आत्मनिर्भरतेला लक्षणीय चालना देण्याच्या उद्देशाने, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) तंत्रज्ञान विकास निधी योजनेअंतर्गत खाजगी एमएसएमई आणि स्टार्ट-अप संरक्षण उद्योगांसाठी सात नवीन प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. या प्रकल्पांचा उद्देश सशस्त्र दलांच्या आणि अंतराळ तसेच संरक्षण क्षेत्रांच्या विविध गरजा पूर्ण करणे हा आहे. या प्रकल्पांना मिळालेली मंजूरी, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रातील उद्योगांना, विशेषत: एमएसएमई आणि स्टार्ट-अप्सना समर्थन देण्यासाठी डीआरडीओचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याकडे निर्देश करतात. या तंत्रज्ञानाच्या स्वदेशी विकासामुळे लष्करी-औद्योगिक परिसंस्थेत वाढ होईल. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, मंजूर प्रकल्पांचा तपशील खालीलप्रमाणे आहेः
स्वदेशी परिदृश्य आणि सेन्सॉर सिम्युलेशन टूलकिट
या प्रकल्पाचा उद्देश वैमानिकांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने वास्तववादी परिस्थिती निर्माण करण्यासाठी टूलकिट विकसित करणे हा आहे. टूलकिटमुळे मोहिमेचे संपूर्ण नियोजन आणि मोठ्या प्रमाणात वैमानिकांचा सहभाग शक्य होईल. हा प्रकल्प नोएडा येथील ऑक्सिजन 2 इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप कंपनीला देण्यात आला आहे.
पाण्याखालील मानवरहित हवाई वाहन प्रक्षेपण
हा प्रकल्प विविध लढाऊ भूमिकांसाठी तैनात केली जाऊ शकणारी सागरी युद्धक्षेत्राला उपयोगी विविध उपकरणे हाताळेल. गुप्तहेरी करणे, देखरेख ठेवणे आणि टोळीनिरीक्षण (आयएसआर) आणि सागरी क्षेत्र जागरूकता (एमडीए) ही त्याची उद्दिष्टे आहेत. हा प्रकल्प सागर डिफेन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांना देण्यात आला आहे.
डिटेक्शन आणि न्यूट्रीलाइझेशनसाठी लांब पल्ल्याचे रिमोटचालित वाहन
महत्त्वाची मालमत्ता संशयित कार्यक्षेत्रापासून दूर ठेवून दुहेरी-वापर प्रणालीचा उपयोग करून ही वाहने पाण्याखालील वस्तू शोधण्यात, त्यांचे वर्गीकरण करण्यात, त्या वस्तू नष्ट करण्यात सक्षम असतील. हा प्रकल्प स्टार्ट-अप आयआरओव्ही टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, कोची यांना देण्यात आला आहे.
विमानासाठी आइस डिटेक्शन सेन्सरचा विकास
या प्रकल्पात विमानासाठी बर्फाचा शोध घेणारा सेन्सर विकसित करणे हा उद्देश आहे. विमानाच्या बाह्य पृष्ठभागावर आदळल्यावर गोठणाऱ्या अतिशीत थंड पाण्याच्या थेंबांमुळे, उड्डाणादरम्यान हिमवर्षावाची स्थिती शोधण्याचे उद्दिष्ट या सेन्सरसमोर ठेवण्यात आले आहे. सेन्सरद्वारे गोळा केलेली माहिती विमानाची अँटी-आयसिंग यंत्रणा सक्रिय करण्यासाठी वापरली जाईल. बंगळुरू येथील क्राफ्टलॉजिक लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडला हा प्रकल्प देण्यात आला आहे.
सक्रिय अँटेना ॲरे सिम्युलेटरसह रडार सिग्नल प्रोसेसरचा विकास
चेन्नई येथील डेटा पॅटर्न (इंडिया) लिमिटेडला मंजूर करण्यात आलेला हा प्रकल्प, अनेक लहान पल्ल्याच्या हवाई शस्त्रास्त्र प्रणालींची चाचणी आणि मूल्यमापन करण्यासाठी बहु-लक्ष्य प्रणाली तैनात करण्यास सक्षम करेल. हे मोठ्या रडार प्रणालींसाठी मूलभूत पायाभूत घटक म्हणून काम करेल.
भारतीय प्रादेशिक दिशादर्शक उपग्रह प्रणाली-आधारित वेळेनुसार अधिग्रहण आणि प्रसार प्रणालीचा विकास
बंगळुरू येथील एकॉर्ड सॉफ्टवेअर अँड सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेडला हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. याचा उद्देश वेळेचे संपादन आणि प्रसार प्रणालींचे स्वदेशीकरण अधिक सक्षम करणे, योग्य वेळ काढण्यासाठी भारतीय नक्षत्रांचा वापर करणे तसेच श्रेणी आवश्यकतांवर आधारित योग्य आणि लवचिक वेळ प्रणाली विकसित करणे हा आहे.
मल्टीफंक्शनल वेअरेबल ॲप्लिकेशन्ससाठी ग्राफीन-आधारित स्मार्ट आणि ई-टेक्सटाइल्सचा विकास
कोईम्बतूर येथील अलोहाटेक प्रायव्हेट लिमिटेडला हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये ग्रॅफीन नॅनोमटेरियल्स आणि कंडक्टिव्ह शाईचा वापर करून कंडक्टिव्ह यार्न आणि फॅब्रिक बनवण्याची प्रक्रिया विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या कपड्यांसाठी प्रगत नॅनोसंमिश्र सामग्री-आधारित ई-वस्त्रोद्योग उभारणे हा त्यामागचा उद्देश आहे.
टीम भारतशक्ती