इस्रायली सैन्याचे हल्ले सुरूच, गाझामध्ये 26 पेक्षा जास्त ठार

0
इस्रायली
गाझामध्ये 6 ऑक्टोबर 2024 रोजी इस्रायल-हमास संघर्षादरम्यान इस्रायली निर्वासन आदेशानंतर, निर्वासित पॅलेस्टिनी लोक उत्तर गाझा पट्टीमधील भागातून निघून जाताना  (रॉयटर्स/महमूद इस्सा)

इस्रायली सैन्याने परत एकदा  गाझा पट्ट्यातील आपले हल्ले तीव्र केले आहेत. तिथल्या मशीद आणि शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्यात किमान 26 जण ठार झाले तर 93 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

हमास संचालित गाझातील सरकारी माध्यम कार्यालयाने सांगितले की निर्वासित लोक या लक्ष्य करण्यात आलेल्या इमारतींमध्ये राहत होते.

पॅलेस्टाइनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर गाझामध्ये शनिवारी रात्रीपासून आणखी किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. काही महिन्यांत प्रथमच इस्रायली लष्कराने या भागात रणगाडे पाठवले. तिथल्या रहिवाशांना तो भाग सोडून जाण्याचे आवाहन केल्यानंतर या सगळा प्रकार घडला आहे.

युद्ध वर्षपूर्ती दिनाच्या आसपास झाले हल्ले

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमास यांच्यात युद्ध सुरू होऊन आता एक वर्ष पूर्ण होत असताना आणि लेबनॉन – इस्रायल यांच्यातील  युद्धाची सुरूवात झालेली असताना हे हल्ले करण्यात आले.

इस्रायली आकडेवारीनुसार, हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिण इस्रायलवर हल्ला केला, ज्यात 1 हजार 200 लोक मारले गेले आणि सुमारे 250 लोकांना ओलिस ठेवले गेले.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझावर त्यानंतर इस्रायलने केलेल्या लष्करी हल्ल्यात सुमारे 42 हजार पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.

इस्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी “हमासच्या दहशतवाद्यांवर अचूक हल्ले” केले आहेत. हे दहशतवादी मध्य गाझामधील इब्न रुशद शाळा आणि शुहादा अल-अक्सा मशिदीत असलेल्या आदेश आणि नियंत्रण केंद्रांमध्ये कार्यरत होते.

हमासने लष्करी उद्देशांसाठी शाळा, रुग्णालये आणि मशिदी यासारख्या नागरी सुविधांचा वापर केल्याचा आरोप नाकारला आहे.

“मशीद येथे 20 वर्षांपासून आहे आणि शेजारच्या लोकांनी इथल्या लोकांना विस्थापित केले आहे,” असे इमाम अहमद फ्लीट यांनी ढिगाऱ्यातून कुराण काढत सांगितले.

या संघर्षामुळे एन्क्लेव्हमधील जवळपास सर्व 2.3 दशलक्ष लोक विस्थापित झाले आहेत, उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. याशिवाय इस्रायलने जागतिक न्यायालयात नाकारलेले नरसंहाराचे आरोप करण्यात आले आहेत.

रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीने सर्व पक्षांना सर्व नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.

या आवाहनात पुढे म्हटले आहे की, “या प्रदेशात हजारो लोक मारले गेले आहेत आणि लाखो लोक विस्थापित झाले आहेत.”

हमास संचालित गाझा सरकारी माध्यम कार्यालयाने सांगितले की इस्रायलने गेल्या 48 तासांत गाझामधील 27 घरे, शाळा आणि विस्थापितांच्या आश्रयस्थानांवर हल्ला केला आहे.

इजिप्तच्या सीमेजवळ रफाह येथे इस्रायली हवाई हल्ल्यात तीन पॅलेस्टिनी ठार झाले. या ठिकाणी मे महिन्यापासून इस्रायली सैन्य कार्यरत आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

लष्कराने शनिवारी मध्य गाझा पट्टीमधील नुसेइरत छावणीच्या काही भागांमध्ये स्थलांतर करण्याचे नवीन आदेश जारी केले, ज्यामुळे शेकडो कुटुंबांना त्यांची घरे सोडावी लागली.

