वॉशिंग्टन डीसीमध्ये शुक्रवारी झालेल्या गोळीबारात किमान पाचजण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवीन वर्षाच्या दिवशी न्यू ऑर्लिन्समध्ये आयसिसप्रेरित संशयित एकमेव हल्लेखोराने पिकअप ट्रक गर्दीत घुसवून केलेल्या हल्ल्यानंतर- ज्यात किमान 15 लोक ठार झाले आणि डझनभराहून अधिक जखमी झाले – अवघ्या दोन दिवसांनी ही घटना घडली आहे.
वॉशिंग्टन डीसीमधील गोळीबाराच्या घटनेबद्दल तपशील सामायिक करताना पोलिसांनी एक्सवर म्हटलेः “हॅरी थॉमस वे एनईच्या 1500 ब्लॉकमधील गोळीबाराचा तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीनुसार घटनास्थळी तीन पुरुष आणि एक महिला जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते सगळे शुद्धीत असून ते स्वतः श्वासोच्छ्वास करू शकत आहेत.”
पोलिसांनी सांगितले की गुप्तहेर घटनास्थळी पोहोचले असून सध्या घटनेचा तपास सुरू आहे.
“या घटनेतील पाचवा पीडित हा देखील एक पुरुष असून तोही या गोळीबारात जखमी झाला आहे. सुरुवातीला, हा गोळीबार दोन ओळखीच्या पक्षांमधील वादातून झाला असल्याची माहिती आहे,” असे गोळीबारात जखमी झालेल्या पाचव्या व्यक्तीबद्दल माहिती देताना पोलिसांनी सांगितले.
डब्ल्यूयूएसए 9 ने पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, “ही गोळीबाराची घटना ओळखीच्या दोन पक्षांमधील वादातून उद्भवली आहे.”
न्यू ऑर्लिन्स हल्ल्यात, शमशुद्दीन जब्बार नावाच्या संशयिताने पोलिसांनी त्याला गोळ्या घालण्यापूर्वी त्याचा पिकअप ट्रक गर्दीतून चालवत नेला होता.
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने सांगितले की त्याच्या वाहनात आयसिसचा झेंडा सापडला.
प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, जवळच दोन बॉम्बही (explosive devices) सापडले होते.
त्याच दिवशी वेगासमधील ट्रम्प हॉटेलच्या बाहेर टेस्ला सायबरट्रकचा स्फोट झाला. वृत्तांनुसार, वाहनाचा स्फोट होण्याच्या काही मिनिटांपूर्वी चालकाने वाहनाच्या आत स्वतःला गोळी मारली होती. या स्फोटात अनेक लोक जखमी झाले होते.
तिसरी घटना म्हणजे सामूहिक गोळीबार, 1 जानेवारी रोजी न्यूयॉर्क शहरातील एका नाईटक्लबच्या बाहेर नोंदवण्यात आली. या गोळीबारात किमान 10 जण जखमी झाले.
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क हे लास वेगासमधील ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या बाहेर नवीन वर्षाच्या दिवशी झालेल्या सायबरट्रक स्फोटाच्या तपासात तपासकर्त्यांना सक्रियपणे मदत करत आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जळालेल्या सायबरट्रकमधून डेटा आणि व्हिडिओ पुनर्प्राप्त करण्यासाठी तपासकर्त्यांना मदत व्हावी यासाठी मस्क यांनी गुरुवारी लास वेगास येथे एका पथकाची नियुक्ती केली.
याव्यतिरिक्त, टेस्लाने त्यांच्या चार्जिंग स्टेशन्समध्ये उपलब्ध असणारे फूटेज पोलिसांच्या स्वाधीन केले आहे, ज्याच्या मदतीने संशयित व्यक्तीच्या कोलोरॅडो ते लास वेगासपर्यंतच्या प्रवासाचा मागोवा घेण्यात आला.
लास वेगासचे शेरीफ केव्हिन मॅकमहिल यांनी मस्क यांच्या सहकार्याची प्रशंसा केली आणि नमूद केले की सायबरट्रकमध्ये अनेक कॅमेरे आहेत जे स्फोटापूर्वी संशयिताच्या अंतिम हालचालींची तपासणी करण्यात मदत करू शकतील.
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएस)