हॅकर्सचा विमानतळाच्या स्पीकर्सवर कब्जा; हमासची स्तुती, ट्रम्प यांच्यावर टीका

0
ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 11 फेब्रुवारी 2025 रोजी, वॉशिंग्टन, डी.सी. येथील व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये बोलत आहेत. सौजन्य: रॉयटर्स/केविन लामार्क

कॅनडातील तीन आणि अमेरिकेतील एका विमानतळावरील सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली हॅक करत, हॅकर्सनी त्यावरून हमासच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जाहीर टीका केली. मंगळवारी घडलेल्या या चमत्कारिक घटनेची, अधिकृत माध्यम अहावालातून पुष्टी करण्यात आली आहे.

कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील, केलोना आंतरराष्ट्रीय विमानतळावर वापरल्या जाणाऱ्या ‘अ‍ॅडव्हर्टायझमेंट स्ट्रिमिंग सर्व्हिस’ हॅकर्सनी काही वेळासाठी हॅक करुन आणि विमानतळावरील स्पीकर्सद्वारे अनधिकृत संदेश प्रसारित करण्यात आला, अशी माहिती केलोना रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी दिली.

हॅकिंग प्रकरणचा तपास सुरू

रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी (RCMP) सांगितले की,  “ते इतर तपास संस्थांसह संयुक्तपणे या हॅकिंग प्रकरणाची चौकशी करत आहेत. परंतु, याविषयी अधिक तपशील देण्यास त्यांनी नकार दिला.”

ब्रिटीश कोलंबियातील व्हिक्टोरिया आंतरराष्ट्रीय विमानतळावर, हॅकर्सनी PA (Public Address) प्रणालीवर परदेशी भाषेतील संदेश आणि संगीत प्रसारित केले, अशी माहिती विमानतळाच्या प्रवक्त्यांनी दिली.

प्रवक्त्यांच्या मते, हॅकर्सनी थर्ड-पार्टी सॉफ्टवेअरमध्ये घुसखोरी करून PA प्रणालीवर नियंत्रण मिळवले, त्यानंतर विमानतळ प्रशासनाने इंटरनल प्रणालीवर स्विच करत पुन्हा एकदा नियंत्रण मिळवले.

 या प्रकरणाच्या चौकशीत कॅनेडियन सेंटर फॉर सायबर सिक्युरिटी ही संस्था, विमानतळ प्रशासन आणि RCMP ला सहाय्य करत आहे.

पेनसिल्व्हेनिया विमानतळावरही हॅकर्सचा हल्ला

पेनसिल्व्हेनियाच्या हॅरिसबर्ग आंतरराष्ट्रीय विमानतळावरील PA प्रणालीवरी हॅकर्सनी हल्ला केल्याची माहिती, अमेरिकेचे वाहतूक सचिव शॉन डफी यांनी बुधवारी सोशल मीडियाद्वाके दिली.

हॅकर्सनी विमानतळाच्या PA प्रणालीवरून, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध शिवीगाळ करत, “Free, free Palestine” असा घोषणा दिल्या. शेवटी त्यांनी “Turkish Hacker Cyber Islam was here” असा संदेशही दिला.

यूएस फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि विमानतळ प्रशासनाने या सायबरहल्ल्याची चौकशी सुरू ठेवली आहे. मात्र, याबाबत FAA ने कोणतीही तात्काळ प्रतिक्रिया दिली नाहीये.

मंगळवारी सायंकाळी, कॅनडातील ओंटारियो प्रांतातील विंडसर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘फ्लाइट इन्फॉर्मेशन डिस्प्ले स्क्रीन आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली (PA system)’ हॅकर्सनी हॅक केली आणि त्यावरून अनधिकृत प्रतिमा आणि संदेश प्रसारित केले, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली.

विमानतळ प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ‘हा सायबर हल्ला विमानतळ वापरत असलेल्या क्लाऊड-आधारित सॉफ्टवेअर प्रणालीवर झाला होता. परंतु, काही वेळातच आमच्या प्रणाली पूर्ववत करण्यात आल्या.’

हॅकर्सनी टार्गेट केलेली ही चारही ठिकाणे, तुलनेने लहान- फीडर विमानतळे आहेत. 2024 मध्ये, यापैकी सर्वाधिक वर्दळीच्या केलोना आंतरराष्ट्रीय विमानतळाने 20 लाखांहून अधिक प्रवाशांची सेवा दिली. तर, व्हँकुव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे ब्रिटीश कोलंबियातील सर्वात मोठा विमानतळ आहे, त्यावरून 2.5 कोटींपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला होता.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleइंजिन पार्टच्या उत्पादनासाठी रोल्स-रॉईसचा भारत फोर्जसोबत नवा करार
Next articleम्यानमार: जुंटाची राजवट आणि यादवी युद्ध यांवर निवडणुका हे उत्तर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here