या प्रदेशातून हल्ले करणाऱ्या हमास अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करणे हे आपल्या सैन्याचे उद्दिष्ट असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

दरम्यान, इस्रायली रणगाड्यांनी रात्रभर गाझाच्या उत्तर भागातील बेत लाहिया आणि जबालिया भागात घुसखोरी केली.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की या हवाई हल्ल्यात अनेक घरांवर हल्ला झाला, ज्यात किमान 20 लोक ठार झाले.

रविवारी, इस्रायली सैन्याने सांगितले की जबलियामध्ये कार्यरत असलेल्या सैन्याने डझनभर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांना ठार केले आहे. याशिवाय शस्त्रे आणि स्फोटक उपकरणेही तिथे सापडली आहेत.

या भागातील दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा आणि दहशतवाद्यांविरोधात सैन्याने कारवाई सुरू ठेवली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

इस्रायली सैन्याने दहशतवाद्यांच्या मोहिमांचे केंद्र असलेल्या जबलिया भागाला वेढा घातला आहे. एका हवाई हल्ल्यात एका घरात 10 जणांचा तर दुसऱ्या हल्ल्यात दुसऱ्या घरातील पाच जणांचा मृत्यू झाला.

अनेक महिन्यांमधील सर्वात वाईट रात्रींपैकी एक रात्र

नागरिकंनी अनेक महिन्यांमधील सर्वात वाईट रात्रींपैकी ही एक रात्र असल्याचे सांगितले. “युद्ध परत सुरू झाले आहे,” जबलिया येथील 52 वर्षीय राएड  यांचे मत आहे. त्यांचे कुटुंब रविवारी गाझा सिटीला रवाना झाले.

“हवाई हल्ले आणि रणगाड्यातून केले जाणारे डझनभर स्फोट यांमुळे जमिनी आणि इमारती हादरून जातात. हे सगळं युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांसारखे वाटते,” असेही त्यांनी  रॉयटर्सला सांगितले.

हमासचे सशस्त्र सेना, इस्लामिक जिहाद आणि लहान गटांनी सांगितले की त्यांचे सैनिक जबलियामधील इस्रायलींबरोबर तोफांचा सामना करण्यात गुंतले होते. गाझा पट्टीतील आठ ऐतिहासिकांपैकी सर्वात मोठ्या निर्वासित शिबिरांपैकी एक इथे आहे.

इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांचे सैन्य हमासच्या अतिरेक्यांशी लढण्यासाठी, लष्करी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी आणि हमासला पुन्हा एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी जबलियामध्ये कार्यरत आहेत.

दक्षिण गाझा पट्टीतील अल-मवासी येथील मानवतावादी दृष्टीने उभारण्यात आलेल्या क्षेत्राकडे जाण्याचे निर्देश इस्रायली सैन्याने दिले आहेत.

पॅलेस्टिनी आणि यूएन अधिकाऱ्यांच्या  म्हणण्यानुसार या एन्क्लेव्हमध्ये मानवतावादी क्षेत्रांसह कोणतीही जागा सुरक्षित राहिलेली नाही.

पत्रकाराचा मृत्यू

रविवारी उत्तर गाझामध्ये ठार झालेल्यांमध्ये हसन हमाद या स्थानिक पत्रकाराचा समावेश होता. गाझा सरकारच्या माध्यम कार्यालयाने सांगितले की, गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरपासून आतापर्यंत 175 पॅलेस्टिनी पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे.

तृप्ती नाथ
(रॉयटर्स)


Spread the love
Previous article2 Chinese Nationals Killed In Attack Outside Karachi Airport
Next articleIran’s Quds Force Chief Out Of Contact Since Beirut Strikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here