून बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला होता, कारण या मार्गामुळे कमी झालेल्या उड्डाण वेळेचा अमेरिकन विमान कंपन्यांना मोठा फटका बसेल.

पत्रे पाठवणात आलेल्या सहा चिनी विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या चायना ईस्टर्नने यूएसडीओटीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की या निर्णयामुळे त्यांच्या काही महत्त्वाच्या मार्गांवरील उड्डाणाचा वेळ दोन ते तीन तासांनी वाढू शकतो, ज्यामुळे प्रवाशांची पुढची कनेक्टेड प्लेन्स चुकण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकते आणि इंधनाचा वापरही वाढेल.

एअर चायना आणि चायना सदर्नने म्हटले आहे की या निर्णयाचा अमेरिका आणि चीनमधील मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर विपरीत परिणाम होईल.

चायना सदर्नने अंदाज व्यक्त केला आहे की 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या सुट्टीच्या हंगामात प्रवास करणाऱ्या किमान 2 हजार 800 प्रवाशांना पुन्हा तिकीटे बुक करावी लागतील, ज्यामुळे “त्यांच्या प्रवासाच्या योजना धोक्यात येतील.”

स्वतंत्रपणे, युनायटेड एअरलाइन्सने ट्रम्प प्रशासनाला हा निर्बंध कॅथे पॅसिफिकवर देखील लावण्याची विनंती केली, कारण हाँगकाँग आणि हाँगकाँगमधील इतर कंपन्यांद्वारे अमेरिकेला जाणाऱ्या विमानांचे रशियामार्गे उड्डाण होते.

युनायटेडच्या मते रशियाच्या निर्बंधांचा अर्थ असा आहे की “नेवार्क/न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, डी. सी. आणि शिकागोसारख्या पूर्वी सेवा दिलेल्या मार्गांवर नॉन-स्टॉप पद्धतीने चीनची सेवा पुन्हा सुरू करण्यास प्रभावीपणे प्रतिबंध लावणे आहे”

रशियाच्या हवाई क्षेत्रावरील निर्बंध

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर मार्च 2022 मध्ये वॉशिंग्टनने अमेरिकेतून उड्डाण करण्यास रशियन विमानांना बंदी घातली होती, त्याचा बदला म्हणून रशियाने अमेरिकन विमान कंपन्या आणि इतर अनेक परदेशी विमान कंपन्यांना त्यांच्या हवाई क्षेत्रावरून उड्डाण करण्यास बंदी घातली आहे.

चिनी विमान कंपन्यांवर बंदी घालण्यात आली नव्हती आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवरील चीनच्या बाहेरील विमान कंपन्यांच्या तुलनेत बाजारपेठेतील आपला वाटा वाढवण्यासाठी चिनी कंपन्या या फायद्याचा वापर करत आहेत.

शुक्रवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की हे निर्बंध व्यक्ती-व्यक्तींच्या देवाणघेवाणीसाठी अनुकूल नाहीत.

अमेरिकन एअरलाइन्स, डेल्टा एअर लाइन्स आणि युनायटेड एअरलाइन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रमुख व्यापार गट एअरलाइन्स फॉर अमेरिकाने या प्रयत्नांचे कौतुक केले परंतु यूएसडीओटीला “प्रवासी क्षमतेची पातळी बाजारपेठेच्या मागणीशी वाजवीपणे जुळलेली राहील याची खात्री करून, अमेरिका आणि चिनी विमान कंपन्यांना उपलब्ध असलेल्या प्रवासी उड्डाणांच्या संख्येत समानता राखण्याचे” आवाहन केले.

टीम स्ट्रॅटन्यूज

(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleDefence Procurement Overhaul: MoD Aims To Cut Delays, Faster Acquisitions
Next articleIndia and EU Launch Joint Training to Counter Drone Threats in First-of-Its-Kind Exercise

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here